Home » १ मे ला ‘आंरराष्ट्रीय कामगार दिवस’ का साजरा करतात?

१ मे ला ‘आंरराष्ट्रीय कामगार दिवस’ का साजरा करतात?

by Team Gajawaja
0 comment
Share

आपण एक मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.म्हणून साजरा केला जातो. पण जागतिक कामगार दिन हा सुद्धा १ मे रोजीच का असा प्रश्न बहुतेक जणांना पडू शकतो. याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.(International Labor Day)

दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन व जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणाऱ्या विशेष दिन आहे. दरवर्षी १ मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा म्हणून पाळला जातो.

कामगार दिन कसा सुरू झाला:-

औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूक होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले आणि त्यांनी आवाज उठवला. प्रत्येक कामगाराला केवळ आठ तास काम असावे. असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. त्यानंतरकामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली. १८९१ पासून १ मे हा कामगार दिन साजरा केला जातो.

कामगारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या :-

-कायद्याने आठ तासांचा दिवस असावा.
-बाल मजुरांवर बंदी असावी.
-महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
-रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी
-कायदाने साप्ताहिक सुट्टी
-कामाचा मोबदला वस्तूच्या रूपात देऊ नये अथवा घेऊ नये
-समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे

देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी जगातील ८० देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात येते.कामगारांचा सरकार तर्फे गौरव करण्यात येतो. (International Labor Day)

हे देखील वाचा- भारतीय शेतीला तारणार विदेशी तंत्रज्ञान

भारतातील पहिला कामगार दिन:-

भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला.लेबर किसान पार्टी हिंदुस्तान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वात प्रथम लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेतीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालया समोरील जागेत हा दिवस साजरा करण्यात आला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.