Home » KGF सिनेमाच्या कथेप्रमाणे नव्हे तर खऱ्या घटनांवर आधारित आहे याचा इतिहास

KGF सिनेमाच्या कथेप्रमाणे नव्हे तर खऱ्या घटनांवर आधारित आहे याचा इतिहास

by Team Gajawaja
0 comment
KGF Real Story
Share

आपण सर्वांनी केजीएफ हा सिनेमा पाहिलाच असेल. त्याची कथा ही सर्वांच्या पसंदीस पडली खरी. पण आज आपण खऱ्या केजीएफ म्हणजेच ‘कोलार गोल्ड फील्ड्स’ बद्दल अधिक जाणून घेणार आहोत. केजीएफ हे कर्नाटकातील दक्षिण पूर्वेला एका ठिकाणी आहे. याचा इतिहास फार जुना आणि खास आहे. केजीएफच्या सिनेमात आपण कन्नड सुपरस्टार यश, संजय दत्त, रवीना टंडन आणि प्रकाश राज यांच्यासह काही अन्य कलाकार ही झळकले होते.(KGF Real Story)

परंतु खऱ्या घटनांवर आधारित असलेल्या केजीएफचा इतिहास हा ऐकण्यासारखा आहे. खरंतर दक्षिण कोलार जिल्ह्यातील मुख्यालयापासून ३० किमी दूरवर रोबर्ट्सनपेट एक जिल्हा आहे. येथेच ती खाण आहे. बंगळुरु-चेन्नई एक्सप्रेस वे पासून १०० किमी दूर केजीएफ टाउनशिप आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ष १८०४ मध्ये एशियाटिक जर्नल मध्ये कोलार गोल्ड फील्ड्स म्हणजेच केजीएफ बद्दल चार पानांचे एक आर्टिकल छापले होते. या आर्टिकलमध्ये कोलार मध्ये आढळून येणाऱ्या सोन्याबद्दल सांगितले होते. वर्ष १८७१ मद्ये ब्रिटिश सैनिक मायकल फिट्सजगेराल्ड लेवेलीने जेव्हा हे आर्टिकल वाचले तेव्हा त्यांना त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यानंतर लेवेलीने केजीएफ बद्दल माहिती एकत्रित करण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांच्यासोबत ब्रिटिश सरकारचे लेफ्टिनेंट जॉन वॉरेन यांचा रिपोर्ट आला.

वॉरेन यांच्या रिपोर्टमध्ये असे सांगितले होते की, वर्ष १७९९ मध्ये टीपू सुल्तानाच्या मृत्यूनंतर हा परिसर मैसूर राज्याला दिला गेला होता. मात्र कोलारची जमिन सर्वेसाठी आपल्याकडे ठेवली होती. वॉरेनला जेव्हा या बद्दल कळले तेव्हा चोल साम्राज्यातील लोक येथे जमिनीला हाताने खोदून सोनं काढायचे. तेव्हा सोन्याबद्दल माहिती देणाऱ्यांना बक्षिस देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर कोलार गावातील लोक बैलगाडीच्या माध्यमातून वॉरेनजवळ पोहचले. त्यांनी बैलगाडीला लागलेल्या मातीला धुतले तेव्हा सोन्याचे अंश निघाले.

KGF Real Story
KGF Real Story

त्यानंतर वॉरेनचे तपास केला तेव्हा असे कळले की, हाताने खोदून सोने काढल्यानंतर खुप कमी सोनं निघते. अशातच तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिकाधिक सोनं काढण्याबद्दल विचार केला. यानंतर या परिसरात वर्ष १८०४ पासून वर्ष १८६० दरम्यान सर्वे झाला. पण इंग्रज सरकारला काहीच मिळाले नाही. यामध्ये काही लोकांचा जीव ही गेला. त्यानंतर हा सर्वे थांबवला गेला. (KGF Real Story)

वॉरेन यांचा रिपोर्ट वाचल्यानंतर लेवेलीने वर्ष १८७३ मध्ये मैसूरच्या महाराजांकडे खोदकाम करण्यासाठी परवानगी मागितली. अशाप्रकारे लेवेलीला कोलार मध्ये २० वर्ष खोदकाम करण्यासाठी परवाना मिळाला. सुरुवातीच्या वर्षात लेवेलीने पैसे कमावले आणि लोकांना येथे काम करण्यासाठी तयार केले. अशा प्रकारे वर्ष १८७५ मध्ये कोलार गोल्ड फील्ड महणजेच केजीएफ मधून सोनं काढण्याचे काम सुरु झाले. सुरुवातीला केजीएफमध्ये खाणीत उजेडासाठी मशाल आणि मातीचे तेल वापरुन लालटेनचा वापर केला जायचा. अशातच केजीएफमध्ये प्रकाश आणण्यासाठी तेथे १३० किली दूर कावेरी वीज केंद्र तयार केले गेले. अशा प्रकारे केजीएफ वीज मिळवणारे भारताचे पहिले शहर ठरले.

वीज आल्यानंतर केजीएफमध्ये सोनं काढण्याचे काम वेगाने सुरु झाले. येथे बड्या मशीनींच्या माध्यमातून सोन काढण्यात येऊ लागले. येथून किती सोन काढले जायचे, याचा अंदाज तुम्ही लावू शकता की, वर्ष १९०२ मध्ये भारतातील ९५ टक्के सोनं केवळ केजीएफ मधून काढण्यात आले होते. केजीएफमुळे १९०५ मध्ये भारतात सोन्याच्या खोदकामात जगातील सर्वाधिक मोठा देश बनला होता.

केजीएफ मध्ये ऐवढे सोने काढल्यामुळे त्याला बंगळुरु आणि मैसूर पेक्षा अधिक प्राथमिकता मिळू लागली. ब्रिटिश सरकारचे अधिकारी आणि इंजिनिअर येथे आपली घरे उभारु लागले. थंड ठिकाण असल्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांना ही जागा फार आवडली. हेच कारण आहे की, याला एकेकाळी लहान इंग्लंड ही बोलले जायचे. या व्यतिरिक्त सोन्याच्या खाणीमुळे आसपासच्या राज्यातील मजुरांची संख्या वाढू लागली. वर्ष १९३० मध्ये येथे जवळजवळ ३० हजार मजुर काम करायचे. त्या मजुरांचे परिवार ही आसपास रहायचे.(KGF Real Story)

हे देखील वाचा- ६२ वर्षांपूर्वी आंतराळात का पाठवण्यात आला होता चिम्पँजी?

भारताच्या स्वातंत्र्यानंतर केजीएफला भारत सरकारने आपल्या ताब्यात घेतले. १९५६ रोजी या ठिकाणाचे राष्ट्रीयकरण केले गेले. १९७० मध्ये भारत सरकारच्या भारत गोल्ड माइन्स लिमिटेड कपनीने केजीएफमधून सोनं काढण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला कंपनीला फार यश मिळाले. मात्र नंतर कंपनीचा फायदा कमी होऊ लागला. १९७९ पर्यंत अशी स्थिती झाली होती की, कंपनीजवळ मजुरांना द्यायला पैसे ही नव्हते. एक काळ असा ही आला होता की, सोनं काढण्यासाठी जेवढे पैसे लागत होते ते मिळवण्यासाठी जो खर्च केला जायचा त्याचा खर्च अधिक होऊ लागला होता. यामुळेच २००२ मध्ये भारत गोल्ड माइन्स लिमिटेड कंपनीने येथे काम करणे बंद केले. त्यानंतर केजीएफ एक खंडर बनले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.