Home » स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव: स्वातंत्र्य चळवळीतील ५ बलवान महिला, ज्यांनी देशासाठी केला आपल्या ऐशोआरामाचा त्याग

स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव: स्वातंत्र्य चळवळीतील ५ बलवान महिला, ज्यांनी देशासाठी केला आपल्या ऐशोआरामाचा त्याग

by Team Gajawaja
0 comment
Indian Women Freedom Fighters
Share

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. संपूर्ण देशात प्रत्येकजण आपापल्या स्तरावर आणि आपापल्या पद्धतीने हा स्वातंत्र्योत्सव साजरा करत आहे. देशातील प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात आणि शहरात, प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकवला जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अमर हुतात्म्यांचे स्मरण केले जाते. ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या जंजाळातून देशाला बाहेर काढण्यासाठी राजा महाराजांच्या कारकिर्दीत अनेक स्वातंत्र्यसैनिक झाले. त्यानंतर १८५७ च्या क्रांतीनंतर स्वतंत्र भारताचे स्वप्न काळाच्या ओघात दृढ होत गेले.

इंग्रजांच्या धोरणाविरुद्ध भारतात अनेक पक्ष अस्तित्वात आले. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी हसतमुखाने फासावर बलिदान दिले. या सर्व वीरांची गाथा ऐकताच, आजही

लोकांच्या नसातील रक्त उसळू लागते. पण भारत भूमीवर अशा अनेक महिलाही होत्या, ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला. या वीरपत्नी आणि महिला स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला. अशा अनेक शक्तीशाली महिला क्रांतिकारक होत्या, ज्यांनी ऐशोआरामाचे जीवन त्यागून देशासाठी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जाणून घेऊया, चैनीचे जीवन सोडून स्वातंत्र्यलढ्याच्या मैदानात उडी घेतलेल्या भारतातील पाच शक्तिशाली महिलांबद्दल… (Indian Women Freedom Fighters)

राणी लक्ष्मीबाई 

भगतसिंग, चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारकांची नावे भारताच्या इतिहासात सर्वात जास्त आठवली जातात. पण एखाद्या महिला क्रांतिकारकाचे नाव विचारले तर सर्वात आधी लक्षात येते, ते झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव. देशाच्या पहिल्या महिला क्रांतिकारक राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या भूमीचे आणि आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांशी लढा दिला. हातात धारदार तलवार घेऊन एका मुलाला पाठीवर घेतलेली एक महिला, शेकडो ब्रिटिश सैनिकांसमोर स्तब्धपणे उभी राहिली आणि ब्रिटिश राजवटी आणि इंग्रजांचे वार झेलत शहीद झाली. त्यांचे जीवन प्रत्येक स्त्रीसाठी एक उत्तम उदाहरण आहे. (Indian Women Freedom Fighters)

दुर्गावती देवी

दुर्गावती देवी इतिहासात दुर्गा भाभी म्हणून ओळखल्या जातात. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंप्रमाणे दुर्गा भाभी देशासाठी फासावर चढल्या तर नाहीत, पण त्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य लढा लढत राहिल्या. त्यांच्या प्रत्येक आक्रमक योजनेचा एक भाग बनल्या. दुर्गा भाभी बॉम्ब बनवायला शिकल्या होत्या. देशाचे सुपुत्र इंग्रजांशी लढायला घराबाहेर पडल्यावर, त्या त्यांना टिळक लावून विजयाच्या मार्गावर पाठवत असत. त्यांना गुलाम भारताची आयर्न लेडी म्हणता येईल. चंद्रशेखर आझाद यांनी ज्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून बलिदान दिले होते, ते पिस्तूल दुर्गा भाभींनीच आझादला दिले होते. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांचा राग इतका प्रबळ झाला होता, की त्यांना स्वतः स्कॉटला मारायचे होते. पण त्यांना ही संधी मिळाली नाही. (Indian Women Freedom Fighters)

====

हे देखील वाचा – राज्यसभेची निवडणूक कशी होते, सदस्य होण्यासाठी काय आहे पात्रता, घ्या जाणून

====

सुचेता कृपलानी 

साल १९०८ मध्ये अंबाला, हरियाणात जन्मलेल्या सुचेता कृपलानी या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातात. पण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतही भाग घेतला होता. ‘भारत छोडो’ आंदोलनात सुचेता आघाडीवर उभ्या होत्या. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी त्यांनीही आवाज उठवला. भारताच्या फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलींमध्ये सुचेता कृपलानी यांनी महात्मा गांधींसोबत मिळून काम केले होते. (Indian Women Freedom Fighters)

विजया लक्ष्मी पंडित 

विजया लक्ष्मी पंडित या एका उच्चभ्रू कुटुंबातील होत्या. त्या जवाहरलाल नेहरूंच्या बहीण होत्या, पण त्यांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली होती. ‘सविनय कायदेभंगा’च्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगातही जावे लागले, पण त्या घाबरल्या नाही. भारतीय राजकारणाच्या इतिहासात विजया लक्ष्मी पंडित या पहिल्या महिला मंत्री ठरल्या. इतकेच नाही, तर त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला राष्ट्रप्रमुख आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या राजदूतही ठरल्या. (Indian Women Freedom Fighters)

कस्तुरबा गांधी

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात अहिंसेचा मार्ग अवलंबून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. पण कस्तुरबा गांधी बापूंच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकत राहिल्या. महात्मा गांधी हे आपले पती आहेत, हेही त्या स्वातंत्र्यासाठी विसरल्या. बापूंनी आपल्या पतीच्या धर्माचे पालन करावे, अशी त्यांची अपेक्षा नव्हती. पण स्वतः बापूंची ताकद बनून त्या त्यांना लढण्याचे धैर्य देत राहिल्या. एका सधन कुटुंबातील मुलगी महात्मा गांधींसोबत आश्रमात राहायला आली. आपल्या कार्याने त्या प्रत्येक देशवासीयांची ‘बा’ बनल्या. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात गांधीजींनी चळवळ सुरू केली होती, पण यात कस्तुरबांची भूमिका किती महत्त्वाची होती, हे फार कमी लोकांना माहीत आहे. कस्तुरबांनी आवाज उठवल्यावर त्यांना तीन महिने तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातही कस्तुरबा थांबल्या नाहीत, त्यांनी तुरुंगातील कैद्यांना प्रार्थनेचे महत्त्व शिकवले. (Indian Women Freedom Fighters)

=====

हे देखील वाचा – Espresso Machine चे गॉडफादर Anglo Moriondos नक्की आहेत कोण?

=====


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.