मालदिव हे पर्यटकांचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ (Tourist Spot) आहे. मालदिवच्या निळ्या समुद्रावर असलेल्या बांबूच्या घरांमध्ये राहण्याचे स्वप्न अनेकांचे असते. पण हे स्वप्न सर्वांचेच पूर्ण होत नाही. कारण प्रत्येकाचं बजेट वेगळं असतं. तरीही मालदिवला जाण्याचे स्वप्न पर्यटक पूर्ण करु शकतात. त्यासाठी भारताबाहेर जाण्याची गरज नाही. तर आपल्या देशातच मालदिवसारखे पर्यटन स्थळ उपलब्ध आहे. हे पर्यटन स्थळ (Tourist Spot) म्हणजे उत्तराखंड राज्यातील टिहरी तलाव. टिहरी तलाव परिसरात तरंगत्या झोपड्या बांधल्या आहेत. मिनी मालदीव म्हणून या परिसराची नव्यानं ओळख होत आहे.
टिहरी गढवाल हे भारतातील उत्तराखंड राज्यातील एक सुंदर ठिकाण आहे. जुने टिहरी शहर भागीरथी आणि भिलंगणा नद्यांच्या संगमावर होते, हा भाग आता टिहरी धरणाखाली आला आहे. टिहरी हे एक प्राचीन ठिकाण असून या भागात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांना भेट देण्यासाठी येणा-या भाविकांना आता या टिहरी तलावातील बांबूच्या घरांना मोहात पाडले आहे.
टिहरी तलाव परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढली आहे. स्थानिक प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यातूनच पर्यटकांना टिहरी तलावात शिकारा बोट आणि क्रूझचा थरार अनुभवता येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. शिकारा आणि क्रूझ व्यतिरिक्त, उत्तराखंडच्या या प्रसिद्ध तलावामध्ये पॅरासेलिंग देखिल सुरु करण्यात येणार आहे. मालदीव सारख्या फ्लोटिंग हट्सचा आनंद घेण्यासाठी येथे आता पर्यटकांची गर्दी वाढत आहे. (Tourist Spot)
उत्तराखंडमध्ये मार्च, एप्रिल, मे या महिन्यात पर्यटकांची (Tourist Spot) मोठी गर्दी असते. एकतर तेथील थंड वातावरण आणि नयनरस्म परिसर. निसर्गानं भरभरुन वरदान दिलेल्या या राज्यात टिहरी तलावातील तरंगत्या घरांचे नवीन आकर्षण पर्यटकांसाठी उपलब्ध झालं आहे. डेहराडूनहून टिहरीला जायला अडीच तास लागतात. गंगा आणि भागीरथी नदीवर असलेल्या या धरणात पर्यटकांसाठी प्रती मालदिव उभं करण्यात आलं आहे. येथील फ्लोटिंग हट्स आणि इको रूममध्ये पर्यटकांच्या (Tourist Spot) मुक्कामाबरोबरच खाण्यापिण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटक टिहरी तलावामध्ये अनेक खेळही खेळू शकणार आहेत. येथील न्यू टिहरी शहराचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. या डोंगरी शहरामध्ये टिहरी तलाव, भागीरथीपुरम, रानीचौरी आणि बादशाही थौल यांसारख्या अनेक पर्यटन स्थळांचा समावेश आहे. न्यू टेहरीमध्ये टिहरी तलाव देखील आता खूप लोकप्रिय झाला आहे. नवीन शहरात बाओरी बाजार आणि कुलणा बाजार या दोन नवीन बाजारपेठांमध्येही पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या बाजारपेठेत स्थानिक कलाकारांनी केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तू खरेदी करण्यासाठीही पर्यटक मोठ्या संख्येनं येतात. मात्र या सर्वात आकर्षण ठरत आहेत, ते टिहरी तलावातील बोटी आणि त्यात मुक्काम करण्याची संधी. या तलावामध्ये पर्यटक बोटिंग, बनाना राईड कयाकिंग, बोटिंग, झॉर्बिंग, बनाना बोट राइड, बँडवॅगन बोट राइड, हॉटडॉग राइड, पॅराग्लायडिंग आणि जेट स्कीइंग यांचा आनंद घेत आहेत. याशिवाय या तलावात शिकारा आणि क्रूड सफारीचा आनंदही पर्यटकांना घेता येणार आहेत. एक पर्यटन स्थळ (Tourist Spot) असण्यासोबतच, टिहरी हे प्री वेडिंग फोटोशूट डेस्टिनेशन म्हणूनही प्रसिद्ध होऊ लागले आहे. याभागात फोटोग्राफीसाठी येणा-यांची संख्या वाढली आहे.
=======
हे देखील वाचा : जागतिक युद्धात जेव्हा कंपन्या डबघाईला जात होत्या तेव्हाच Nikon ने रचला इतिहास
=======
टिहरी फ्लोटिंग हटसाठी या ऑनलाईन बुक करता येत असल्यामुळे भारताबरोबरच परदेशी नागरिकही या भागात मोठ्यासंख्येनं येत आहे. उत्तराखंडमध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत. प्राचीन मंदिरे आहेत. तसेच आयुर्वेदीक उपचार करणारे मोठे मठही या भागात आहेत. येथे परदेशी पर्यटकांचे प्रमाण जास्त आहे. हे पर्यटक या फ्लोटींग बोटींना प्राधान्य देत आहेत.
टिहरी धरणाची निर्मिती सुरु झाली तेव्हा वादाचा विषय ठरला होता. मात्र आता हे धरण पूर्ण झाल्यावर या परिसराचा विकासाचा दरही वाढला आहे. टिहरी धरण हे रॉकफिल तंत्रज्ञानाने बनवलेले देशातील सर्वात उंच धरण आहे. त्याचे बांधकाम सन 1978 मध्ये सुरू झाले आणि 2006 मध्ये धरणातून वीजनिर्मिती सुरू झाली. रॉकफिल तंत्रज्ञानाने बनवलेले हे धरण आठ रिअॅक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाला तोंड देऊ शकते. भागीरथी नदीवर 260 मीटर उंचीवर हे धरण बांधण्यात आले आहे. टिहरी तलाव 42 चौरस किमी परिसरात पसरलेला आहे. टिहरी धरणाच्या रिटेनिंग वॉलमध्ये फक्त माती आणि दगड भरण्यात आले आहेत. टिहरी धरण हे भारतातील सर्वात उंच आणि जगातील सर्वात उंच धरणांपैकी एक आहे.
सई बने