आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर अनेक प्रेरणादायी लोकं दिसतील. ज्यांनी अतिशय कमी वयात खूप काही मिळवले साध्य केले आहे. अनेकदा तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील हे लोकं आपल्या प्रयत्नांच्या आणि मेहनतीच्या जोरावर शक्य करतात आणि यश मिळवतात. (Kaamya Karthikeyan)
सध्या आपण पाहिले तर अशाच एका मुलीची जोरदार चर्चा सुरु आहे, जिने खुपच कमी वयात मोठी आणि अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. मुंबईच्या (Mumbai) काम्या कार्तिकेयनने (kaamya karthikeyan) वयाच्या केवळ १७ वर्षातच (17 Years) एका वेगळाच विक्रम (Record) प्रस्थापित केला आहे. 12वीची विद्यार्थिनी असलेल्या काम्याने सात खंडातील सर्वोच्च शिखरे (Sevan Summits) सर करत एका नवीन विश्वविक्रम केला आहे. असे करणारी ती सर्वात तरुण महिला ठरली आहे. (Kaamya Karthikeyan Seven Summits)
Ms Kaamya Karthikeyan, class XII student at @IN_NCSMumbai, scripts history by becoming the youngest female in the world to scale seven highest peaks across seven continents – Africa (Mt. Kilimanjaro), Europe (Mt. Elbrus), Australia (Mt. Kosciuszko), South America (Mt. Aconcagua),… pic.twitter.com/GyC2bE8LCK
— SpokespersonNavy (@indiannavy) December 29, 2024
मुंबईत नौदलाच्या (Indian Navy) शाळेत शिकणाऱ्या १७ वर्षीय काम्या कार्तिकेयनने जगातील सात खंडातील सात सर्वात उंच शिखरे सर केली आहेत. ही सात शिखरे सर करणारी ती सर्वात कमी वयाची पहिलीच मुलगी ठरली आहे. २४ डिसेंबर (December) रोजी अंटार्क्टिकातील (Antarctic) ‘माउंट विन्सन’ (mount vinson) हे सर्वोच्च शिखर सर करत तिने हा मानाचा बहुमान मिळवला आहे. माउंट विन्सनची चढाई करून काम्याने सेव्हन समिट हे आव्हान पूर्ण केले आहे. गिर्यारोहणमधील (Climbing) ही एक प्रतिष्ठित कामगिरी मानली जाते.
काम्याचे वडील एस. कार्तिकेयन (S. Karthikeyan) हे नौदलात (Indian Navy) कमांडर (Commander) पदावर कार्यरत आहेत. काम्याने त्यांच्याबरोबरीने काम्याने अंटार्क्टिका खंडातील १६,०५० फूट उंचीचे शिखर सर करत गिर्यारोहण क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला आहे. मे २०२४ मध्ये काम्याने माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) हे जगातील सर्वोच्च शिखर दक्षिण बाजूने सर केले होते. असा पराक्रम करणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला आणि दक्षिण बाजूने हे शिखर सर करणारी दुसरी महिला ठरली.
काम्याने आफ्रिकेतील माऊंट किलीमांजरो (ऑक्टोबर २०१७), युरोपातील माऊंट एल्बरस (जून २०१८), ऑस्ट्रेलियातील माऊंट कोस्युस्को (नोव्हेंबर २०१८), दक्षिण अमेरिकेतील माऊंट अकॉनग्वा (फेब्रुवारी २०२०), उत्तर अमेरिकेतील माऊंट डेनाली (फेब्रुवारी २०२२), नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट (मे २०२४) ही सात शिखरे तिने सर केली आहेत.
सगळ्यात तरुण एव्हरेस्ट गिर्यारोहक असलेली काम्या तिचे वडील सीडीआर एस कार्तिकेयन यांच्यांसोबत अंटार्क्टिकाच्या माऊंट व्हिन्सेंटच्या शिखरावर पोहोचले. २४ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी काम्याने सेव्हन समिट चॅलेंज पूर्ण केलं, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.
View this post on Instagram
काम्याने अतिशय कमी वयात अनेक रेकॉर्ड तयार केले. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षांपासून काम्याने गिर्यारोहणाला सुरुवात केली. तिने ट्रेक करून चंद्रशीला शिखर गाठले. त्यानंतर एकामागोमाग अशी अनेक शिखरे ती सर करत गेली. दक्षिण अमेरिकेतील माऊंट अकॉनग्वा शिखरावर जाणारी सर्वात तरुण मुलगी, माऊंट डेनाली शिखरावर जाणारी सर्वात तरुण बिगर- अमेरिकन, माऊंट एल्ब्रसच्या शिखरावरून खाली स्की करणारी ती सर्वात तरुण व्यक्ती ठरली.
यंदा माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर काम्याने अंटार्क्टिकातील माऊंट व्हिन्सेट सर करण्याचे तिचे ध्येय होते जे तिने यशस्वी करून दाखवले. काम्याच्या या जागतिक पराक्रमाबद्दल तिचे आणि तिच्या वडिलांचे शाळेने, नौदलाने अभिनंदन केले आहे. काम्याला ‘पीएम राष्ट्रीय बालशक्ती’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये तिचे कौतुक केले होते.
काम्या कार्तिकेयनने वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी एव्हरेस्ट सर केला होता. तर वयाच्या सातव्या वर्षी उत्तराखंडमध्ये पहिले गिर्यारोहण केलं होते. काम्याच्या या आभाळाएवढ्या यशामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. एवढ्या कमी वयात एवढे मोठे यश संपादन करणाऱ्या काम्याचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होते आहे.
====================
हे देखील वाचा :
Maha Khumbh Mela : महाकुंभमेळ्याला हायटेक सुरक्षेचे कवच
Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !
====================
काम्याने सेव्हन समिटमध्ये सर केलेली शिखरे पुढीलप्रमाणे आहेत.
• माउंट किलीमांजारो (आफ्रिका)
• माउंट एल्ब्रस (युरोप)
• माउंट कोशियुस्को (ऑस्ट्रेलिया)
• माउंट अकॉनकाग्वा (दक्षिण अमेरिका)
• माउंट डेनाली (उत्तर अमेरिका)
• माउंट एव्हरेस्ट (आशिया)
• माउंट विन्सन (अंटार्क्टिका)