Home » अबब! नदीकाठावर हजारो शिवलिंग!  काय आहे यामागचं रहस्य? 

अबब! नदीकाठावर हजारो शिवलिंग!  काय आहे यामागचं रहस्य? 

by Team Gajawaja
0 comment
Share

कर्नाटक राज्यातील सिरसी हा भाग सर्वस्वानं वेगळा आहे. भगवान शंकराची अनेक प्राचीन मंदिरे या भागात आहेत. मात्र यापेक्षाही शिवभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे ते सिरसी जिल्ह्यातून वाहणाऱ्या शाल्मला नदिकाठावर असलेल्या हजारो शिवलिंगांचे. या नदीत हजारो शिवलिंगे आहेत. नदीच्या काठावर असलेली ही हजारो शिवलिंग कधी आणि कोणी केली याबाबत अनेक आख्यायिका या भागात आहेत. मात्र आता या शिवलिंगाच्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (Mystery Behind Thousands Of Shivling In Sahasralinga)

पंधराव्या शतकात स्थापित केलेली ही शेकडो शिवलिंगे अलिकडे झपाट्याने नष्ट होत असल्याची ओरड स्थानिक करीत आहेत. हजारो वर्षांची ही धरोवर चोरुन नेण्यात येत आहे. हा सर्व परिसर नितांत सुंदर आहे. घनदाट जंगल आणि परिसरातील पाण्याचे धबधबे हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत.  तशातच या हजारो शिवलिंगांचे रहस्यही पर्यटकांना खेचून नेते. कदंब वंशाच्या शासकांनी हजारो वर्षापूर्वी नदीकाठी कोरलेली ही शिवलिंग या पर्यटकांच्या नजरेत असून, कोणतीही व्यवस्था नसल्यानं अनेकजण शिवलिंग नेत असल्याच्या घटना होत आहेत. हजारो वर्षापूर्वीचा हा अमुल्य ठेवा जतन करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.  

हिरवाईने नटलेल्या पश्चिम घाटात सिरसी हे उत्तर कन्नडचे हृदय म्हटले जाते. याच घाटातील शाल्मला नदीच्या पात्रावर असलेल्या सहस्र शिवलिंग हे आकर्षणाचे केंद्र आहेत. स्थानिक या शिवलिंगांचा इच्छापूर्ती शिवलिंग म्हणूनही उल्लेख करतात. पावसाळ्याचे चार महिने हा अलमोल खजिना पाण्याखाली असतो.  नदीतील पाणी थोडे खाली जायला लागले की, ही हजारो शिवलिंग समोर येतात. 

सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून येथे भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी होऊ लागते. नदीकाठावर तयार केलेली ही हजारो शिललिंग नेमकी कधी आणि कुणी तयार केली, याबाबत अनेक आख्यायिकाही आहेत.   अभ्यासकांच्या मते, ही 1000 शिवलिंग विजयनगर राज्याचे शासक सदाशिवराय यांनी 1678 आणि 1718 च्या दरम्यान स्थापित केली होती. (Mystery Behind Thousands Of Shivling In Sahasralinga)

राजा सदाशिवराय हे शिवाचे परम भक्त होते. त्यामुळे त्यांनी एक हजार शिवलिंग बनवली. या प्रत्येक शिवलिंगासमोर नंदीही कोरण्यात आला आहे. त्यामुळे जेवढी शिवलिंग आहेत, तेवढीच नंदिंचीही संख्या आहे. काही नंदी तर सहा, बारा फुटापर्यंतही मोठे आहेत. प्रत्येक शिवलिंग वेगळे आहे. त्यांचा आकार ते शिवलिंग ज्या खडकावर कोरले आहे, त्याच्या आकारावर अवलंबून आहे. आता एवढ्या वर्षानंतर नदीच्या पाण्याच्या जोरामुळे, यातील काही शिवलिंगांचा आकार बदलला आहे.  

==========

हे देखील वाचा : विजया दशमीच्या दिवशी दुर्गा देवीला सिंदुर अर्पण का केले जाते?

==========

आणखी एका कथेनुसार राजा सदाशिवरायांनी संतानप्राप्तीच्या इच्छेने शाल्मला नदीत शिवलिंग बांधली.  राजपंडितांनी पुत्रप्राप्तीसाठी राजाला प्रत्येक खडकावर एक शिवलिंग कोरण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार राजानी प्रत्येक खडकावर शिवलिंग कोरली. अशी 1008 शिवलिंग तयार झाली आणि राजाला पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे या शिवलिंगांना ‘इच्छापूर्ती शिवलिंग’ असंही म्हणतात.   

नदिकाठावर प्रत्येक खडकावर एक शिवलिंग आणि समोर नंदी असे दृष्य असले तरी काही खडकावर दोन शिवलिंगही कोरण्यात आलेली आहेत. या प्रत्येक शिवलिंगाची एक कथा असल्याची माहिती स्थानिक देतात. या शिवलिंगाबरोबरच नदिकाठावर असलेल्या नागांच्या प्रतिमाही भाविकांसाठी श्रद्धेचे ठिकाण ठरत आहेत.  मोठ्या उभ्या खडकावर या नागांच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. त्यातीला काही नागांना पाच फणेही आहेत.  (Mystery Behind Thousands Of Shivling In Sahasralinga)

हा सर्व भाग पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या भागात असलेला झुलता दोऱ्यांचा पुलही पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. शाल्मला नदीचा सर्व किनारा हा स्वच्छ, सुंदर असल्यानं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. या सहस्त्र शिवलिंगांच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळते. एरवीही पाऊस कमी झाला की, हा भाग गजबजून जातो. मात्र अलिकडे या शिवलिंगांची संख्या कमी होऊ लागल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. हजारो वर्षाची ही ठेव नीट जोपासली जावी अशी मागणी करण्यात येत आहे.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.