Home » Dr. Ambedkar : भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr. Ambedkar : भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dr. Ambedkar
Share

आज सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी इंदोरमध्ये झाला. या दिवसाला भीम जयंती असेही म्हणतात. ‘भारतीय संविधानाचे जनक’ डॉ. भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार नव्हे तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते. डॉक्टर आंबेडकर हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व होते. ते एक कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक देखील होते. (Dr. Ambedkar)

डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांविरुद्धचा भेदभाव दूर करण्यासाठी आणि महिला व कामगारांच्या हक्कांच्या लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, म्हणूनच त्यांच्या जयंतीला ‘समानता दिन’ म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी ‘शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ हा महत्वाचा संदेश लोकांना दिला ज्यामुळे आजही अनेकांना प्रेरणा देखील मिळते. (Dr. Ambedkar Jayanti)

आंबेडकरांनी जात, वंश, धर्म आणि संस्कृतीचा विचार न करता लोकांना समान अधिकार दिले. त्यांनी दलितांच्या शिक्षण आणि मूलभूत कल्याणासाठीही काम केले. पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक उपलब्धता आणि दलितांना हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्यांनीच  लढा दिला होता. आंबेडकरांनी कायम आपल्या विचारांनी जगाला प्रेरणा देण्यासोबतच प्रत्येकाला विचार करण्याची वेगळी दिशा देखील दिली. (Top Marathi News)

=========

हे देखील वाचा : IPL 2025 : प्रत्येक डॉट बॉल ऐवजी झाडाचं चित्र का?

==========

Dr. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुमारे ९ भाषांचे ज्ञान होते. त्यांच्याकडे तब्बल ३२ पदव्या होत्या. एवढेच नाही तर ते परदेशात जाऊन अर्थशास्त्रात पीएचडी करणारे पहिले भारतीय देखील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. आपला राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्यात अशोक चक्र स्थापित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच केले होते. १९५६ मध्ये डॉ. आंबेडकरांनी त्यांचा धर्म बदलला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिशय महान आणि आभाळाएवढ्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी भारत सरकारकडून त्यांना एप्रिल १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. (Top Trending News)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व हे आजही अनेकांना प्रेरित करते. त्यांनी सर्व संकटांना सामोरे जात आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी परदेशात जाऊनही शिक्षण घेतले. त्यांचे विचार आजही अनेक तरूणांना प्रेरणा देतात. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार. (Social News)

– “शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा.”

– “मी अशा धर्मावर विश्वास ठेवतो जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता शिकवतो.”

– “आपण प्रथम आणि अखेर भारतीय आहोत.”

– “संविधान हे केवळ वकिलांचे दस्तऐवज नाही; ते जीवनाचे एक दृष्टिकोन आहे.”

– “जो माणूस मरेपर्यंत शिकत नाही तो मेलेला असतो.”

– “माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान बनतो.”

Dr. Ambedkar

– “जर आपण एकजूट राहिलो नाही तर आपल्यावर पुन्हा गुलामगिरी लादली जाईल.”

– नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.

– दुसऱ्याच्या सुख दुखाःत भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.

– हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.

– शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

=========

हे देखील वाचा : Sadanand Date : पहिला कसाब आता तहव्वूर राणा !

==========

– उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका.

– बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

– “जी व्यक्ती स्वतःचा मान राखत नाही, तिचा कोणीही मान ठेवत नाही.”


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.