पुढच्याच महिन्यात संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा कुंभमेळा प्रयागराज येथे साजरा होत आहे. युनेस्कोने कुंभमेळ्याला ‘जागतिक सांस्कृतिक वारसा’ घोषित केले आहे. दर १२ वर्षांनी येणार हा कुंभमेळा म्हणजे हिंदू लोकांचा सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे. या कुंभमेळ्यामधे जगभरातून अनेक साधू, संत, महंत येतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण असते नागा साधू. आपण पाहिले असेल तर आधी या कुंभमेळ्यामधे फक्त साधूच दिसायचे मात्र आता काही वर्षांपासून कुंभमेळ्यामधे महिला नागा साधू अथवा साध्वी देखील सर्रास दिसतात.
महिला नागा साधूंविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. सुरुवातीला महिला नागा साधूंना महाकुंभ मेळ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी मोठा विरोध झाला होता. परंतु २०१३ मध्ये महिला नागा साध्वींना स्नान आणि आखाडा बनवण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर महिला नागा साध्वी या कुंभमेळ्यांमध्ये दिसतात. फक्त कुंभ मेळ्यातच दिसणाऱ्या या महिला नागा साधू नंतर कुठे जातात याबाबत अनेकांच्या मनात प्रचंड कुतुहल असते. त्यामुळे महिला या नागा साधू कशा बनतात.
मात्र तुम्हाला माहित आहे का की, महिला नागा साधू बनणे अजिबातच सोपे नाहीये. महिला नागा साध्वी बनण्यापूर्वी त्या महिलेला स्वतःला सिद्ध करावे लागते. तिला अनेक परीक्षा पास कराव्या लागतात. त्या महिलेला कुटुंब आणि समाजाशी कोणतेच संबंध ठेवता येत नाही. कोणत्याही मोहात ती अडकता कामा नये. ती फक्त देवाच्या भक्तीमध्ये राहण्यास तयार आहे. या गोष्टीची शहनिशा केल्यानंतर महिलेला नागा साधू बनण्याची दीक्षा दिली जाते.
जेव्हा एखादी स्त्री नागा साधू बनते तेव्हा सर्व साधू आणि साध्वी तिला आई म्हणू लागतात. ६ ते १२ वर्षे कठोर ब्रह्मचर्याचं पालन केल्यानंतर त्यांना नागा साध्वी होण्याची अनुमती देण्यात येते. माई बडा, हा आखाडा आहे ज्यामध्ये महिला नागा साधू आहेत, प्रयागराजमधील २०१३ च्या कुंभमध्ये, माई बडाला दशनम सन्यासिनी आखाडा असे नाव देण्यात आले. स्वत:चं मुंडन केल्यानंतरच त्यांना साधू बनण्याची दीक्षा देतात.
नागा ही उपाधी आहे. वैष्णव, शैव आणि उदासीन हे तिन्ही पंथांचे साधूंचे आखाडे तयार करतात. पुरुष साधूंना सार्वजनिक ठिकाणी नग्न होण्याची परवानगी आहे. परंतु, महिला साधू तसे करू शकत नाहीत. नागामध्ये अनेक वस्त्रधारी आणि अनेक दिगंबर (निर्वस्त्र) आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा स्त्रियांना संन्यासाची दीक्षा दिली जाते तेव्हा त्यांना नागा बनवले जाते. परंतु, ते सर्व कपडे घातलेले असतात. महिला नागा साधूंना त्यांच्या कपाळावर तिलक लावावा लागतो. त्यांना फक्त एकच कापड घालण्याची परवानगी आहे, जे गेरू रंगाचे आहे.
नागा साधू बनवण्यापूर्वी स्त्रीच्या मागील आयुष्याची माहिती मिळवली जाते जेणेकरून ती पूर्णपणे देवाला समर्पित आहे की नाही आणि ती नागा साधू बनून कठीण साधना करू शकेल की नाही हे कळू शकेल. आखाड्यातील स्त्री साधूंना माई, अवधूतानी किंवा नागीन म्हणतात. ज्या महिलेला नागा साधू व्हायचे आहे त्या महिलेला आपल्याच हातानं आपलं पिंडदान करावं लागतं.पिंडदान केल्यानंतर या महिलेचा बाहेरील जगाशी संबंध संपूर्णरित्या तुटतो.