Home » INS Vikrant : म्हणून INS विक्रांत समोर पाकिस्तानची तंतरते !

INS Vikrant : म्हणून INS विक्रांत समोर पाकिस्तानची तंतरते !

by Team Gajawaja
0 comment
Share

1971 चं युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता. पूर्व पाकिस्तानात, म्हणजेच आजच्या बांगलादेशात, पाकिस्तानी लष्कराने क्रूर अत्याचार सुरू केले होते. त्यामुळे लाखों लोक पाकिस्तानातून भारतात येत होते. त्यामुळे भारत पाकिस्तानात युद्ध अटळ झालं होतं. भारतीय नौदलाने आपलं सर्वात शक्तिशाली हत्यार समुद्रात उतरवलं – INS विक्रांत! ही विमानवाहू युद्धनौका बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आली, जिथे तिच्या मदतीने चटगांव, कॉक्स बाजार, खुलना आणि मोंगला या पूर्व पाकिस्तानातील बंदरांवर हल्ले चढवले. सी हॉक आणि अलिझे विमानांनी पाकिस्तानी जहाजं आणि बंदर उद्ध्वस्त केलं. विक्रांतच्या सामर्थ्याने पाकिस्तानला समुद्रमार्गे कोणतीही मदत मिळणं अशक्य झालं. (INS Vikrant)

या युद्धात विक्रांतवर असलेल्या जवानांना दोन महावीर चक्र आणि बारा वीर चक्र मिळाले. हा होता भारताच्या पहिल्या INS विक्रांतचा पराक्रम, ज्याने बांगलादेशाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली. आज आपण जाणून घेणार आहोत नव्या, अत्याधुनिक INS विक्रांतबद्दल नवीन INS विक्रांत 2022 मध्ये कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे पूर्णपणे स्वदेशी टेक्नॉलॉजीने बनवलं गेलं. यात 76% स्वदेशी पार्ट्स वापरले गेले. , जे भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचं प्रतीक आहे. काही दिवसांपूर्वी एक न्यूज viral झाली ज्यात दावा करण्यात आला की ins विक्रांतने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला. आता हि फेक न्यूज होती, पण ही न्यूज ऐकून सुद्धा पाकिस्तानची तंतरली असेल.. एवढी पॉवरफूल आहे ins विक्रांत ! (Latest Updates)

INS विक्रांत म्हणजे केवळ एक युद्धनौका नाही, तर समुद्रात तरंगणारं एक शहर आहे! याची लांबी आहे 262 मीटर, रुंदी 62 मीटर आणि वजन सुमारे 45,000 टन. यात 14 मजले आहेत आणि 1,700 सैनिक यावर कार्यरत असतात. याची गती आहे 28 नॉट्स, म्हणजेच सुमारे 52 किलोमीटर प्रति तास. युद्धनौकेत असलेले चार गॅस टर्बाइन इंजिन्स तिला इतकी ताकद देतात की ती 45 दिवस सतत समुद्रात राहू शकतं. विक्रांतची खरी ताकद आहे त्याची विमानवाहू क्षमता. विक्रांतवर एकाच वेळी 30 विमानं आणि हेलिकॉप्टर्स उतरवता येतात. यात मिग-29K लढाऊ विमानं, कामोव-31 हेलिकॉप्टर्स, MH-60R पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर्स, आणि स्वदेशी ALH ध्रुव हेलिकॉप्टर्स सामील आहेत. मिग-29K विमानं 850 किलोमीटरच्या रेंजसह शत्रूच्या हवाई तळांवर आणि बंदरांवर हल्ला करू शकतात. कामोव-31 हेलिकॉप्टर्स हवेतून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवतात, तर MH-60R पाणबुड्यांविरुद्ध कारवाई करतात. विक्रांतच्या हॅंगरमध्ये 20 विमाने ठेवता येतात, आणि दोन 30 टन वजनाच्या लिफ्ट्स विमानांना फ्लाइट डेकवर आणतात. हाचं फ्लाइट डेक 12,500 चौरस मीटरचं आहे, म्हणजेच सुमारे अडीच हॉकी मैदानाएवढा. (INS Vikrant)

विक्रांतची सेक्युर्टी सिस्टम सुद्धा अभेद्य आहे. यात चार ओटोब्रेडा तोफा आहेत, ज्या लांबून येणाऱ्या जहाजांंवर हल्ले करायला वापरल्या जातात, तर AK-630 क्लोज-इन वेपन सिस्टम ही, शत्रूच्या मिसाईल्संना हवेतच उडवते. त्याचबरोबर विक्रांतकडे दोन व्हर्टिकल लॉन्च सिस्टम्स आहेत, ज्या मधून बराक-1 आणि बराक-8 या 64 मिसाइल्स सोडता येतात. बराक-1 लहान पल्ल्याच्या हल्ल्यांपासून वाचवतो, आणि बराक-8 लांब पल्ल्याच्या हवाई हल्ल्यांना थोपवतो. म्हणजे आकाशातून किंवा पाण्यातून शत्रूने हल्ला केला, तर विक्रांत त्याला सहज उलथवू शकतो. आता प्रश्न येतो – जर भारताने INS विक्रांतच्या मदतीने पाकिस्तानवर हल्ला केला तर काय होईल? सध्याच्या परिस्थितीत, 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. (Latest Updates)

=======

हे देखील वाचा : Buddha Purnima : बुद्ध पौर्णिमा

India : भारत-पाकमध्ये शस्त्रसंधी, जाणून घ्या शस्त्रसंधी म्हणजे काय?

=======

जर INS विक्रांतने अरबी समुद्रातून पाकिस्तानच्या कराची किंवा ग्वादर बंदरांवर हल्ला चढवला, तर त्याचा परिणाम भयंकर असेल. विक्रांतच्या मिग-29K विमानं कराची बंदर, जे पाकिस्तानच्या 70% व्यापाराचं केंद्र आहे, आणि मसूर किंवा सरगोधा यांसारख्या हवाई तळांवर हल्ले करू शकतात. यासोबतच, विक्रांतच्या कोलकाता-क्लास डिस्ट्रॉयर्स आणि कलवरी-क्लास पाणबुड्यांनी ब्रह्मोस आणि एक्सोसेट मिसाईल्स पाकिस्तानी युद्धनौका आणि बंदर उद्ध्वस्त करू शकतात. पाकिस्तानच्या नौदलाकडे सध्या कोणतीही विमानवाहू युद्धनौका नाही, आणि त्यांच्या जुन्या अगोस्ता-90B पाणबुड्या विक्रांतच्या सामर्थ्यापुढे टिकू शकणार नाहीत. यामुळे भारत समुद्रात पूर्ण वर्चस्व मिळवू शकतो, ज्यामुळे पाकिस्तानची आर्थिक आणि लष्करी कोंडी होईल. (INS Vikrant)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.