LIC Investment : एलआयसी एक नाव आहे ज्याच्याबद्दल बहुतांशजणांना माहिती असेल. काही लोक एलआयसी कंपनीचे इंन्शुरन्स प्लॅन खरेदी करतात. काहीजण याच्या शेअर्समध्ये पैसे लावून उत्तम रिटर्न्स घेतात. पण विचार करण्याची बाब अशी की, ज्यावेळी ग्राहक एलआयसी कंपन्यांचे इंन्शुरन्स खरेदी करतात त्यावेळी पैशांचे काय होत असेल? खरंतर, कंपनी इंन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर एक मोठी रक्कम ग्राहकाला देते. पण ही रक्कम त्या योजनेवरही अवलंबून असते की मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील. जाणून घेऊया एलआयसीमध्ये गुंतवणूक केलेला पैसा नक्की कुठे जातो याबद्दल सविस्तर…
येथे जातो गुंतवलेला पैसे
गेल्या वर्षी एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने एकूण गुंतवणुकीपैकी 67 टक्के हिस्सेदारी बॉण्ड्समध्ये लावली आहे. जवळजवळ 4.7 लाख कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. एक लाख कोटी रुपये जवळजवळ वेगवेगळ्या गुंतवणूक प्रॉपर्टीजमध्ये टाकले आहेत. उर्वरित रक्कम म्युचअल फंड्स, सब्सिडियरीज आणि दुसऱ्या डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवली आहे. कंपनी या पैशांचा वापर काहीवेळेस एकाद्या कंपनीची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठीही करते.
किती मोठे आहे नेटवर्क?
लाइफ इंन्शोरन्सचे एक लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. एजेंट्सबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची संख्या 13 लाखांहून अधिक आहे. याशिवाय केवळ पॉलिसीजबद्दल बोलायचे झाल्यास एंडोमेंट, टर्म इंन्शुरन्स, चिल्ड्रेन, पेंन्शन, मायक्रो इंन्शुरन्सअंतर्गत 29 कोट्यावधींच्या पॉलिसीज मार्केटमध्ये आहेत. 31 डिसेंबर 2023 पर्यंत एलआयसीची मार्केटमधील हिस्सेदारी 58.9 टक्के आहे, जी एका वर्षाआधी 65.4 टक्के होती.
एलआयसीचे हे प्लॅन देतात थेट गुंतवणूक करण्याची संधी
एलआयसी इंडेक्स प्लस युनिट लिंक्ड प्लॅन एक रेग्युलर प्रीमियमवर आधारित पर्सनल लाइफ इंन्शोरन्स प्लॅन आहे. जो पर्यंत हा प्लॅन सुरू राहतो तोवर गुंतवणूकदारांना बचतीची संधी मिळते. यामध्येही दोन पर्याय मिळतात. त्यापैकी एक म्हणडे फ्लेक्सी ग्रोथ फंड आणि फ्लेक्सी स्मार्ट ग्रोथ फंडचा समावेश आहे. यामध्ये केलेल्या गुंतवणूकीमधील तुमचा पैसा अप्रत्यक्षितरुपात मार्केटमध्येच जातो.