Home » ‘वीर दौडले सात’चं मोशन पोस्टर रिलीज

‘वीर दौडले सात’चं मोशन पोस्टर रिलीज

by Team Gajawaja
0 comment
Veer Daudale Saat
Share

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिने निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा (Mahesh Manjrekar) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महाराष्ट्र दिनी’ त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘वीर दौडले सात’ (Veer Daudale Saat) असे या सिनेमाचे नाव आहे. तसेच या सिनेमाचे पोस्टर वो सात (wo saat) असे म्हणत हिंदीतही प्रदर्शित करण्यात आले आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

सोमवारी महेश मांजरेकरांनी यांनी या चित्रपटाचा मोशन पोस्टर अक्षय्य तृतियेच्या दिवशी रिलीज होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आता नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. 

महेश मांजरेकरांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरवर ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाचे नाव पाहायला मिळत आहे. या मोशन पोस्टरला महेश मांजरेकरांनी स्वत: आवाज दिला आहे. त्यांनी मोशन पोस्टर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ‘छत्रपतींचा आदेश, वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर, दौडले सात’ 

====

हे देखील वाचा: “फाईल नंबर 498 A” चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच

====

‘वीर दौडले सात’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर सांभाळणार आहेत. हा सिनेमा येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे लेखन पराग कुलकर्णी यांनी केले आहे. तर वसिम करेशी या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची गाथा सर्वत्र पोहोचणार आहे.

Mahesh Manjrekar gets protection from arrest by Bombay High Court in  obscenity case : Bollywood News - Bollywood Hungama

====

हे देखील वाचा: अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झळकले ‘तमाशा लाईव्ह’चे टिझर

====

कोल्हापूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग म्हणून गडहिंग्लजला ओळखले जाते. याच भागाच्या उपविभागातील नेसरी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राज्याचे शेवटचे टोक. नेसरी खिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आत्म बलिदान देत इतिहास अजरामर केला होता. याच सर्व लढाईवर हा चित्रपट साकारला जाणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.