इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ दिली गेली आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या मते ११ जुलै पर्यंत असेसमेंट ईयर २०२३-२४ साठी २ कोटींहून अधिक आयटीआर फाइल करण्यात आलेले आहेत. अशातच आयटीआर फाइल करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरुन रिफंड तुम्हाला वेळेवर दिला जाईल. (ITR)
इनकम टॅक्स रिटर्न वर्षातून एकदा भरावा लागतो. मात्र इनकम टॅक्स आपल्या महिन्याभराच्या पगारानुसार कापला जातो. यालाच टीडीएस असे म्हटले जाते. अंतिम टॅक्स हा लायबिलिटीबद्दल आयटीआर भरतेवळे कळतो. जर आपला अखेरच्या टॅक्सची लायबलिटी एकूण टीडीएसपेक्षा कमी आहे तर तुम्हाला रिफंड मिळतो. जर तुमचा टॅक्स हा लायबलिटीपेक्षा अधिक आहे तर त्या गॅप ऐवढे पेमेंट करावे लागते.
महत्त्वाची माहिती न दिल्यास
जर तुम्ही आयटीआर भरला आहे आणि महत्त्वाची माहिती दिली नाही तर तुमची आयटीआर प्रोसेस होणार नाही. या कारणामुळे तु्म्हाला टॅक्स रिफंड मिळण्यास वेळ लागू शकतो. असे बहुतांशवेळा ऑफलाइन आयटीआर दाखल करताना होते.
चुकीच्या बँक खात्याची माहिती
जर तुम्ही बँक अकाउंट क्रमांकाची माहिती चुकीची दिली असेल तर रिफंड लवकर मिळणार नाही. तसेच तुमच्या बँक खात्याला पॅन कार्डचे डिटेल्स मॅच होत नसतील तरीही रिफंड उशिराने मिळेल.
स्पेशल क्रेडिटचा दावा करणे
जर तु्म्ही एखाद्या स्पेशल प्रमाणे क्रेडिट क्लेम करत असाल तर रिफंड उशिराने मिळेल. (ITR)
तर आयटीआर भरण्याची प्रक्रिया ही नोकरदार वर्गासाठी समान असणार आहे. परंतु फ्रिलान्सर किंवा सल्लागारच्या रुपात काम करणाऱ्यांसाठी ती प्रोसेस वेगळी असणार आहे. त्यांना आयटीआर फाइल करताना ITR-1 किंवा ITR-2 फॉर्मचा वापर करावा लागत नाही. त्याचसोबत ते ५० हजार रुपयांच्या कपातीसाठी क्लेम सुद्धा करु शकत नाही. याचे कारण असे की, त्याचा पगार हा निश्चित नसतो. दरम्यान तो, बिझनेस एक्सपेंससाठी क्लेम देऊ शकतो.
हेही वाचा- गुंतवणूक करण्यासाठी खास टीप्स
आयटीआर फाइल कसे कराल?
-तुम्हाला आयकरच्या ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा
-लॉग इन केल्यानंतर रिटर्न फाइल ऑप्शन निवडावा लागेल
-आर्थिक वर्ष २०२२-२३ चा ऑप्शन निवडल्यानंतर ऑनलाईन ऑप्शन निवडा
-आता न्यू फाइलिंगवर क्लिक करा
-त्यानंतर तुम्हाला Individual चा ऑप्शन निवडा
-योग्य आयटीआर फॉर्म निवडा
-फॉर्मवरील सर्व सुचना व्यवस्थितीत वाचा आणि नंतर भरा
-भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पहा
-तुम्ही आता टॅक्स कपातीसाठी क्लेम करु शकता
-त्यानंतर तुम्हाला तुमचा रिटर्न वेरिफाइ करावा लागेल. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तो वेरिफाय करु शकता