जवळजवळ प्रत्येक नोकरीसाठी इंटरव्यू घेतले जातात. जर खासगी सेक्टर बद्दल बोलायचे झाल्यास कोणतीही कंपनी अशी नाही की, जी इंटरव्यूशिवाय आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी देते. एक उत्तम नोकरीसाठी प्रत्येकाला इंटरव्यू द्यावा लागतो. त्यामुळे इंटरव्यू मध्ये यशस्वी कसे व्हायचे यासाठीच्या काही टीप्स ही तुम्हाला माहिती पाहिजे. जेणेकरुन तुम्हाला नोकरी मिळू शकेल. (Interview Tips)
इंटरव्यूमध्ये झालेल्या एका लहानश्या चुकीमुळे सुद्धा तुमची मेहनत फुकट जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या अगदी लहान गोष्टीवर ही लक्ष दिले पाहिजे. इंटरव्यू पॅनल समोर तुमचा चुकीचा व्यवहार आणि एक लहान चुक जरी झाली तरीही तुम्हाला नाकारु शकतात.
नोकरीच्या प्रति आवड कमी दाखवणे
नोकरी जरी लहान असो किंवा मोठी पण इंटरव्यूसाठी जाताना तुम्हाला खास गोष्टी लक्षात ठेवावे. जसे की, पॅनलच्या समोर तुम्ही त्या नोकरीसाठी कमी इंटरेस्ट्रेड आहात असे कधीच दाखवू नका. तुम्ही सुद्धा त्यांच्या संवादात सहभागी होण्याचा प्रयत्न करा. विचार करुन काही प्रश्नांची उत्तरे द्या.
फोनकॉलचे उत्तर देऊ नका
बहुतांश लोक इंटरव्यू दरम्यान फोन घेऊन जातात. लक्षात असू द्या की, इंटरव्यूवेळी फोन तुमचा साइलेंटवर ठेवा. यावेळी कोणताही फोन कॉल उचलू नका आणि कोणत्याही मेसेजचे उत्तर देऊ नका. फोन ही वायब्रेशन मोडवर ठेवू नका.
तुम्ही घातलेल्या कपड्यांकडे लक्ष द्या
इंटरव्यूवेळी तुमच्या कपड्यांकडे जरुर लक्ष द्या. शक्य असेल तर, फॉर्मल कपडे ही घाला. या व्यतिरिक्त इंटरव्यूवेळी तुम्ही योग्य कपडे निवडा. तर ज्या दिवशी इंटरव्यूला जाणार असाल त्यापूर्वी तुम्ही त्या कपड्यांमध्ये किती कंम्फर्टेबल आहात हे सुद्धा पहा.
तोंडातल्या तोंडात बोलणे टाळा
काही वेळा आपल्याला उत्तर येत नसतील तर आपण घाबरुन तोंडातल्या तोंडात बोलू लागतो. तुमचे असे वागणे पॅनलच्या समोर वाईट होते. तुम्हाला जर उत्तर येत नसेल तर थोडावेळ थांबा आणि नंतर विचार करा. अगदीच उत्तर येत नसेल तर नाही असे म्हणा. चुकीची उत्तर देणं शक्यतो टाळा. (Interview Tips)
वाढवून चढवून सांगणे
तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी काही लोक काहीही करतात. अशातच ते काही गोष्टी वाढवून चढवून सांगतात. असे करणे म्हणजे तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल चुकीचे दाखवून देणे. याचा वाईट परिणाम पॅनलवर ही होतो.
हे देखील वाचा- नोकरी संदर्भातील ‘या’ चुका तुम्हाला वर्तमानात आणि भविष्यात पडतील महागात
CV वर विशेष लक्ष न देणे
आपला सीव्ही मध्ये तुम्ही केलेल्या कामांची नोंद ही इमानदारीने लिहावी. तसेच तुमच्या सीव्ही मध्ये कोणतीही चुक करु नका. कारण त्यावरुनच तुम्ही नोकरीसाठी योग्य आहात का हे सर्वात प्रथम पाहिले जाते. काही जण एकमेकांचा सीव्ही कॉपी करुन देतात. मात्र असे केल्याने समोरच्या व्यक्तीला लगेच कळते.