लहान असताना आईने नावडतीची भाजी केली तर नाकं मुरडत जेवायला बसणारी पोरं ताटात एक गोष्ट हमखास हट्टाने मागून घ्यायची ती म्हणजे जॅम. जॅम सुद्धा मुरंब्याचा चुलत भाऊ ज्याचा उगम झाला ग्रीसमध्ये. भारतात जॅम म्हटलं की सगळ्यांच्या मनात येत एकच नाव किसान जॅम. ऑरेंज मार्मालेड पासून सगळ्या फळांचा जॅम ज्याने भारतीयांच्या चवीचा भाग बनवला त्या किसान ब्रँडची ही गोष्ट. (Kissan Brand)
किसान भारतातला एक अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे 80 वर्षांपासून जास्त काळ चविष्ट Jam बनवून देण्यासाठी तत्पर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आताच्या काळापर्यंत या आयकॉनिक ब्रँड चा प्रवास तितकाच रंजक आहे भारतातला किसान जॅम हा बँड 1930 च्या सुमारास उभारला गेला जेव्हा मुंबई ही बॉम्बे म्हणून ओळखले जायचे. या बॉम्बे शहरात युनायटेड ट्रेडिंग कंपनीची स्थापना झाली त्यावेळी ही कंपनी जगाच्या वेगवेगळ्या भागातनं खाद्यपदार्थ आयात आणि विक्री करायची भारतात ब्रिटिश वसाहत येण्यापूर्वी परदेशी खाद्यपदार्थ ही नवीन होते आणि भारतीय लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करू शकेल असा एक देशी लोकल ब्रँड सुद्धा अस्तित्वात नव्हता. (Kissan Brand)
ही कमतरता पूर्ण केली किसान या ब्रँडने. भारतात आलेल्या ब्रिटिश लोकांना टार्गेट ठेवून किसाननी जॅम आणि स्कॉच पहिल्यांदा बनवले 1935 साली. पहिल्यांदा किसान ब्रँडचा जॅम भारतातल्या बाजारपेठेत दाखल झाला आणि त्याच्या स्वादिष्ट चवीमुळे ग्राहकांमध्ये पटकन लोकप्रिय झाला. एकतर फळांचा जॅम मुरांबा ही संकल्पना भारतीय बाजारपेठेसाठी नवीन होती लहान मुलांना आकर्षित करणारी होती त्याचं पॅकेजिंग छोट्या लहान आणि खिशाला परवडतील अशा किमतीच्या ज्यांच्या बाटल्या भारतीयांना चांगल्याच पसंत पडल्या. (Kissan Brand)
1940-50 च्या दशकात किसाननी आपल्या प्रॉडक्ट्स चा विस्तार सुरू केला. जॅम आणि मार्मलेड मधे नवे फ्लेवर आणले. फळ आणि भाजीपाला यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा पहिला कारखाना 1947 मध्ये बंगलोर मध्ये सुरू झाला. मिथुन ब्रदर यांनी 1950 मध्ये किसान ब्रँडला विकत घेतलं आणि त्याची मालकी विठ्ठल मल्हार यांच्या हातात सुपूर्त केले या ब्रँड नी मग कधीच मागे वळून पाहिलं नाही आकर्षक जाहिराती जंगल लोकांना अट्रॅक्ट करतील अशा वेगवेगळ्या मार्केटिंग Strategies वापरून त्यांनी आपला व्यवसाय वाढवत नेला. (Kissan Brand)
इन्स्टंट असतात आणि बाई 1960 सत्तरच्या दशकात किसान हा ब्रँड घराघरात पोहोचला प्रत्येकाच्या विश्वासाचा बनला. त्यांच्या युनिक मार्केटिंग कॅम्पेन मुळे किंवा आयकॉनिक टॅगलाईन असतील त्यामुळे तो प्रत्येकाच्या घरात आणि मनात पोहोचला. मुख्य म्हणजे त्यांच्या मार्केटिंगमुळे ब्रँडची एक हेल्दी आणि स्वादिष्ट जॅम पुरवणारी अशी इमेज तयार झाली जी खूप महत्त्वाची होती. 1980 च्या काळात किसाननी पंख पसरवले टोमॅटो केचप फ्रुट्स लोणचं अशा सगळ्या प्रोडक्टची रेलचे किसाननी मार्केटमध्ये आणली मग ब्रांडी चॉकलेट बटर हे जन्नत स्प्रेड अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रयोग करून बघितले जे मुलं आणि पालकांमध्ये लोकप्रिय झाले. (Kissan Brand)
1993 मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरनी किसान फुड्स ला विकत घेतलं. हिंदुस्तान युनिवर ही भारतातली एक आघाडीची एफएमसीजी कंपनी आहे. त्यांनी विकत घेतल्यामुळे किसान फूड्सचा व्यापक मार्केट पर्यंत पोहोचण्याचा उद्देश सफल झाला. हिंदुस्तान युनिलिव्हर आल्यानंतर किसाननी आपलं पॅकेजिंग बदललं आणखीन नवे फ्लेवर बाजारात आणले त्यासाठी सुंदर जाहिराती सुद्धा केल्या. किसान ब्रँड यशस्वी होण्यामागचं कारण आहे त्यांनी वेळोवेळी त्यांच्या प्रॉडक्ट मध्ये केलेले बदल. अगदी रेसिपी मध्ये बदल करण्यापासून साखरेचा प्रमाण कमी करण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. किसान जाम लोकप्रिय झाला तो कंपनीने मेंटेन ठेवलेल्या गुणवत्ता आणि चवीमुळे. त्यांनी आपल्या गुणवत्तेत कधीच कुचराई केली नाही.
======
हे देखील वाचा : बटर चिकन नेमके कोणाचे ?
======
ज्यांमध्ये वापरले जाणारे घटक हे उत्कृष्ट दर्जाचे आहेत हे निश्चित करूनच ते वापरले जायचे पौष्टिकतेची हमी दिली जायची आणि या सगळ्या गोष्टी करताना पर्यावरणाला हानी पोचणार नाही याचाही विचार केला जायचा किसान लोकप्रिय असण्याचा आणखी एक कारण आहे भारतीयांशी असलेला त्याचा संबंध. त्यांना नेमकं काय हवंय त्यांची नाडी ओळखून या ब्रांडी त्यानुसार वेगवेगळे प्रॉडक्ट बाजारात आणले. खरंतर जॅम हा एक फॉरेन पदार्थ असल्याने त्याच्याशी भारतीयांना कनेक्ट करणे किसानला अवघड गेलं असतं पण त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि आज त्यांचं स्थान अढळ आहे. आकडेवारीनुसार भारतात जॅम जेली आणि रिझर्व्हर्सचं मार्केट 264 कोटींच आहे त्यामध्ये एकूण 176 कोटींचा मार्केट हे किसान या एकट्या ब्रँड असल्याचं सांगितलं जातं. अगदी त्यांच्या टॅगलाईन प्रमाणे भारत टाचा रियल गुडनेस जपण्यात किसान यशस्वी झालाय तेवढं नक्की. (Kissan Brand)