Home » मुलायम सिंह यांच्या ‘या’ निर्णयांमुळे नेहमीच त्यांची आठवण येईल

मुलायम सिंह यांच्या ‘या’ निर्णयांमुळे नेहमीच त्यांची आठवण येईल

by Team Gajawaja
0 comment
Mulayam Singh Yadav
Share

मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) असे एक नाव, असा एक चेहरा, असे एक व्यक्तिमत्व ज्यांनी भारताच्या राजकरणातील फार मोठा आखाडा मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील राजकरणात एन्ट्री केली तेव्हा जणू भूकंपच आला होता. वर्ष १९६७ मध्ये मुलायम सिंह यादव यांनी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षात पहिलीच विधानसभेची निवडणूक जिंकली आणि दाखवून दिले की, तेथील राजकरणात आता मुलायम युगाचे आगमन झाले आहे. मुलायम सिंह यांनी आपल्या आयुष्यात काही मोठे निर्णय घेतले. मात्र असे ३ मोठे निर्णय ज्यामुळे त्यांची नेहमीच आठवण काढली जाईल.

मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ मध्ये उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील सैफई गावात झाला होता. वडिलांनी आपला मुलगा मुलायम यांने पहलवान व्हावे असे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे मुलायम सिंह हे लहानपणापासूनच कुस्तीच्या मैदानात कुस्ती खेळण्यास शिकत होते. मात्र त्यांना कधीच माहिती नव्हते की, आपण या कुस्तीच्या मैदानात नव्हे तर राजकरणाच्या मैदानात एन्ट्री करु. अशातच ते उत्तर प्रदेशास राजकरणातील एक दिग्गज नेते झाले.

कुस्तीच्या निर्णयमाने बनवले आमदार
कुस्ती खेळण्याच्या निर्णयामुळे मुलायम सिंह यादव फक्त २८ वर्षातच उत्तर प्रदेशातील आमदार झाले. खरंतर जसवंत नगरात एका कुस्तीच्या स्पर्धेत आमदार नत्थू सिंह यांची नजर मुलायम सिंह यांच्यावर पडली. नत्थू यांना ते आवडले की, त्यांनी वर्ष १९६७ च्या निवडणूकीत जसवंत नगर जागा रिकामी करत मुलायम सिंह यांना तिकिट दिले. मतदानाचे निकाल सर्वांना हैराण करणारे होते. आता येथूनच राजकीय नेता होण्याचा प्रवास सुरु झाला होता.

Mulayam Singh Yadav
Mulayam Singh Yadav

भारतीय लोकदल मध्ये सहभागी होण्याचा निर्णय
युपीच्या राजकरणावेळी स्थिती आणि राजकरणाच्या समीकरणाचे घटनाचक्र पुन्हा एकदा फिरले. १२ नोव्हेंबर १९६७ मध्ये डॉ. लोहिया यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सोशलिस्ट पक्षाची पकड कमकूवत होऊ लागली होती. त्याच दरम्यान प्रदेशात चौधरी चरण सिंह यांचा पक्ष अधिक मजबूत होत होता. मुलायम सिंह त्यावेळी लोकदलात सहभागी झाले.

तर ७० च्या दशकात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील देशात काँग्रेस सरकारच्या विरोधात एक मोठे आंदोलन सुरु झाले होते. मुलायम सिंह यादवच (Mulayam Singh Yadav) नव्हे तर लालू प्रसाद यादव, नितीश कुमार आणि रामविलास पासवान सुद्धा या जेपी आंदोलनात सहभागी झाले. वर्ष १९७५ मध्ये देशात इमरजेंसी लागू करण्यात आली आणि त्या दरम्यान मुलायम सिंह यादव यांना १९ महिन्यांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले होते. मात्र इमरजेंसी संपल्यानंतर देशात सार्वत्रिक निवडणूका झाल्यानंतर १९७७ मध्ये केंद्र आणि उत्तर प्रदेशात जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि मुलायम सिंह राज्य सरकारमध्ये मंत्री झाले.

हे देखील वाचा- भारताचे अर्थमंत्री ते पाकिस्तानचे पंतप्रधान, लियाकत अली खान यांच्य हत्येचे गुढ आजही कायम

नव्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर तीनवेळा झाले मुख्यमंत्री
८० च्या दशकात युपी मधील राजकीय चक्र पुन्ह पलटले आणि चौधरी चरण सिंह यांच्या निधनानंतर राष्ट्रीय लोकदल पक्ष तुटला. याच दरम्यान मुलायम सिंह यादव पहिल्यांदा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले. वर्ष १९९२ मध्ये त्यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला. ज्याला आज समाजवादी पक्ष असे म्हटले जाते. वर्ष १९८९ मध्ये पहिल्यांदाच युपीतील मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांचा १९९३-९५ मध्ये मुख्यमंत्री झाले. तर २००३ मध्ये सुद्धा ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि चार वर्ष आपल्या पदावर कार्यरत होते. तर ८ वेळा आमदार आमि ७ वेळा खासदार राहिले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.