भारतात काही पंतप्रधानमंत्र्यांनी देशाची दिशा बदलण्याचे काम केले. लाल बहादुर शास्री (Lal Bahadur Shastri) सुद्धा त्यापैकीच एक पंतप्रधान होते. त्यांच्या काळात देशात काही बदल घडून आले आणि बहुतांश बदलावांचा पाया रचला गेला. त्यांनी नेहरु युगाच्या अंतानंतर देशातील कारभार सांभाळला आणि जेव्हा देशात बदल घडून येत होता. त्याचसोबत देशात काही स्तरांवर बदल घडून आणण्याची ही गरज होती. जेव्हा पाकिस्तानने भारताच्या विरोधात हल्ला केला तेव्हा लाल बहादुर शास्रींनी उत्तमपणे त्याचे नेतृत्व केले. पण लाल बहादुर शास्रींचा खरंच रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला होता?
मुश्किल स्थितीत बनले पंतप्रधान
२७ मे १९६४ मध्ये देशातील पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर लाल बहादुर शास्री यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडले गेले. तर ९ जून १९६४ रोजी त्यांनी भारताचे दुसऱ्या पंतप्रधानांचा कारभार सांभाळला. १९६२ मध्ये चीनसोबतच्या युद्धात पराभव झाल्यानंतर नेहरु खुप निराश झाले होते. याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला होता. नेहरु यांच्या निधनानंतर एका वर्षाच्या आतमध्येच पाकिस्तानने भारताच्या वाईट परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि १९६५ मध्ये भारताच्या विरोधात युद्ध छेडले.
जगाच्या अपेक्षेविरुद्ध घडले
गांधीजींच्या सिद्धांतवर चालणारे शास्री जीं बद्दल पाकिस्तानचे संपूर्ण अनुमान चुकीचे ठरले. त्यांना असे वाटत होते की, शास्री जी एक कमकुवत पंतप्रधान असतील. मात्र त्यांनी याच्या उलट पाकिस्तानला असा धडा शिकवला की, ज्याची जगाने अपेक्षाच केली नव्हती. त्यानंतर हे युद्ध संपवण्यासाठी जगातील मोठ्या देशांना पुढाकार घ्यावा लागला.
रहस्यमयी स्थितीत मृत्यू
१९६५ मध्ये भारता-पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला करत सडेतोड उत्तर देत लाहौर पर्यंत घुसखोरी केली होती. त्यानंतर ताशकंद मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान आयुब खान आणि लाल बहादुर शास्री यांनी युद्ध संपवण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. असे केल्यानंतर ताशकंदमध्ये ११ जानेवारी १९६६ रोजी शास्रींचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला होता.
शिक्षकाचा मुलगा
लाल बहादुर शास्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराय मधील कायस्थ परिवारात झाला होता. त्यांचे वडिल मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव हे प्राथमिक विद्यालयात शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी महसूल विभागात क्लर्कची नोकरी केली. परिवारातील सर्वाधिक लहान मुलगा असल्याने लाल बहादुर शास्रींना नन्हे असे सर्वजण हाक मारायचे. दीड वर्षाचे लाल बहादुर शास्री असताना त्यांचा वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांचे निधन आणि त्यानंतर आजोबांचे निधन झाल्याने त्यांच्या काकांनी त्यांचे पालनपोषण केले. काशी विद्यापीठात सिक्षणादरम्यान, त्यांनी आपले आडनाव श्रीवास्तव हटवून शास्री केले होते.
कमजोर दिसत होता देश
भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर शास्रींनी (Lal Bahadur Shastri) सर्वात प्रथम प्राथमिकता देशाच्या खाद्य संकटाला दिली. त्यांनी त्याच्यावर तोडगा कसा काढायचा हे सांगितले. त्यावेळी देशात खाद्यपदार्थांच्या किंमती खुप वाढल्या होत्या. तसेच देश कठीन काळाचा सामना करत होता. भांडवलदारांना देशावर वर्चस्व गाजवायचे होते. चीन सोबत पराभव झाल्यानंतर पाकिस्तान या काळाला एक संधी म्हणून पाहत होता. त्याने ही फायदा मिळावा म्हणून १९६५ मध्ये एअर स्ट्राइक करण्यास सुरुवात केली होती.
हे देखील वाचा- परमीवर चक्र मिळवणारे अल्बर्ट एक्का कोण?
शास्रींची ती घोषणा
शास्रींनी देशाच्या अशा परिस्थितीत एक कणखर नेतृत्वाप्रमाणे काम केले. जय जवान, जय किसान अशा घोषणा देत देशातील जनतेमध्ये एक मोठा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले. देशातील लोकांनी सुद्धा संकटाच्या काळात शास्रींना साथ दिली. भारतीय सैन्याने आपल्या पंतप्रधानांना प्रोत्साहन देण्यास कोणतीच कसर सोडली नाही आणि पाकिस्तानच्या बहुतांश जमिनीवर ताबा मिळवत लाहौर पर्यंत पोहचले.
मद्रास राज्यातील हिंदीविरोधी चळवळ शांत करणे असो, वर्गीस कुरियन यांना गुजरातमध्ये श्वेतक्रांती सुरू करण्यासाठी प्रेरित करणे असो किंवा हरित क्रांतीला प्रोत्साहन देणे असो, या सर्व प्रकरणांमध्ये त्यांचे नेतृत्व केवळ दिसून आले नाही. देशाची अन्नाची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक वेळचे जेवण सोडण्याचे आवाहन केले, त्याचाही लक्षणीय परिणाम झाला. मात्र त्यांचे नेतृत्व देशाला फार काळ पाहता आले नाही.