जगविख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते शास्त्रीय संगीताच्या मेवती घराण्याशी संबंधित होते.
पंडित जसराज यांना त्यांचे वडील पंडित मोतीराम यांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण दिले. नंतर त्याच्या भावाने त्यांना तबला संगीतकार म्हणून प्रशिक्षण दिले. त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी गायक म्हणून प्रशिक्षण सुरू केले. वयाच्या 22 व्या वर्षी गायक म्हणून त्यांनी आपला पहिला कार्यक्रम केला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजराज” असं नाव दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
संगीतमार्तंड पंडित जसराज यांचे निधन
187
previous post