Home » हेल्दी राहण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर ‘या’ चूका करणे टाळा

हेल्दी राहण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर ‘या’ चूका करणे टाळा

बहुतांश लोकांना खाल्ल्यानंतर पोट जड होणे किंवा अॅसिडिटी झाल्यासारखे वाटते. यामागील कारण म्हणजे, खाल्ल्यानंतर केलेल्या चुका. खरंतर खाल्लेले पदार्थ पचवण्यास शरीराला दोन ते तीन तासांचा वेळ लागतो.

by Team Gajawaja
0 comment
health care tips
Share

बहुतांश लोकांना खाल्ल्यानंतर पोट जड होणे किंवा अॅसिडिटी झाल्यासारखे वाटते. यामागील कारण म्हणजे, खाल्ल्यानंतर केलेल्या चुका. खरंतर खाल्लेले पदार्थ पचवण्यास शरीराला दोन ते तीन तासांचा वेळ लागतो. अशातच काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते. काही वेळेस वजन वाढणे ते बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. यामुळे रात्रीच्या जेवणानंतर कोणत्या चूका करणे टाळाव्यात हे पाहूया… (Health Care Tips)

धुम्रपान
काही लोक जेवल्यानंतर सिगरेट ओढतात. खरंतर जेवल्यानंतर सिगरेट ओढणे किंवा अल्कोहोलचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सिगरेटमध्ये निकोटीन आणि अन्य रसायन असतात. जे पचनक्रियेत अडथळा आणतात आणि काही आरोग्यासंबंधित समस्यांचा धोका वाढला जातो.

जेवल्यानंतर झोपणे
जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळावे. यामुळे वजन वाढण्यासह लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. लक्षात ठेवा, थकला असाल तरीही रात्रीच्या जेवणानंतर थोडावेळ शतपावली करा. कमीत कमी 20 मिनिटे तरी चाला. त्यानंतरच झोपा. यामुळे खाल्लेले पदार्थ व्यवस्थितीत पचले जातात आणि उत्तम झोपही लागते.

व्यायाम करू नका
खाल्ल्यानंतर व्यायाम करू नका. यामुळे पचनक्रिया बिघडली जाऊ शकते. याशिवाय मळमळ, उलटी होणे, पोट दुखी अशा समस्या उद्भवू शकतात.यामुळे जेवल्यानंतर जवळजवळ दोन तास तरी अधिक व्यायाम करणे टाळावा.

फळं खाऊ नका
फळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. पण खाल्ल्यानंतर लगेच फळं खाणे टाळावे. यामुळे फळातील पोषण तत्वे शरीराला मिळत नाहीत. तसेच काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

चहा-कॉफी पिऊ नका
चहा-कॉफी रात्रीच्या जेवणानंतर पिणे टाळा. जेवणानंतर कॅफेनचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कॅफेनचे सेवन नेहमीच जेवणाच्या एक ते दोन तास आधी करावे. चहा-कॉफीमध्ये फोनोलिक घटक असतात,जे आहारातील लोहासारखी पोषण तत्त्वे शरीरापर्यंत पोहचवण्यास अडथळा आणू शकतात. (Health Care Tips)

आंघोळ करणे टाळा
काही लोकांना वाटते झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने उत्तम झोप लागते. त्यामुळे ते रात्रीच्या जेवणानंतर आंघोळ करतात. जेवणानंतर आंघोळ करत असाल तर शरीराचे तापमान बदलले जाते. हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. यामुळे तुम्ही देखील जेवल्यानंतर वरील काही चुका करत असाल तर त्या करणे टाळा. जेणेकरून हेल्दी राहण्यास मदत होईल.

टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.


हेही वाचा- सकाळी उठल्यानंतर भीती वाटण्यामागे असू शकते ‘हे’ कारण


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.