Home » मुल्तानी मातीचा असा करा वापर, वाढेल सौंदर्य

मुल्तानी मातीचा असा करा वापर, वाढेल सौंदर्य

चेहऱ्यावरील डाग-पिंपल्सची समस्या दूर करायची असल्यास मुल्तानी मातीचा वापर करू शतता. यामध्ये काही गोष्टी मिक्स केल्यानंतर तुमचे सौंदर्य अधिक खुलले जाते.

by Team Gajawaja
0 comment
Homemade face powder
Share

Multani Mitti Remedies : प्रत्येक महिलेला आपण अधिक सुंदर दिसावे असे वाटत असते. यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण कालांतराने पुन्हा चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. अशातच तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. चेहऱ्यावरील डाग-पिंपल्सची समस्या कमी करण्यासाठी मुल्तानी मातीचा वापर करू शकता. यामध्ये काही गोष्टी मिक्स केल्यानंतर चेहऱ्याला त्याचा फेसपॅक लावल्यास नक्कीच चेहरा उजळ होण्यास मदत होईल.

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी पुढील वस्तूंचा करा वापर
-मुल्तानी माती
-मध
-पपई

असा तयार करा फेसपॅक
-सर्वप्रथम स्मॅश केलेल्या पपईत एक चमचा मुल्तानी माती मिक्स करा.
-आता एक चमचा मध मिक्स करा.
-फेस पॅक अधिक घट्ट झाल्यास यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा
-काही मिनिटे फेस पॅक चेहऱ्याला लावून ठेवल्यानंतर चेहरा धुवा
-काही दिवसात चेहरा उजळ होईल (Multani Mitti Remedies)

मुल्तानी माती आणि पपईच्या फेस पॅकचे फायदे
-एक्ने आणि पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी मुल्तानी माती वापरू शकता.
-चेहऱ्यावरील डेड स्किन आणि तेल कमी होईल.
-मुल्तानी माती त्वचेला आतमधून पोषण देते.
-पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी असते. यामुळे त्वचेवरील डेड स्किन दूर करण्यासह टॅनिंगची समस्या दूर होते.
-पपईत अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे डाग-पिंपल्सच्या समस्येपासून दूर राहू शकता.


आणखी वाचा :
फाउंडेशन लावल्यानंतरच चेहरा जाड दिसतो? जाणून घ्या परफेक्ट शेप देण्याची सोपी पद्धत
तेलकट त्वचेवरील मेकअप निघून जातो? लक्षात ठेवा या टिप्स

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.