Home » उपासमारीच्या लिस्टमध्ये पाकिस्तान, श्रीलंका सर्वाधिक पुढे तर भारत पहा कोणत्या स्थानावर

उपासमारीच्या लिस्टमध्ये पाकिस्तान, श्रीलंका सर्वाधिक पुढे तर भारत पहा कोणत्या स्थानावर

by Team Gajawaja
0 comment
Hunger Index
Share

हंगर इंडेक्समध्ये भारताची रँकिंग अधिक खराब झाली आहे. भारतात उपासमारीसंबंधितच्या रॅकिंगमध्ये ६ व्या स्थानकावरुन आणखी खाली गेला आहे. नुकत्याच आलेल्या रॅकिंगच्या आकडेवारीनुसार, भारत १०७ व्या स्थानावर आला आहे. ही रॅकिंग १२१ देशांची आहे. म्हणजेच १२१ देशांमध्ये भारत १०७ व्या स्थानी आहे. यापूर्वी भारत ११६ देशांच्या रॅकिंगमध्ये १०१ व्या स्थानावर होता. हैराण करणारी गोष्ट अशी की, आपल्या शेजारील देश पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळपेक्षा मागे आहे. साउथ आशियातील देशांमध्ये अफगाणिस्ताननंतर सर्वाधिक वाईट परिस्थिती ही भारताची आहे. (Hunger Index)

यापूर्वी भारत २०२० मध्ये ९४ व्या स्थानकावर होता. ही रॅकिंग जीएचआय स्कोरच्या आधआरावर केली जाते. भारताचा हा स्कोर सातत्याने कमी होत आहे. आतापर्यंत भारताचा स्कोर २९.१ होता. वर्ष २००० मध्ये ३८.८ होता जो २०१२ आणि २०२१ दरम्यान २८.८-२७.५ दरम्यान राहिला होता. जीएचआय स्कोरची गणना चार संकेतांच्या आधारावर केली जाते. ज्यामध्ये अल्पपोषण, कुपोषण, मुलांच्या वृद्धिचा दर आणि बाल मृत्यू दराचा समावेश असतो.

Hunger Index
Hunger Index

शेजारच्या देशांची काय आहे स्थिती?
भारताच्या शेजारील देशांबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तान ९९ व्या, श्रीलंका ६४व्या, बांग्लादेश ८४ व्या, नेपाळ ८१व्या आणि म्यानमार ७१ व्या स्थानावर आहे. हे सर्व देश भारताच्या वरती आहेत. पाचपेक्षा कमी स्कोरसह १७ देशांच्या सामूहिक आधआरावर १ आणि १७ च्या दरम्यान रॅक दिली गेली आहे. (Hunger Index)

हे देखील वाचा- मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी ॲक्ट काय आहे?

भारताच्या खाली हे देश
ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारतापेक्षा अधिक वाईट स्थिती असणाऱ्या देशांमधअये अफगाणिस्तान, जाम्बिया आणि अफ्रिकी देशाचा समावेश आहे. या देशांमध्ये तिमोर-लेस्ते, गिनी-बिसाऊ, सिएरा लियोन, लेसोथो, लाइबेरिया, नाइजर, हैती, चाड, डेम, मेडागास्कर, मध्य अफ्रीकी गणराज्य, यमन यांचा समावेश आहे. जीएचआयच्या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले की, गिनी, मोजाम्बिक, युगांडा, जिम्बाब्वे, बुरुंडी, सोमालिया, दक्षिण सूडान आणि सीरियासह १५ देशांसाठी रॅक ठरवण्यात येऊ शकत नाही.

भारताची काय आहे स्थिती?
भारतात जवळजवळ २० लोक अशी आहेत ज्यांना दररोज उत्तम जेवण मिळत नाही आणि रात्रीच्या वेळेस त्यांना उपाशी झोपावे लागते. वर्ष २०२० मध्ये साउथ आशियात १३३१.५ मिलियन लोक अशी होती त्यांना हेल्दी हाइट मिळालाच नाही आणि त्यापैकी ९७३.३ मिलियन ही भारतातील होती. जर उपासमारीमुळे मरणाऱ्या लोकांची आकडेवारी पाहिल्यास भारतात प्रत्येक वर्षाला ७ हजार ते १९ हजार लोक उपासमारीमुळे मरतात. म्हणजेच पाच ते १३ मिनिटात एक व्यक्ती खाण्याशिवाय मृत पावतो. तर इंडिया फूड बँकिंगच्या रिपोर्ट्सनुसार भारतात १८९.२ मिलियन लोक कुपोषित आहेत. अशातच अंदज लावला जाऊ शकतो की, भारतात १४ टक्के लोकसंख्या कुपोषित आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.