Home » भगवान श्रीकृष्णाची द्वारका आणि बिपरजॉय वादळ

भगवान श्रीकृष्णाची द्वारका आणि बिपरजॉय वादळ

by Team Gajawaja
0 comment
Biperjoy Storm
Share

भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची द्वारका नगरी याबाबत अद्यापही सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानं जी नगरी उभारली होती, ती समुद्राच्या पोटात कशी आणि का गडप झाली हे जाणण्यासाठी अनेक शोध मोहीम करण्यात आल्या. द्वारका नगरी ही अतिशय भव्य होती. अगदी डिस्कव्हरी सारख्या चॅनेलच्या माध्यमातूनही द्वारकानगरीचा शोध घेण्यात आला. या सगळ्या शोध मोहिमेत भगवान श्रीकृष्णांच्या द्वारका नगरीचे अवशेषही मिळाले. गुजरातच्या डभारी गावाजवळ अरबी समुद्रात 130 फूट खोलीवर 10 हजार वर्षे जुने अवशेष आढळले.  अरबी समुद्रात सामावून गेलेली ही द्वारका नगरी काही छोटी नव्हती. तिथे हजारो नागरिक राहत होते. एक संपन्न नागरी वस्ती होती. हे सगळं अरबी समुद्रात सामावले गेले कारण त्यावेळी खूप मोठे वादळ या भागात झाल्याचे सांगतिले जाते. या वादळाचा मारा एवढा होता की, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णही आपल्या नगरीला वाचवू शकले नाहीत. हजारो वर्षापूर्वीची ही घटना आता पुन्हा द्वारका नगरीमध्ये चर्चिली जात आहे आणि त्याला कारण ठरले आहे ते बिपरजॉय नावचे चक्रीवादळ. हे चक्रीवदळ भारताच्या समुद्रकिना-यावर धडकणार असे जेव्हा जाहीर केले तेव्हाच त्याचा भीषणतेची कल्पना देण्यात आली होती. या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, हे जाणून लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. बिपरजॉयचा मोठा फटका गुजरातला बसणार आहे. गुजरातच्या कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, जुनागढ आणि मोरबी या किनारी जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Biperjoy Storm)

या बिपरजॉय वादळाची भयानकता जाणवू लागल्यावर अरबी समुद्रात श्रीकृष्णाची द्वारका नगरी हजारो वर्षापूर्वी जेव्हा गडप झाली तेव्हा कशाप्रकारचे वादळ आले असेल, याची कल्पना येऊ लागली आहे. सुमारे 150 किमी वेगाने चक्रीवादळ बिपरजॉय 15 जूनच्या सायंकाळी सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. तेव्हा त्याची भयानकता अधिक वाढणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये समुद्रात उंच लाटा उसळणार असून त्यामुळे समुद्रकिना-यावरील अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे.  यामुळे महाभारतकालीन द्वारका नगरी सर्वात चर्चेत आली आहे. श्रीकृष्णाची द्वारका नगरी अरबी सागरात सामावली असली तरी आता त्याच नावाची दुसरी नगरी समुद्र किना-यावर आहे.  असे सांगण्यात येते की, जेव्हा भगवान श्रीकृष्णाला द्वारका समुद्रात सामावली जाणार असे समजल्यावर त्यांनी त्यातील नागरिकांना सुरक्षितपणे समुद्रकिना-यावर पोहचवले.  त्यांनी तेथेच नवे नगर उभारले आणि तिच आत्ताची द्वारका नगरी.  ही द्वारका नगरी पुन्हा एकदा अशाच एका चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडली आहे. (Biperjoy Storm) 

द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील अख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली.  जरासंधाने मथुरेवर 17 वेळा आक्रमण केले. यात यादवांचे खूप नुकसान झाले, त्यामुळे आपल्या नागरिकांचे सततच्या युद्धापासून संरक्षण करण्यासाठी  समुद्रात भव्य नगरी उभारली. प्रत्यक्ष विश्वकर्मांनी ही नगरी उभारली होती.   या द्वारकेला सोन्याची द्वारका असेही म्हटल्याचा उल्लेख आहे.  ही संपन्न द्वारका नगरी काही वर्षांनी अरबी समुद्रात आलेल्या प्रचंड वादळामुळे समुद्रात सामावली गेली. आता गुजरातच्या समुद्र किना-यावर बिपरजॉय वादळानं घातलेला धुमाकूळ पहाता द्वारकेला समुद्रात सामावून घेणारे चक्रीवादळ किती भयानक असेल याची थोडी कल्पना यायला लागली आहे. (Biperjoy Storm)

भगवान श्रीकृष्णाची द्वारका 1443 च्या सुमारास समुद्राखाली सामावल्याची माहिती आहे. भारतीय पुरातत्व विभाग यावर संशोधन करीत आहे.  भारतीय पुरातत्व विभागाच्या अंडरवॉटर विंगने 2007 मध्ये यासंदर्भात संशोधन केले. काही वर्षांपूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीलाही प्राचीन द्वारकेचे अवशेष समुद्राखाली सापडले होते. अनेक महाद्वारांचे शहर असल्यामुळे या शहराचे नाव द्वारका पडले असे म्हणतात. एका शोधात समुद्राखाली 3 हजार वर्षे जुनी भांडी सापडली आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने येथे संशोधन केले असता नाण्यांसोबत ग्रॅनाइटची रचनाही सापडली आहे.  गुजरातच्या किनाऱ्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आणि 40 मीटर खोलवर अनेक गोष्टी सापडल्या आहेत. ज्यावरून हे द्वारका शहर असल्याचे स्पष्ट झाले आहे.  महाभारत युद्धाच्या 1700 वर्षांनंतर द्वारका नगरी 1443 मध्ये द्वारका नगरी बुडाल्याचा उल्लेख ग्रंथांमध्येही आहे.(Biperjoy Storm)   

========

हे देखील वाचा : संक्रांतीनंतर श्रीराम भक्तांसाठी खुशखबर

========

तेव्हा झालेल्या भयानक वादळाची कल्पना आता द्वारकेच्या नागरिकांना येत आहे. अर्थात द्वारकेवर कितीही भयानक वादळ आलं तरी या नगरीचे कोणतेही नुकसान होणार नाही असा विश्वासही त्यांना आहे. हे बिपरजॉय चक्रीवादळ विनाशकारी बनू नये यासाठी द्वारकाधीश मंदिरावर आणखी एक ध्वज फडकवण्यात आला आहे. बिपरजॉयची तिव्रता आता समुद्रकिना-यावर धडकल्यावर वाढणार की कमी होणार हे काही तासातच स्पष्ट होणार आहे. मात्र त्यामुळे पुन्हा एकदा समुद्रात सामावलेल्या द्वारकेची आठवण आली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.