होळी ही भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. होळी संदर्भातील इतिहास पुराण आणि साहित्यात अनेक कथा आहेत. या कथांच्या आधारित साहित्य आणि सिनेमांमध्ये अनेक दृष्टीकोनाच्या माध्यमातून त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु सर्व कथा या एकसमान नाहीत. असत्यावर सत्याचा विजय आणि दुराचारावर सदाचाराचा विजय आणि विजयाचा उत्सव साजरा करण्याबद्दल सांगितले गेले आहे. भारतात होळी सर्वत्र साजरी केले जाते. मात्र ती साजरी करण्याची पद्धत ही बहुतांश ठिकाणी वेगवेगळी पहायला मिळते. अशातच जाणून घेऊयात होळी साजरी करण्यामागील पौराणिक कथांबद्दल अधिक. (Holi Mythology Stories)
प्रल्हाद आणि होलिका कथा
होळीचा सण हा सर्वाधिक प्रसिद्ध कथा प्रल्हाद आणि होलिका कथेसंबंधित आहे. विष्णु पुराणातील एका कथेनुसार, प्रल्हादचे पिता दैत्यराज हिरण्यकश्यप यांनी तपस्या करुन देवतांकडून असे वरदामन मिळवले होते की, ते ना पृथ्वीवर ना आकाश, ना रात्री ना दिवसा, ना घरात ना घराबाहेर, ना अस्र ना शस्र पासून मरणार नाहीत. हे वरदान प्राप्त झाल्यानंतर ते स्वत:ला आपण अमर झाल्याचे समजत नास्तिक आणि निरंकुश झाले होते.
त्यांना असे वाटत होते की, त्यांच्या मुलाने नारायणाची उपासना सोडून द्यावी. परंतु प्रल्हाद यासाठी तयार नव्हता. हिरण्यकश्यपुने त्याला खुप यातना दिल्या, पण तरीही प्रल्हादचा त्यामधून बचाव व्हायचा. हिरण्यकश्यप यांची बहिण होलिका हिला असे वरदान मिळाले होते की, ती आगीत जळणार नाही.
अखेर त्यांनी होलिकाला आदेश दिला की, तिने प्रल्हादाला घेऊन आगीत प्रवेश करावा. जेणेकरुन प्रल्हाद जळून मृत होईल. परंतु होलिकाला हे वरदान अशावेळी समाप्त झाले जेव्हा तिने भगवान भक्त प्रल्हादचा वध करण्याचा प्रयत्न केला. होलिका अग्नीत जळाली पण नारायणाच्या कृपेने प्रल्हादला काही झाले नाही. याच घटनेच्या आधारित लोक होलिका दहन करतात आणि आनंद साजरा करतात.
राधा आणि कृष्णाची कथा
होळीची कथा राधा आणि कृष्णाच्या पावन प्रेमासंबंधित ही आहे. वसंतच्या सुंदर ऋतूवेळी एकमेकांवर रंगांची उधळण ही त्यांच्या लीलेपैकी एक मानले गेले आहे. मथुरा आणि वृंदावनता होळी राधा आणि कृष्णाला स्मरुन केली जाते. बरसाने आणि नंदगाव मध्ये लाठीमार होळी प्रसिद्ध आहे. देशविदेशात श्रीकृष्णाच्या धार्मिक स्थळाच्या येथे होळीची परंपरा आहे.(Holi Mythology Stories)
असे मानले गेले आहे की, रंग हा प्रेमाचे प्रतीक असतो, रंग हा भावनेचा प्रतीक आहे, भक्ति आणि विश्वास आहे. होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते. यावेळी अहंकर, वैर, द्वैष आणि इर्ष्या, मत्सर या भावना होलिका दहनासोबत जाळल्या जातात.
हे देखील वाचा- होळीचे रंग ‘या’ घरगुती उपायांनी घालवण्यासाठी सोप्प्या ट्रिक्स
शंकर पार्वती आणि कामदेव यांची कथा
शंकर-पार्वती संबंधित एका कथेनुसार, पार्वती हिला तिचा विवाह भगवान शंकरसोबत व्हावा असे वाटत होते. त्यामुळे ती शंकराच्या तपस्येत लीन होती. कामदेव हे पार्वतीच्या मदतीसाठी आले. त्यांनी पुष्प बाण चालवला आणि शंकराची तपस्या त्यावेळी भंग झाली. यामुळे शंकराचा खुप राग आला आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला. त्यांच्या क्रोधाच्या ज्वाळेमुळे कामदेव भम्स झाले. त्यानंतर शंकराने पार्वतीला पाहिले.
पार्वतीची आराधना यशस्वी झाली आणि शंकरांनी तिला आपल्या पत्नीच्या रुपात मान्य केले. याच कथेच्या आधारावर होळीच्या आगीत वासनात्मक आकर्षणाला प्रतीकात्मक रुपात जाळत खऱ्या प्रेमाच्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.