पृथ्वीला लघुग्रहांचा सतत धोका असतो. नासा आणि इतर अंतराळ संशोधन संस्था टेलिस्कोपच्या माध्यमातून पृथ्वीच्या कक्षेत येणा-या लघुग्रहांवर नजर ठेवत असते. हे लघुग्रह पृथ्वीपासून किती अंतरावरुन जातात, यावरही पृथ्वीवरील तमाम सजीवांचे जीवन अवलंबून आहे. आता आपल्या पृथ्वीला अशाच एका मोठ्या लघुग्रहाचा धोका निर्माण झाला आहे. पृथ्वीच्या दिशेनं आतापर्यंतच्या सगळ्यात मोठा लघुग्रह अत्यंत वेगानं येत असल्याचा खुलासा नासानं केला आहे. 28000 किमी प्रति तास वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत असून यासाठी नासाने धोक्याची जाणीव करुन दिली आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं ज्या वेगानं येत आहे, त्यामुळे पृथ्वीवर याची टक्कर होऊ शकते, अशी शक्यता नासातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. असे झाल्यास पृथ्वीवर मोठी हानी होण्याची शक्यता नासातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. (Largest Asteroid)

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत असल्याचा इशारा दिला आहे. नासानं यासंदर्भात एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, या लघुग्रहाची लांबी आणि रुंदी सुमारे 600 फूट आहे. नासाच्या म्हणण्यानुसार त्याचे नाव Asteroid 2023 HO6 आहे. हा अपोलो समूहाचा लघुग्रह असल्याचे नासानं स्पष्ट केलं आहे. (Largest Asteroid)
600 फूट लांबीचा हा लघुग्रह ताशी 28 हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. यातील गंभीर गोष्ट म्हणजे, या लघुग्रहाचा वेग पाहता तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरही आदळण्याची शक्यता आहे. सौरमालेत सुमारे 13 लाख लघुग्रह फिरत असतात. सूर्यमालेत ग्रह, चंद्र, लघुग्रह आणि धूमकेतू सूर्याभोवती हे लघुग्रह फिरतात. त्यातीलच एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. त्याचा वेग आतापर्यंत आलेल्या लघुग्रहांपेक्षा अधिक असल्यानं नासानं चिंता व्यक्त केली आहे. या लघुग्रहासंदर्भात मिनिट नाही तर सेकंदाचा हिशोब नासातर्फे ठेवण्यात येत आहे. त्यासाठी नासाची एक स्वतंत्र टीम बनवण्यात आली असून ही टीम चोवीस तास या लघुग्रहावर नजर ठेवत आहे. (Largest Asteroid)
लघुग्रह हे गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे ते सूर्याला बांधलेले असतात. मात्र, अनेक वेळा यातील काही लघुग्रह खंडित होऊन ते पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात. यावेळी त्यांचा वेग अधिक असतो, त्यामुळे हे लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असते. नासा अशा लघुग्रहांवर सतत लक्ष ठेवते. गेल्या काही महिन्यांपासून लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मुख्यतः एप्रिल महिन्यातही असाच एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं आला होता. मात्र त्या लघुग्रहापेक्षा आता पृथ्वीच्या दिशेनं येणारा लघुग्रह आकारानं मोठा आहे, आणि त्याचा वेगही अधिक आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, जर लघुग्रहाचा आकार 150 फुटांपेक्षा जास्त असेल तर तो पृथ्वीसाठी धोका मानला जातो. अशा लघुग्रहाची पृथ्वीवर टक्कर झाल्यास मोठा विनाश होऊ शकतो. नासाच्या म्हणण्यानुसार, जर पडणाऱ्या लघुग्रहाचे अंतर पृथ्वीपासून 7.5 दशलक्ष किलोमीटर असेल तर ते पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकते. सध्या पृथ्वीच्या दिशेने वेगाने जाणारा लघुग्रह 20 लाख किलोमीटरच्या जवळ आला आहे. एप्रिल महिन्यातही असाच एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं आला होता. या लघुग्रहाबाबतही नासानं धोक्याचा इशारा दिला होता आणि खास प्लॅनेटरी डिफेन्स कॉर्डिनेशन नावाचा विभाग सुरु केला. यामधूनच पृथ्वीच्या दिशने येणाऱ्या लघुग्रहांची माहिती दिली जाते आणि त्या लघुग्रहांना ट्रॅक केलं जातं. नासा तसंच इतर रिसर्च सेंटर्स लघुग्रहांचा धोका ओळखण्यासाठी विशेष टेलिस्कोप वापरतात. (Largest Asteroid)
=======
हे देखील वाचा : पावसाळ्यात AC चे तापमान ऐवढे ठेवा, अन्यथा…
=======
अंदाजे एक दशलक्ष ज्ञात लघुग्रहांपैकी सर्वात मोठी संख्या मंगळ आणि गुरूच्या कक्षेदरम्यान आहे. किरकोळ ग्रहांचे साधारणपणे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते : C-प्रकार, M-प्रकार आणि S-प्रकार. त्यांची नावे अनुक्रमे कार्बनी, धातू आणि सिलिसियस रचनांच्या नावांवर ठेवली जातात. मुख्य पट्ट्यातील बहुतेक लहान ग्रह किंचित लंबवर्तुळाकार, स्थिर कक्षाचे अनुसरण करतात, पृथ्वीच्या दिशेने फिरतात आणि सूर्याभोवती संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्यांना तीन ते सहा वर्षे लागतात. गॅलिलिओ अंतराळयानाने लघुग्रहाचे पहिले जवळून निरीक्षण केले. त्यानंतर नासानं या लघुग्रहांसाठी विशेष विभाग चालू केला. आता पृथ्वीच्या दिशेनं येणारा हा लघुग्रह नेमका कोणत्या दिवशी पृथ्वीच्या कक्षेत येईल याची अचूक तारीख काढण्यासाठी नासा त्या लघुग्रहाच्या वेगाचा अधिक अभ्यास करीत आहे.
सई बने