सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त आयपीएल सामनेच गाजताना दिसत आहे. दरवर्षी मार्च महिना सुरु झाला की, वेध लागतात ते आयपीएलचे. या क्रिकेट फॉरमॅटचे फॅन नाही असे मंडळी तर शोधून देखील सापडणार नाही. काही समोरून तर काही अडून अडून आपल्या टीमला सपोर्ट करताना दिसतात. आता देखील आयपीएल ऐन रंगात आलेले आहे. प्रत्येक टीममध्ये सुरशीची लढाई होताना दिसत असून, सतत प्रत्येक टीम दुसरी टीमला धोबीपछाड करत आहे. टेबल पॉइण्टमध्ये देखील सतत बदल होत आहे. त्यामुळे आताच आपण यंदाचा सिझन कोण जिंकेल याबद्दल काहीच बोलू शकत नाही.(IPL 2025)
मात्र आयपीएल मॅचेस टीव्हीवर पाहताना अनेकदा बरेच लोकांना एक प्रश्न पडत आहे. जर तुम्ही पण नीट मॅचेस पाहिल्या असतील तर तुमच्या देखील लक्षात आले असेल की, जेव्हा कोणता बॉलर डॉट बॉल टाकतो तेव्हा स्क्रीनवर एक प्रत्येक डॉट बॉलसाठी हिरव्या झाडाचं सिम्बॉल पाहायला मिळत आहे. एरव्ही डॉट बॉलच्या इथे शून्य दिसायचा मात्र आता झाडांचं सिम्बॉल का? यामागे एक मोठे आणि अतिशय महत्वाचे कारण आहे. चला जाणून घेऊया आयपीएलच्या या कौतुकास्पद पावलाबद्दल.(IPL News)
टीव्हीवर स्कोअर ग्राफिक्सवर असे झाड देण्यामागचं नेमक कारण जाणून घेण्याआधी आपण हे जाणून घेऊया की, असे झाडाचे ग्राफिक्स देण्यामागचा विचार नक्की कोणाचा आणि का आहे? या सर्व स्तुत्य चळवळी मागचे कर्ताधर्ता बीसीसीआय आणि टाटा ट्रस्ट (BCCI And TATA) हे आहेत. आता आम्ही चळवळ हा शब्द का वापरला? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर पुढे मिळेल. या गोष्टीचा थेट संबंध सामाजिक बांधिलकीशीदेखील जोडलला आहे. (Top Marathi News)
स्कोअर ग्राफिक्सवर येणाऱ्या हिरव्या झाडांचे चिन्ह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या हरित उपक्रमाचा एक भाग आहे. यासाठी बीसीसीआयने टाटा समूहासोबत हात मिळवणी केली असून इंडियन प्रीमियर लीगमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक डॉट बॉलसाठी ५०० झाडे लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. हा उपक्रम २०२३ पासून अंमलात आणला जात असून मागील तिन्ही हंगामात बोर्डाने हा उपक्रम उत्तमपद्धतीने राबवला आहे. (Top Trending News)
=========
हे देखील वाचा : Sadanand Date : पहिला कसाब आता तहव्वूर राणा !
==========
२०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वालिफायर १ मध्ये ८४ डॉट बॉल टाकले होते. ज्यानंतर ४२ हजार रोपे लावण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सामन्यानंतर ट्विटरद्वारे दिली होती. मागीलवर्षी डिसेंबरमध्ये, बीसीसीआयने घोषणा केली की त्यांच्या ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत ४ लाख झाड बेंगळुरूमध्ये नव्याने स्थापन झालेल्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे लावण्यात आले आहे.(Top Marathi Sports News)