Instagram Trick & Tips : बहुतांशवेळा असे होते की, एखादी स्टोरी गाण्यासह सेव्ह करायची असल्यास डाउनलोड करताना गाणे येत नाही. यामुळे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवता येऊ शकत नाही. अशातच तुमच्याकडे आयफोन किंवा अॅन्ड्रॉइड डिवाइस असल्यास तुम्ही इंस्टाग्रामवरील स्टोरी म्युझिकसह सेव्ह करू शकता. यासाठी पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.
इंस्टाग्रामवर म्युझिकसह अशी सेव्ह करा स्टोरी
सर्वप्रथम इंस्टाग्राम सुरू करून त्यावर एक स्टोरी शेअर करा. लक्षात ठेवा स्टोरी पब्लिश करू नका. त्यावर असलेल्या तीन डॉटवर क्लिक करून सेव्ह करा. अशाप्रकारे व्हिडीओ गॅलरीमध्ये सेव्ह होईल. यानंतर होम स्क्रिनवर येत उजव्या बाजूला स्वाइप करत डीएमच्या आयकॉनवर क्लिक करा. आता मेसेज सेक्शनमध्ये जा आणि चॅट सुरू करा.
येथे मेसेज टाइप केल्याच्या स्पेसमध्ये डाव्या बाजूला असलेल्या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा. यानंतर गॅलरीमधून व्हिडीओ निवडा जो तुम्ही सेव्ह केलाय. आता व्हिडीओ पुन्हा स्वाइप करा आणि एडिटरच्या पर्यायावर म्युझिकच्या येथे जा. आता व्हिडीओसाठी कोणतेही गाणे निवडा आणि पाठवा. लक्षात ठेवा डाव्या बाजूला असलेल्या कीप-इन-चॅटच्या ऑप्शनवर क्लिक करण्यास विसरू नका. अशाप्रकारे व्हिडीओ, स्टोरी गाण्यासह सेव्ह होईल. यानंतर तुम्ही कोणासोबतही शेअर करू शकता. (Instagram Trick & Tips)
इंस्टाग्रामवर अज्ञात फोन असे करा बंद
इंस्टाग्रावर येणारे अज्ञात फोन बंद करण्यासाठी स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जा. यानंतर सिम अॅण्ड नेटवर्क सेटिंग्सवर क्लिक करा. आता सिमवर क्लिक करा ज्याची सेटिंग तुम्हाला बदलायची आहे. आता स्क्रोल केल्यानंतर access point names वर क्लिक करा. यानंतर इंटरनेट ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर स्क्रोल करत bearer च्या ऑप्शनवर क्लिक करा. अशातच LET च्या ऑप्शनवर क्लिक करून ओके वर क्लिक करा.