पृथ्वीतलावर पाणी भरपुर प्रमाणात आहे. परंतु स्वच्छ, पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मिळणे हे थोडे कठीण आहे. जगभरातील बहुतांश लोक स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पिण्यापासून आजही वंचित आहेत. परंतु स्वच्छ पाणी मिळणे हे फार काही कठीण नाही आहे. पाण्याचे काही स्रोत असतात ज्यामध्ये महासागर, नदी, तलाव, जमिनीखालील पाणी, पावसाचे पाणी (Rain water) यांचा त्यामध्ये समावेश होते. परंतु शुद्ध आणि स्वच्छ पाणी कुठे मिळणार हाच प्रश्न उपस्थितीत होत. अशातच आम्ही तुम्हाला पावसाचे पाणी हे किती शुद्ध आणि पिण्यायोग्य खरंच असते का याबद्दल अधिक माहिती देणार आहोत.
पावसाच्या पाण्यासंदर्भात विविध मतं आहेत. परंतु सत्य असे आहे की, हे पाणी सर्वाधिक शुद्ध रुपात असते. अशी एक वेळ होती जेव्हा पाण्याची बिलकुल कमतरता नव्हती. तलाव, नद्या, विहीरींमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध होता. लहान लहान नद्यासुद्धा १२ महिने वाहत असायच्या. पावसाच्या पाण्याने लहान मुलं अंघोळ करायची आणि ते पाणी प्यायचे सुद्धा. त्यांना पावसाचे पाणी स्वच्छ आहे की नाही हा विचारच करावा लागत नव्हता.
आजकाल सध्या हळूहळू शुद्ध पाण्याच्या नावावर बाटलीबंद पाण्याला प्राथिमकता दिली जात आहे. आपण पावसाळा सुरु झाल्यानंतर मुलांना पावसात भिजू नका असे वारंवार सांगतो. पण आज बॉटलबंद पाण्याऐवजी पावसाचे पाणी प्या असे कोणीही बोलत नाही. परंतु बॉटलबंद पाण्याची सुरुवात ही पावसाच्या पाण्यापासूनच झाली होती. नदी-ओढ्यांमध्ये असलेले बहुतांश पाणी हे पावसाचेच असते. त्याचसोबत नाल्यांमध्ये येणाऱ्या पाण्याचा मुख्य स्रोत सुद्धा पाऊसच आहे.
हे देखील वाचा- अटालांटिक समुद्र हिरवा तर हिंद महासागर निळा का दिसतो?
पृष्ठतलावर असणारे पाणी सुद्धा पावसाच्या माध्यमातूनच खाली आलेले असते. तर जमिनीच्या आतमध्ये जाणारे पाणी मिनिरल वॉटर होते कारण त्यामध्ये जमिनीखालील काही खनिज मिसळतात. हे पाणी तरी सुद्धा सुरक्षित आणि स्वच्छ असल्याचे सांगितले जाते. परंतु पावसाचे पाणी (Rain water) कचऱ्यावर पडल्यास ते प्रदुषित होते. हे खरं आहे की. पाणी जेवढे पसरले जाते तेवढ्या अधिक ठिकाणी जाते. त्यावर प्रदुषणाचा प्रभव पडण्याची शक्यता अधिक होते. त्यानंतर आपण त्यावर प्रक्रिया करुन शुद्ध करु शकतो. त्यामुळे जमिनीवर न पोहचलेले पाणी हे सर्वाधिक शुद्ध असते.
परंतु ही शक्यता पूर्णपणे चुकीची असू शकत नाही की, वायु प्रदुषणाचा प्रभाव हा पावसावर होतो. वास्तिविक रुपात पावसाचा परिणाम हा प्रदुषणावर होते. कारण प्रदुषण असलेल्या ठिकाणी पाऊस पडल्यास तेथील प्रदूषक ही त्यात मिसळली जातात. परंतु हे संपूर्ण पावसाळ्यात कधीच होत नाही. कारण सातत्याने पाऊस पडला तर तो प्रदुषणमुक्त होतो. त्यामुळे स्पष्ट होते की, पावसाचे पाणी शुद्ध असते.