सध्या सर्व व्यवहार हे डिजिटल पद्धतीने केला जातात. त्यामध्ये नेटबँकिंग ते विविध प्रकारचे पेमेंट्स हे फक्त एका क्लिकच्या माध्यमातून अवघ्या काही वेळातच पूर्ण होतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतात ते आता डिजिटल पेमेंट्समुळे फार सोप्पे झाले आहे. मात्र काही वेळेस असे होते की, आपण घाईघाईत एखादे पेमेंट करतो किंवा अकाउंट नंबर हा चुकीचा टाकल्याने ज्या व्यक्तिला पेमेंट करायचे असते ते त्याच्यापर्यंत पोहचत नाही. अशातच जर तुमचे सुद्धा ट्रांजेक्शन हे एखाद्या भलत्याच व्यक्तीला गेले तर काय करावे याबद्दलच आज आपण अधिक जाणून घेणार आहोत.(Money transfer)
एखाद्या व्यक्तीकडून चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रांन्सफर झाल्यास काय करावे?
-तुमचे पैसे हे चुकीच्या खात्यात ट्रांन्सफर झाल्याची तातडीने माहिती बँकेला द्या. त्याचसोबत याबद्दल एक लेखी सुद्धा अर्ज देत ट्रांजेक्शन चुकले आहे त्याबद्दल त्यामध्ये स्पष्ट करा. असे करताना ट्रांजेक्शन केल्याची तारीख, वेळ आणि अपला खाते क्रमांक आणि ज्या खात्यात पैसे ट्रांन्सफर झाले आहेत ते सुद्धा मेंन्शन करा. त्याचसोबत बँकेला असे ही सांगा की, ज्या खात्याच चुकून पैसे गेले आहेत ते फ्रीज करावेत. ज्यामुळे ज्या खात्यात पैसे गेले आहेत ते काढता येणार नाहीत.
-ही सुचना आणि आपला अर्ज हे दोन्ही बँकेला द्या. ज्या बँकेत पैसे ट्रांन्सफर झाले आहेत आणि ज्यामध्ये गेले आहे त्यांना सुद्धा या बद्दल कळवा.
-ज्या बँकेत पैसे ट्रांन्सफर केले आहेत ती बँक दुसऱ्या बँकेकडून रिवर्सल एन्ट्री करण्यासाठी सांगेल आणि तुम्हाला पैसे परत मिळवून देण्यास मदत करेल.
-रिवर्सल एन्ट्री करण्यासाठी सांगितल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे आले आहेत त्या व्यक्तीला बोलावले जाईल. त्याच्याकडून एन्ट्री वेरिफाय करुन घेतली जाईल. तसेच नो ऑब्जेक्शन घेऊन पैसे परत दिले जातील.(Money transfer)
-जर तो व्यक्ती ज्या खात्यात पैसे चुकून ट्रांन्सफर झाले आहेत आणि ते देण्यास नकार देत असेल तर त्याच्या विरोधात कोर्टात केस सुद्धा दाखल केली जाऊ शकते. तसेच बँक सुद्धा यामध्ये मदत करत नसेल तर तुम्ही Ombudsman Scheme च्या अंतर्गत RBI कडे तक्रार करु शकता.
हे देखील वाचा- एकापेक्षा अधिक जणांना EPFO मध्ये नॉमिनी करण्यासाठी जाणून घ्या प्रोसेस

RBI कडे कशी कराल तक्रार?
-आरबीआयमध्ये तक्रार करण्यासाठी तुम्हाला टोल फ्री क्रमांक १४४८ वर तक्रार करता येईल किंवा crpc@rbi.org.in वर सुद्धा ईमेल करु शकता
-ऑनलाईन तक्रार करायची असेल तर तुम्हाला cms.rbi.org.in येथे भेट द्यावी लागेल
-ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी, फोन क्रमांक, आधार कार्ड आणि ज्या बँकेत तक्रार केली आहे त्याची कॉपी सुद्धा द्यावी लागणार आहे.
-आरबीआयकडून तक्रार दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही हे लक्षात ठेवा
-तुमच्या तक्रारीचे निराकरण हे ३० दिवसांमध्ये करण्याचा प्रयत्न केला जातो