Home » गुलमर्गची बहार का हरवली ?

गुलमर्गची बहार का हरवली ?

by Team Gajawaja
0 comment
Gulmarg Snowfall
Share

काश्मिर, उत्तराखंड, गुलमर्ग (Gulmarg Snowfall) हा परिसर ओळखला जातो, तो पांढ-या शुभ्र अशा बर्फाच्या चादरीसाठी.  हिवाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते.  त्यामुळेच येथे पर्यटकांची मोठी संख्या असते.  बर्फावर खेळण्यासाठी देशभरातील पर्यटक या भागात गर्दी करतात.  मात्र या सर्व पर्यटकांना यावर्षी निराशा सहन करावी लागली आहे.  कारण काश्मिर, उत्तराखंड, गुलमर्ग या भागात बर्फवृष्टी अगदी तुरळक प्रमाणात झाली आहे. 

डिसेंबर, जानेवारी महिन्यात बर्फवृष्टी न झाल्यानं या भागातील पर्यटनावर परिणाम झाला आहे.  तसेच बर्फवृष्टी झाल्यास या भागातील पाणीपुरवठ्यावर चांगला परिणाम होतो.  मात्र आता बर्फवृष्टीच न झाल्याने या भागात पुढच्या काही महिन्यात तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.  असे झाल्यास येथील शेतीवरही परिणाम होणार आहे.  हा सगळा हवामान बदल म्हणजे, एल निनोचा प्रभाव असल्याचे तज्ञ सांगतात. सध्या येथे वातावरण थंड आहे,  पण या हवामानामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता स्थानिक व्यक्त करीत आहेत. 

काश्मिर आणि गुलमर्ग भागातील बर्फाच्या पांढ-या शुभ्र चादरीची अनेकांना भुरळ असते.  कितीही थंडी असली तरी या बर्फासोबत खेळण्यासाठी बर्फवृष्टीचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात.  गुलमर्गमध्ये साधारणपणे दरवर्षी जानेवारीमध्ये सरासरी 130 सेमी बर्फवृष्टी होते.   परंतु या महिन्यात आतापर्यंत बर्फवृष्टी झालेली नसल्यामुळे येथील बर्फाच्छादित असणारी पठारे मोकळी दिसत आहेत. या भागातील व्यापा-यांची सर्व आर्थिक गणिते या बर्फावर आधारीत असतात.  या वर्षी बर्फच न पडल्यानं पुढच्या काही महिन्यात आर्थिक कोंडी होण्याची भीतीही आता व्यक्त होत आहे.  तसेच बर्फ वितळून मिळणा-या पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि शेतीसाठी करण्यात येतो.  यावर्षी बर्फच न पडल्यानं शेतकरीही चिंतेत सापडले आहेत. या परिस्थितीसाठी तज्ज्ञांनी एल निनो आणि हवामान बदलाला जबाबदार धरले आहे.(Gulmarg Snowfall)

गुलमर्ग आणि उर्वरित काश्मीरमध्ये यावर्षी एकदाही बर्फवृष्टी झाली नाही.  त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक रहिवासी निराश झाले आहेत. या भागात तपमान थंड असले तरी बर्फाचा पाऊस पडला नाही.  अशा विचित्र परिस्थितीमुळे  स्थानिकांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.  एल निनो म्हणजे, एक जागतिक हवामान घटना आहे.   यामुळे  जगभरातील हवामानावर परिणाम होतो. भारतात गेल्या काही वर्षापासून अचानक होणारी ढगफुटी, अवकाळी पाऊस, गारांचा पाऊस, प्रचंड उष्मा आदी सर्व वातावरण बदल हे या एल निनोमुळे होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.  

आता याच एल निनोचा फटका काश्मिर, उत्तराखंड, गुलमर्ग या भागाल बसला आहे.  हिवाळी खेळांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गुलमर्गमध्ये बर्फच पडला नाही.  डिसेंबरपासून गुलमर्गमध्ये फक्त सहा इंच बर्फ पडला.  दरवर्षी हे प्रमाण दीड ते दोन फूटापर्यंत असते.  असेच कोरडे हवामान येथे पुढचे काही आठवडे राहण्याची शक्यता हवामान खात्यानं  व्यक्त केली आहे.  त्यामुळे या भागात या वर्षी बर्फ पडण्याची शक्यता फार कमी आहे.(Gulmarg Snowfall)  

उत्तराखंडमध्येही अशीच परिस्थिती आहे. हिवाळी खेळांसाठी लोकप्रिय असलेल्या येथील औलीमध्ये तर तपमानातही वाढ झाली आहे.  दरवर्षी या भागात जानेवारी मध्ये तापमान साधारणतः एक ते तीन अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते.  तेच तापमान यंदा आठ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.  या तपमान बदलाचे परिणाम आत्तापासून दिसायला लागले आहेत.  काश्मिर, उत्तराखंड, गुलमर्ग  या भागात थंडी आहे,  पण ती नेहमीसारखी पडली नाही.  तसेच काश्मीरमध्ये यंदाच्या कडाक्याच्या थंडीत कोरडा ऋतू दीर्घकाळ लांबला आहे.  परिणामी अनेक लोक आजारी पडत आहेत.  येथील काही भागात आत्तापासून पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे.   पुढच्या महिना भरात या भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होईल, अशी शक्यता आहे.  

=============

हे देखील वाचा : हिवाळ्यात नवजात बालकांची अशी घ्या काळजी

=============

गुलमर्गमध्ये डिसेंबरमध्ये या भागात 80 टक्के कमी पाऊस झाला आहे.  मैदानी परिसरात बर्फ पडला नाही.  परिणामी शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी पडणार आहे.  या सर्व भागात अनेक हिमनद्या आहेत.  या हिमनद्या अस्तित्वात रहाण्यासाठी वेळेवर हिमवृष्टी होणे अत्यंत गरजेचे असते.  याच हिमनद्या काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ मानल्या जातात.  (Gulmarg Snowfall)

तापमानातील अशा बदलांमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही जाणवू लागल्या आहेत. अर्थात काश्मीरमध्ये हिमवर्षाव 2016 आणि 1998 या वर्षात फार कमी झाल्याची नोंद आहे.  बदलणा-या हवामानाची ही सूचना असल्याचे तज्ञ सांगतात.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.