Home » ‘या’ देशांमध्ये सिंह-चित्ता घरात पाळण्यास परवानगी मिळते?

‘या’ देशांमध्ये सिंह-चित्ता घरात पाळण्यास परवानगी मिळते?

by Team Gajawaja
0 comment
Permission to pet Lion-Cheetah
Share

तुम्ही टेलिव्हजन किंवा इंटरनेटवर पाहिले असेल की, काही लोक वाघ किंवा चित्ता सारख्या हिंस्र प्राण्यांसोबत खेळताना दिसून येतात. त्यांना पाळीव कुत्र्यांसारखेच काहीजण वागवतात. सिंह किंवा चित्त्यासोबत लोक घरात राहून आनंद घेताना दिसून येतात. मात्र या सर्व गोष्टी भारतात नव्हे तर भारताबाहेर होतात. तर जाणून घेऊयात कोणत्या देशात सिंह आणि चित्ता पाळण्यासाठी परवानगी दिली जाते त्याबद्दल अधिक.(Permission to pet Lion-Cheetah)

भारतात सिंह-चित्ता पाळू शकतो?
सर्वात प्रथम भारताबद्दल बोलायचे झाल्यास येथे कोणत्याही खतरनाक प्राण्याला पाळण्यास परवानगी सरकारकडून दिली जात नाही. या खतरनाक प्रजातींमध्ये वाघ, सिंह-चित्ता यांचा समावेश आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत या जनावरांना खासगी रुपात पाळण्यास परवानगी नाही. त्यामुळे जर एखादा त्याचा दुसऱ्या कामासाठी वापर करु इच्छित असेल तर त्याने सविस्तर त्याबद्दल कायदेशीर परवानगी घ्यावी.

त्याचसोबत त्यांना पाळायचे जरी झाल्यास त्यांनी राज्यातील चीफ वाइल्डलाइफ वॉर्डेनकडून त्याची परवानगी घ्यावी. त्या प्राण्यांच्या गरजा त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत आणि त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात ही सर्व व्यवस्था करावी.

Permission to pet Lion-Cheetah
Permission to pet Lion-Cheetah

कोणत्या देशात पाळण्यास परवानगी?
आता तर बहुतांश देशात त्यांना पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त थायलंड आणि अफ्रिकेतील काही देशांमध्येच हे आता शक्य आहे. खरंतर जेव्हा वर्ष २०१५ मध्ये मध्य प्रदेशाचे तत्कालीन पशूपालन मंत्री कुसुम मेहडेल यांनी वाघांची संख्या वाढवण्यासाठी त्यांना पाळणे कायदेशीर केले होते. तेव्हा त्यांनी थायलंड आणि अफ्रीकेचे उदाहरण दिले होते.

हे देखील वाचा- वाघ, चित्ता, सिंह आणि बिबट्या मधील फरक काय?

अमेरिकेत बंदी?
अमेरिकेत अशा प्राण्यांना पाळण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. येथे विविध राज्यांच्या हिशोबानुसार नियम बनवण्यात आले आहेत. त्यामध्ये नॉर्थ कारोलिना, नेवाडा, अलाबामा राज्यांमध्ये त्यासाठी पूर्ण बंदी आहे. प्रत्येक राज्यांसाठी अटी आणि नियम ही वेगवेगळे आहेत.(Permission to pet Lion-Cheetah)

दुबईत काय आहे नियम?
तुम्ही इंटरनेटवर पाहिले असेल की बहुतांश शेख हे आपल्या सोबत हे प्राणी ठेवतात. मात्र काही वर्षांपूर्वी नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. तर युएईमध्ये आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा असे करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक असायचे.

दरम्यान, नामीबिया येथून नुकत्याच आठ चित्त्यांना भारतात आणण्यात आले आहे. त्यांना मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहे. तर देशात १९४७ रोजी अखेरच्या तीन चित्त्यांची शिकार मध्य प्रदेशातील कोरिया शासनाचे महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी केली होती. तर याचा फोटा सुद्धा बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटी मध्ये आहे. त्यानंतर भारतात आजवर चित्ता आढळून आला नव्हता. मात्र आता ७५ वर्षांनी आठ चित्ते आणले गेले आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.