ITR Filing- सर्वसामान्यपणे प्रत्येक व्यक्तीला आपल्या कमाईवर इनकम टॅक्स द्यावा लागतो. तुम्हाला मिळणारे उत्पन्न हे वेतनाचे असो किंवा व्यवसायातून मिळणारे असो, परंतु सर्वांनाच इनकम टॅक्स हा भरावा लागतो. मात्र भारतात काही आयकर नियमांच्या काही खास प्रकरणांमध्ये इनकम टॅक्समध्ये सूट दिली जाते. त्यासाठी इनकम टॅक्सच्या सेक्शन ८० सी ते ८० यू पर्यंतची भुमिका फार महत्वपूर्ण असते. या सेक्शनमध्ये काही डिडक्शनचे काही पर्याय आहेत त्यांच्या आधारे अधिकाधिक इनकम टॅक्स फ्री करण्याचा प्रयत्न केला जातो. अशातच आम्ही तुम्हाला उत्पादन्नांबद्दल सांगणार आहोत ज्यावर टॅक्स लागत नाही.
टॅक्स संबंधित डिजिटल सर्विस देणारी कंपनी क्लिअर टॅक्सनुसार, टॅक्सफ्री इनकममध्ये सर्वात प्रथम शेतीमधून होणारे उत्पन्न आहे. भारतात शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स लागत नाही. दरम्यान तुम्ही शेती व्यतिरिक्त अन्य गोष्टींमधून तुमची कमाई होत असेल तर अॅग्रीकल्चर इनमकचा वापर टॅक्सचा स्लॅब ठरवण्यात केला जाईल. या स्थितीत सुद्धा टॅक्स फक्त अन्य गोष्टींमधून मिळालेल्या उत्पन्नावर होणार आहे. तसेच शेतीमधून मिळालेले उत्पन्न हे टॅक्स-फ्री होईल.
प्रोव्हिडेंट फंड आणि ग्रॅच्युटी
पीएफ आणि ग्रॅच्युटी ही नोकरदार वर्गातील लोकांसाठी सर्वाधिक सोशल सिक्युरिटी आहे. रिटायर झाल्यानंतर ही कमाईचे मुख्य माध्यम म्हणजेच सॅलरी तुम्हाला येणे बंद होते. तर पीफ आणि ग्रॅच्युटी हे कामी येतात. या कारणामुळे त्यांना टॅक्स फ्री करण्यात आले आहे. दरम्यान त्यासंबंधित काही अटी सुद्धा आहेत. जर तुमचा पीएफ कट होऊन पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल तर तो टॅक्स फ्री असतो. पण पाच वर्षांपूर्वीच पीएफ मधील रक्कम काढत असाल तर तुम्हाल १० टक्के टीडीएस द्यावा लागतो. जर तुमची एकूण इनकम टॅक्सेबल नसेल तर कापण्यात आलेल्या टीडीएसचा रिफंड मिळवण्यासाठी तुम्ही आयटीआर क्लेम करु शकता.
शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅच्युटी पूर्णपणे टॅक्स फ्री असते. शासकीय कर्मचाऱ्याचा जरी मृत्यू झाला किंवा रिटायरमेंट नंतर सुद्धा ग्रॅच्युटी काढायची असेल तरीही ती टॅक्सफ्री असते. खासगी सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी ही सूट काही अटींसह मिळते. खासगी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना १० लाखांपर्यंतच्या ग्रॅच्युटीवर टॅक्सवर सूट दिली जाते.(ITR Filing)
हे देखील वाचा- भारतातील Bad Boy Billionaires माहितेयत का?
५० हजार रुपयांपर्यंतचे गिफ्ट
गिफ्ट वरील टॅक्स ही खुप जुनी गोष्ट आहे. पंतप्रधान नेहरु यांच्या काळात पासून हा टॅक्स भारतात सुरु झाला आहे. आयकर नियमांअंतर्गत महागड्या गिफ्टसवर टॅक्स लॅगतो. २०१७ मध्ये गिफ्ट संबंधित इनकम टॅक्स नियमांत संशोधन केल्यानंतर असे ठरवण्यात आले की, महागड्या गिफ्टवर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. गिफ्टमध्ये कॅश, चेक, ड्राफ्ट, चल-अचल संपत्ती असेल तर तुम्हाला ती आयटीआरमध्ये इनकम फ्रॉम अदर सोर्सेज मध्ये दाखवावे लागते. दरम्यान, गिफ्ट वॅल्यू ५० हजार रुपयांपर्यंत असेल तर त्यावर सूट दिली जाते. या व्यतिरिक्त विवाह किंवा अॅनिव्हर्सरी सारख्या क्षणांवेळी मिळणारे सर्व गिफ्ट हे टॅक्स फ्री असतात. परिवारात ही दिले जाणारे गिफ्ट हे टॅक्स फ्री असतात.