Home » Guillain barre syndrome : गुलियन बैरे सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा 127 वर

Guillain barre syndrome : गुलियन बैरे सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा 127 वर

by Team Gajawaja
0 comment
Guillain barre syndrome
Share

हातापायाला मुंग्या, श्वास घेताना अडचण आणि खूपच प्रभाव वाढला तर Paralysis.. अशी काहीशी लक्षणं आहेत गुलियन बैरे सिंड्रोम ची, या अनोळखी आणि दुर्मिळ आजाराने महाराष्ट्रात, खासकरून पुण्यात थैमान घातलं आहे. गुलियन बैरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस झालेल्या रुग्णांची संख्या आता 127 वर पोहचली आहे. असा अंदाज आहे. त्यातील काही रुग्णांना व्हेंटिलेटर लावावं लागलं आहे, तर दोन रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या आजाराचे अचानक इतके रुग्ण सापडले असले तरी, या आजाराबद्दल बऱ्याच जणांना काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे हा आजार किती चिंताजनक आहे? आणि तो कसा होतो?, हे जाणून घेऊ. (Guillain barre syndrome)

पुण्यात 9 जानेवारी रोजी जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला होता. तीन आठवड्यांच्या आत जीबीएस रुग्णांची संख्या 127 वर पोहचली आहे. सुरुवातीला 41 वर्षीय चार्टर्ड अकाऊंटंटचा या आजारामुळे मृत्यू झाला. 9 जानेवारी रोजी त्याला फक्त लूज मोशनचा त्रास होत होता. 14 जानेवारी रोजी तो आणि त्याचे कुटुंब सोलापूरला त्यांच्या गावी गेले. औषध घेतल्यानंतर त्याला चांगलं वाटतं होतं. तो स्वत: गाडी चालवत सोलापूरला गेला. पण 17 जानेवारीला त्याला पुन्हा अशक्तपणा जाणवायला लागला. म्हणून दुसऱ्याच दिवशी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. सहा दिवसांनी त्याला बरं वाटायला लागलं म्हणून त्याला सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. अचानक त्याची स्थिती बिघडली आणि तो मरण पावला. हा जीबीएस आजाराने झालेला पहिला मृत्यू.(Guillain barre syndrome)

गुलियन बैरे सिंड्रोम (Guillain barre syndrome) हा एक दुर्मिळ गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे. ज्यामध्ये माणसाच्या पेरिफेरल नव्हर्स सिस्टीम डॅमेज होते. हा आजार झाल्यानंतर आपल्या शिराराला आजारांपासून वाचवणारी जी रोगप्रतिकार शक्ती आहे, ती आपल्याच पेरिफेरल नव्हर्स वर अटॅक करते, म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते. यात नसांना प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाहीत. त्यामुळे मेंदूच्या सूचनांचे पालन स्नायू करू शकत नाहीत आणि इतर शरीराच्या भागांकडून मिळणारे संकेतही कमी होतात. परिणामी, हात पाय अशक्त होतात. हा आजार कशामुळे होतो याबद्दल आद्याप काहीही माहिती नाही. पण दूषित पाणी, अस्वच्छता, शिळं अन्न हे या जीबीएसच्या आता वाढलेल्या प्रादुर्भावाला कारणीभूत. असल्याचे बोलले जात आहे.

जीबीएस हा व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गामुळे होतो. कैम्पिलोबॅक्टर या बैक्टीरियल इंफेक्शनमुळे आपल्याला डायरीया होतो, आणि त्यामुळेच गुलियन बैरे सिंड्रोमची समस्या सुद्धा उद्भवू शकते. या आजाराची लक्षणं काय? तर हात कींवा पायांमध्ये कमजोरी येणं, लकवा मारणं, चालताना त्रास होणं, शरीर कमजोर झाल्यासारखे वाटणं, खूप दिवस डायरियाचा त्रास होणं, हातापायाला मुंग्या येणे. ही या आजाराची प्रमुख लक्षण आहेत. त्याशिवाय हाता पायातील त्राण जाऊन श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होतो. (Marathi News)

या आजारापासून वाचण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने एक पत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही, याची काळजी घेण्याचं आणि दररोज पिण्याचे पाणी बदलून ते पाणी उकळून पिण्याचं आव्हान केलं आहे. यासोबतच, नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न खाण्याचा सल्ला या पत्रकात देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उच्चस्तरीय पथक नेमलं आहे. हे पथक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि व्यवस्थापनात राज्याच्या आरोग्य विभागाला मदत करत आहे. (Guillain barre syndrome)

जीबीएस या आजारावर उपचार महाग आहेत. डॉक्टरांच्या मते, रुग्णांना सहसा इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शनचे कोर्स करावे लागतात. खासगी रुग्णालयात एका इंजेक्शनची किंमत 20 हजार रुपये आहे. रुग्णांना कधी कधी याचे 10 ते 13 इंजेक्शनचा कोर्स करावा लागतो. या आजारावर उपचार महाग असल्यामुळे, पुण्यात या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. पिंपरी-चिंचवडमधील लोकांवर व्हीसीएम हॉस्पिटलमध्ये, तर पुणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांवर कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना पुण्यातील ससून रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. तर राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून या आजारावरील उपचारासाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. याचबरोबर महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतूनही 2 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत.(Guillain barre syndrome)

=================

हे देखील वाचा : Ajjamada Boppayya Devayya महावीर चक्रने सन्मानित अज्जामद बोपय्या देवय्या कोण होते?

=================

हा आजार गंभीर असला तरी, वेळीच उपचार केले तर या लक्षणांची तीव्रता कमी होऊन हा आजार बरा सुद्धा होऊ शकतो. या आजाराची लागण झालेल्या रुग्णाची श्वसनसंस्था कमज़ोर झाल्याने रुग्णाला व्हेंटिलेटर लावावे लागते. यामुळे कधी कधी रुग्णाचं कुटुंबीय घाबरतात. पण अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका. व्हेंटिलेटरवर गेलेले रुग्णांना बरं होण्यासाठी वेळ जरी लागत असला तरी ते पूर्णपणे बरे होतात. जीबीएसने बाधित 80% रुग्ण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही महिन्यात कोणत्याही आधाराशिवाय चालायला सुद्धा लागतात. फक्त घरी गेल्यावर जे अवयव पॅरालाइज्ड असतील, त्यांना दुरुस्त क करण्यासाठी फिजिओथेरपी हा एकमेव उपाय आहे. फिजिओथेरपीने एकुणेक अवयव recover होऊ शकतात. त्यासाठी रुग्णांना रोज नियमित चांगल्या फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली Treatment घ्यावी लागते. (Guillain barre syndrome)

हे बाधित झालेले रुग्ण बरे होतीलच, पण आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊया. अडचण निर्माण व्हायच्या आधीच त्यावर इलाज करूया.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.