पंढरपुरातील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात भाविकांना आता सेवा करण्याची संधी मिळणार आहे. याची सुरुवात आषाढवारी यात्रेपासून केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे- उत्साहाचे वातावरण आहे. भाविकांनी आपल्या विठूराया-रुक्मिणीची सेवा करण्यास मिळणार असल्याने सर्वांकडून आनंद ही व्यक्त केला जात आहे. या संदर्भातील एक बैठक नुकतीच पार पडली.(Pandharpur Vitthal-Rukmini Temple)
या बैठकीतच भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीच्या सेवेसंदर्भातील निर्णय घेण्यात आला. गेल्या काही काळापासून भाविकांकडून त्यांना सुद्धा मंदिरात सेवा मिळावी अशी मागणी केली जात होती. त्यामुळे भाविकांच्या मागणीचा विचार करत आता ही सेवा आषाढवारी यात्रेपासून सुरु होणार आहे.
सेवेबद्दलचा कृती आराखडा तयार करुन त्यानुसार भाविकांना मंदिरासह परिसरात मोफत सेवेची संधी दिली जाणार आहे. मंदिर सांगेल त्यानुसार जी सेवा मिळेत ती करण्यास भाविक जर तयार असतील तर त्यांना वर्षभर ती सेवा देण्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे. तरी सेवेसाठी इच्छुक असलेल्या भाविकांनी आपली नावे मंदिर समितीकडे द्यावीत असे ही सांगण्यात आले आहे.
तर यंदाच्या वर्षी माघीसाठी खुप मोठ्या संख्येने वारकरी मंदिरात आले होते. जवळजवळ ५ लाख भाविकांनी पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतले. याच सोबत भाविकांची संख्या वाढल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नात ही वाढ झाली. यंदाच्या माघ शुद्ध जया एकादशी १ फेब्रुवारीला साजरी केली गेली. यात्रेच्या कालावधीत २२ जानेवारी ते ५ फेब्रुवारी असा होता. त्यामुळे समितीचे उत्पन्न यंदा चौपटीने वाञले असून देवाच्या चरणी तब्बल ४ कोटी ८८ लाख ६२ हजार २८ रुपयांचे दान मिळाले होते.(Pandharpur Vitthal-Rukmini Temple)
हे देखील वाचा- हा आठवडा ‘बढती बदली अन आर्थिक उलाढालीचा’
मंदिराचा इतिहास
श्रीकृष्णाला विठोबा असे म्हटले जाते. त्यामुळेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठोबाच्या नावे सुद्धा ओळखले जाते. मंदिराच्या किनाऱ्याला भीमा नदी आहे. अशी मान्यता आहे की, या नदीत स्नान केल्यानंतर भक्तांची पाप धुतली जातात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर भक्त चोखामेळा यांची समाधी आहे. मंदिराच्या परिसरात रुक्मिणी, बलराम, सत्यभामा, जांभूवंती आणि श्रीराधा यांचे सुद्धा मंदिर आहे. असे म्हटले जाते की. विजयनगर साम्राज्याचा प्रसिद्ध राजा कृष्णदेव याने आपल्यासोबत विठ्ठलाची मुर्ती घेऊन आला होता. परंतु नंतर ती पुन्हा घेऊन आला आणि त्याची पुन्हा स्थापना केली.