Home » पाकिस्तान आणि तालिबान मधील संबंधात वाढतोय तणाव, ‘ही’ आहेत कारणं

पाकिस्तान आणि तालिबान मधील संबंधात वाढतोय तणाव, ‘ही’ आहेत कारणं

by Team Gajawaja
0 comment
Taliban New Rules
Share

नुकत्याच पाकिस्तानच्या बलूचिस्तानच्या प्रांतात अफगाणिस्तान सीमेवर गोळीबार झाला. या आठवड्यात दुसरी सुद्धा अशीच घटना घडली आहे. पाकिस्तानचे असे म्हणणे आहे की, गोळीबार अफगाणिस्तानच्या त्या क्षेत्रातून करण्यात आला होता, जेथून दोन्ही देशांदरम्यान महत्वपूर्ण व्यापार केंद्र अगदी जवळ आहे. जेव्हा अफगाणिस्तान संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानने याची सुरुवात केल्याचे जबाबदार ठरवले आहे. या घटनांमुळे पाकिस्तान आणि तालिबान मधील संबंधांत तणाव वाढत असल्याचे मानले जात आहे. अखेर असे काय झाले ज्या तालिबानला ज्या पाकिस्तानने पोसले तो त्यांच्या विरोधात का जातोय? (Pakistan-Taliban Tension)

एकेकाळी आयएसआयचा प्रतिनिधी होता तालिबान
एक वेळ अशी होती की, तालिबानला पाकिस्तानच्या गुप्तचर एजेंसी आयएसआयची प्रॉक्सी असल्याचे समजले जात होते. ज्यांचा उद्देश अफगाणिस्तानला नियंत्रित करणे होते. आता तोच तालिबान पाकिस्तानला फसवत आहे. बलूचिस्तानच्या परिसरात पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर गोळीबाराच्या घटनांमुळे दोन्ही देशांमध्ये चमन स्पिन बोल्डाक क्रॉसिंग एका आठवड्यांपासून बंद आहे.

पाक-तालिबान समस्या
या व्यतिरिक्त पाकिस्तानात तरहीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सध्याच्या दिवस वाद आणि चकमकी या दरम्यानच्या तणावाचे उदाहरण म्हणून दिसत आहे. पाकिस्तानच्या इच्छेनुसार तालिबान टीटीपीवर कारवाई करत नाही आणि टीटीपीची पाकिस्तानी लष्कराशी चकमक होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी तालिबानच्या बिघडत चाललेल्या संबंधांकडे इशारा करत आहे.

Pakistan-Taliban Tension
Pakistan-Taliban Tension

अफगाणिस्तानवर ताबा आणि पाकिस्तानची अपेक्षा
जेव्हा पाकिस्तानने गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यात काबुलवर आपला ताबा मिळवला होता. त्यावेळी पाकिस्तान सर्वाधिक खुश होता. त्याला असे वाटले होते की, त्यांनी ते लक्ष्य गाठले आहे ज्यासाठीच आपण तालिबानला इतकी दशकं पोसले. अशातच स्वाभाविक होते की, पाकिस्तान अशी अपेक्षा करेली की, तो टीटीपीची समस्या अगदी सोप्प्या पद्धतीने सोडवेल.

टीटीपीचा स्वत:चा इतिहास
पाकिस्तानात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा टीटीपीची आपली स्वत:चा इतिहास आहे. डिसेंबर 2014 मध्ये पेशावरमधील लष्करी शाळेत टीटीपीच्या सैनिकांनी हत्याकांड घडवून आणले तेव्हा सशस्त्र दहशतवादाची सर्वोच्च पातळी गाठली गेली. 2007 पासून अस्तित्वात आल्यानंतर टीटीपीने 3000 हून अधिक हल्ल्यांमध्ये 7500 लोक मारले आहेत, त्यापैकी 2500 पोलिस किंवा लष्कराचे लोक आहेत.

तालिबान सत्तेत आल्यानंतर…
तालिबान सत्तेत आल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या कोणत्याही देशाअंतर्गत प्रकरणात कोणत्याही प्रकारची दखल देणे पटत नव्हते. पाकिस्तान-अफगाणिस्तान मध्ये आधीपासूनच सुरु असलेला सीमावाद अद्याप ही कायम आहे. कारण तालिबान डुंरंड लाइनला मानत नाही, जी पाकिस्तान-अफगाणिस्तानची सीमा असल्याचे म्हटले जाते. जेव्हा या सीमेवर कुंपण घातले जाते तेव्हा पुन्हा सीमावाद उभा राहतो. (Pakistan-Taliban Tension)

पाकिस्तानसाठी समस्या वाढतायत
सध्या परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तान आपली सीमा सील करुन अफगाणिस्तानासोबत व्यापाराचे मार्ग बंद करुन त्यांच्यावर दबाव टाकत आहे. जो आधिच आर्थिक रुपात कमजोर आहे. यामुळे पाकिस्तानला अशी अपेक्षा आहे की, तालिबान त्यांच्या सुरक्षिततेसंबंधित मागण्या मानू शकतो. पाकिस्तानचा असा सुद्धा आरोप आहे की, तालिबान पाकिस्तानच्या विरोधात काम करणाऱ्यांना शरण देण्याचे काम करत आहे. तर पश्तून सुद्धा सीमेच्या दोन्ही क्षेत्रांत राहतात. ज्यामुळे आरपार जाणे काही मुश्किल काम नाही, जे स्वत: सीमेला योग्य मानत नाही. टीटीपीसाठी हिच फायद्याची गोष्ट आहे.

हे देखील वाचा- परदेशातील तुरुंगात कोणत्या गुन्ह्याची शिक्षा भोगतायत ११ हजारांहून अधिक भारतीय नागरिक?

पाकिस्तानकडून शांतपणाने बातचीत करण्याचे प्रयत्न विफोल ठरले आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानने टीटीपीच्या विरोधात कठोर पावले उचलेली नाहीत. पाकिस्तानच्या धरतीवरुन अमेरिकेने तालिबानवर हल्ले केले होते. ही बाब अद्याप तालिबान विसरलेला नाही. जरी भरतातून गहू आयात केला जात असल्याच्या गोष्टीवर राग आहे किंवा पाकिस्तानातील राजकीय नेत्यांना न भेटण्याचा निर्णय, तालिबान हा पाकिस्तान पासून दूर होत चालला आहे. तर पाकिस्तानपासून दूर झाल्यास तालिबानला अधिक नुकसान होईल. कारण त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन नाही आहे. एकूणच दोन्ही देशांमधील तणाव हा दोघांसाठी सुद्धा नुकसानदायक ठरत आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.