Home » होळीचे रंग ‘या’ घरगुती उपायांनी घालवण्यासाठी सोप्या ट्रिक्स

होळीचे रंग ‘या’ घरगुती उपायांनी घालवण्यासाठी सोप्या ट्रिक्स

by Team Gajawaja
0 comment
Holi 2023
Share

रंगाचा उत्सव असलेला धुलिवंदनाचा सण प्रत्येकालाच आवडतो. या दिवशी विविध रंगांची उधळण केली जातेच पण एकमेकांना रंग ही लावला जातो. मात्र सध्या बाजारात होळीच्या रंगांमध्ये केमिकलचा वापर केला जातो. हेच रंग आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतात. काही लोकांच्या अंगावरचा रंग धुलिवंदनानंतर ही राहतो. त्यामुळे होळीचे रंग काढण्यासाठी तुम्ही पुढील काही घरगुती उपाय वापरु शकता. (Holi 2023)

-दूध आणि बेसन
बेसनाचा वापर केल्याने त्वचा उजळ होतो. तर दूध ही चेहऱ्यासाठी उत्तम मानले जाते. दूधाच्या मदतीने तुम्ही मेकअप क्लिन करु शकता. अशातच तुम्ही दूध आणि बेसनची पेस्ट करुन तुमच्या चेहऱ्याला लावू शकता.

-नारळाचे तेल
नारळाचे तेल केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असते. त्यामुळे केस आणि त्वचा हेल्दी बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. होळीचे रंग काढण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल वापरु शकता. नारळाचे तेल रंग लावण्यापूर्वी आणि त्यानंतर ही वापरु शकता.

-केळ्याचा फेस पॅक
केळ्याचा फेस पॅक तुमच्या त्वचेवरील रंग काढण्यास फायदेशीर ठरेल. यासाठी तुम्हाला केळ स्मॅश करावे, त्यात अर्धा चमचा लिंबूचा रस मिसळा. आता हाच पॅक चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ ठेवून द्या. जेव्हा तो पॅक सुकेल तेव्हा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

-मुल्तानी माती पॅक
रंगांमुळे जर तुमच्या चेहऱ्याची वाट लागली असेल तर तुम्ही मुल्तानी मातीचा फेस पॅक जरुर लावा. यासाठी मुल्तानी मातीत काही थेंब गुलाब पाणी टाकून एक पेस्ट तयार करा. आता हाच पॅक चेहऱ्यावर थोडावेळ राहू द्या आणि नंतर धुवा. (Holi 2023)

हे देखील वाचा- पहिल्यांदा शिवजयंती कधी साजरी केली गेली?

पुढील गोष्टी लक्षात ठेवा
-होळीचे रंग सहज काढण्यासाठी तुम्ही गरम ऐवजी थंड पाण्याचा वापर करावा. कारण थंड पाण्याने रंग लवकर निघतो
-रंग एकाच वेळेस पूर्ण निघत नाही. त्यामुळे थोड्याथोड्यावेळाने चेहरा धुवू नये. असे केल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ शकते
-हे लक्षात ठेवा की, धुलिवंदनानंतर कोणत्याही प्रकारची ट्रिटमेंट करु नये. यामध्ये हेअर स्पा, फेशियल आणि ब्लीच करु नये. कमीत कमी २ आठड्यांचा गॅप घ्या.
-होळीचे रंग केसांना चिकटून राहू नयेत म्हणून आधीच त्यांना नारळाचे तेल लावा. जेणेकरुन होळीच्या रंगांपासून केसांचा बचाव होईल. केसाला तेल असेल तर रंग त्यावर दीर्घकाळ चिकटून राहणार नाही.
-डोळ्यांबद्दल ही यावेळी जरुर काळजी घ्या. कारण धुलिवंदनावेळी काही वेळेस रंग डोळ्यात गेल्याने जळजळ होते. त्यामुळे धुलिवंदनावेळी डोळ्यांवर सनग्लास दरुर लावा. जरी डोळ्यात रंग गेल्यास थंड पाण्याने धुवा


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.