Home » रशियाचं सुद्धा होतं भारत जिकण्याचं स्वप्नं !

रशियाचं सुद्धा होतं भारत जिकण्याचं स्वप्नं !

by Team Gajawaja
0 comment
Russia's Failure
Share

भारत आणि रशिया या दोन्ही देशांच्या मैत्रीची कहाणी रंजक आहे. संयुक्तराष्ट्र संघात काश्मीरसाठी भारताच्या बाजून उभं राहणं असो वा शस्रांबरोबरच त्याची टेक्नॉलॉजीसुद्धा भारताला पुरवणं असो. रशिया नेहमीच भारताच्या बाजूने उभा राहिलाय. पण ह्याच रशियाने एकदा भारताला काबिज करण्याच स्वप्नं पहिलं होतं.

रशिया भारतावर आक्रमण करणार होता. नेमक काय होतं रशियाचं नियोजन आणि ते फसलं कुठे? भारताच्या इतिहासात अनेक परकीय शक्तींनी भारतात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. अलेक्झांडर द ग्रेटने पंजाबवर केलेलं आक्रमण, मोहम्मद बिन कासिमने सिंध वर केलेलं आक्रमण. महमूद गझनीने ही अनेक वेळा भारताची लूटमार केली११९२ मध्ये मोहम्मद घोरीने दिल्लीवर ताबा मिळवून दिल्ली सल्तनत सुरू केली. बाबरने १५२६ मध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली आणि मुघलांचा राज्य विस्तार झाला. पोर्तुगीजांनी गोवामध्ये, तर डच, डॅनिश, आणि फ्रेंचांनी भारताच्या विविध भागांमध्ये आपले तळ स्थापन केले.

१७५७ मध्ये प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर वर्चस्व मिळवलं आणि १८५८ मध्ये ब्रिटिश राज स्थापन झाला. पण भारतावर सत्ता स्थापन करण्यासाठी रशियाने सुद्धा प्रयत्न केले होते. पण आजपर्यंत हा इतिहास आपण ऐकला नाहीये. रशिया भारतावर आक्रमण करणार होता पण नेमकं असं काय झालं की रशियाचं हे नियोजन फसलं. (Russia’s Failure)

१९ व्या शतकात साम्राज्यवाद फोफावला होता त्यामुळे जागतिक इतिहासात मोठा बदल घडला. यामध्ये युरोपीय राष्ट्रांनी विशेषत: ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल या देशांनी आपल्या वर्चस्वासाठी इतर देशांवर ताबा मिळवला आणि त्यादेशांमध्ये स्वत:च्या वसाहती स्थापन केल्या. त्यातच रशियातील साम्राज्यवादी सत्ता सुद्धा बरीच महत्त्वाकांक्षी होती आणि त्यांचा सर्वात मोठा युरोपियन शत्रू म्हणजे ब्रिटन ब्रिटिशांच्या वाढत्या प्रभावाखाली असलेल्या आशिया खंडाला आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी भारतावर आक्रमण करून संपूर्ण भूप्रदेश ताब्यात घेण्याची योजना तत्कालीन रशियन सम्राट पहिल्या पॉलने आखली.

१८०१ साली रशियाचा पहिला पॉल सत्तेवर होता, तेव्हा संपूर्ण भारतावर अजून ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली नव्हती. मात्र, व्यापाराच्या उद्देशाने भारतात आलेले ब्रिटीश हळूहळू अधिक ताकदवान होऊ लागले होते. त्यांचीही भारतावर सत्ता स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. ब्रिटिशांच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का देणं आणि आपली सत्ता स्थापन करणं, असं रशियाचा सम्राट पहिल्या पॉलच स्वप्न होतं. मध्य आशिया आणि अफगाणिस्तानमार्गे भारताच्या सीमेपर्यंत जाण्याची योजना पॉलने आखली. यासाठी त्याने फ्रान्सची मदत घेण्याचेही ठरवलं. (Russia’s Failure)

तेव्हा फ्रान्सवर नेपोलियन बोनापार्टची सत्ता होती. आणि त्याचही भारतावर अधिराज्य करायचं स्वप्नं होत. रशियाचा पॉल आणि फ्रान्सच्या नेपोलियनने एकत्र येऊनभारतावर आक्रमण करण्याची योजना आखली. त्यानुसार फ्रान्स आणि रशियाचे प्रत्येकी ३५ हजार सैन्य इराणमध्ये असलेल्या ‘अस्त्राबाद’मध्ये म्हणजेच सध्याचा जॉर्जन शहरात एकत्र येऊन पुढे भारताच्या दिशेने कूच करणार होतं.

जॉर्जन ते दिल्ली हे सुमारे १५०० मैलांचे अंतर ते पार करून इराण आणि अफगाणिस्तानमार्गे भारताच्या सीमेपर्यंत जायच आणि ब्रिटिशांना पराभूत करायच,असा त्यांचा मानस होता. पण या नियोजनामध्ये काही संभाव्य धोकेही होते. हे धोके फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्टच्या लवकरच लक्षात आले. इतका मोठा प्रवास करून एवढं मोठ सैन्य आशियाच्या दिशेने कूच करण्यामध्ये परफेक्ट प्लॅनिंगची आवशक्यता होती. आणि ती प्लॅनिंग या दोघांनी केली नव्हती, ज्यामध्ये सैन्याचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च. (Russia’s Failure)

मातृभूमीपासून दूर असताना या मोठ्या सैन्याचे भरणपोषण कसं करायच, आणि शिवाय मध्य आशियामध्ये आजूबाजूला इतके शत्रू असताना कोणत्याही सहकाऱ्याच्या मदतीशिवाय हजारो मैलांचा प्रवास करत भारतापर्यंत पोहोचायचं, हे काम निश्चितच सोपे नव्हत. त्यामुळे नेपोलियनने या योजनेतून माघार घेतली. (Russia’s Failure)

इतकं असून सुद्धा रशियन सम्राट पहिल्या पॉलने आशा सोडली नाही. त्याला काहीही करून भारतावर आपले राज्य हवे होते. जानेवारी १८०१ मध्ये पहिल्या पॉलने आपल्या रशियन लष्कराच्या सर्वांत ताकदवान अशा ‘कोझॅक’ रेजिमेंटच्या वरिष्ठ सेनापतीला या संदर्भात आदेश दिला. कोझॅक ही लष्करी घोडेस्वार म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन जमात होती. भारतापर्यंत पोहोचायचा अचूक नकाशा आणि भारतात ब्रिटिशांची ताकद किती आहे, याबाबतही पुरेशी माहिती नसल्याने भारतावर आक्रमण करण धोक्याचे आहे, अशी कल्पना सेनापतीने पहिल्या पॉलला दिली होती.

===============

हे देखील वाचा :  १३०० वर्षे जुनी तलवार !

===============

पण भारतावर सत्ता स्थापन करण्याचं वेडं पहिल्या पॉलच इतक होतं की त्याने भरथंडीत रशियाच्या २२ हजार सैनिकांनी भारताच्या दिशेने कूच करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या सैन्याला आपल्या शस्त्र लवाजम्यासह प्रवास करणे जवळपास अशक्य झाल. त्यांना रशियातून कजागिस्तानमधील अरबी समुद्रापर्यंत पोहोचायलाच एक महिना लागला. ते पुढे कूच करण्याच्या नियोजनात होते; मात्र एका बातमीने संपूर्ण सैन्याला धक्का बसला. (Russia’s Failure)

सम्राट पहिल्या पॉलची हत्या झाल्याची बातमी सैन्याला या बातमीनंतर सम्राट पॉलचा मुलगा आणि रशियाचा पुढील सम्राट अलिक्सांद्रने भारतावर आक्रमण करण्याचा प्लान पुढे ढकलण्याचे आदेश दिले. अशा प्रकारे भारतावर आक्रमण करण्याचे रशियाचे नियोजन फसलं . भारतात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर रशियाने पुन्हा भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि तोही काही कारणास्तव फसला.रशियाने भारतावर आक्रमण करण्याचे केलेल प्रयत्न खरोखरच यशस्वी झाले. असते तर कदाचित भारताचा सध्याचा इतिहास फारच वेगळा असता एवढं नक्की! (Russia’s Failure)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.