Home » ऑनलाईन पद्धतीने करता येत नाही ग्रुप रिजर्वेशन, जाणून घ्या ट्रेनने सामुहिक प्रवास करण्यासंबंधितचे नियम

ऑनलाईन पद्धतीने करता येत नाही ग्रुप रिजर्वेशन, जाणून घ्या ट्रेनने सामुहिक प्रवास करण्यासंबंधितचे नियम

by Team Gajawaja
0 comment
Indian Railway
Share

रेल्वेतून प्रवास करण्यासाठी नेहमीच आपण रिजर्वेशन करतो. मात्र त्या संबंधितचे काही नियम आपल्याला अधिक माहिती नसतात. घरबसल्या मोबाईल किंवा कंप्युटरच्या माध्यमातून आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकिट ऑनलाईन पद्धतीने अत्यंत सहज खरेदी करता येतता. त्यामुळे ट्रेनच्या तिकिटासाठी रिजर्वेशनसाठी तुम्हाला तिकिटाच्या रांगेत उभे रहावे लागत नाही. मात्र तुम्ही एकत्रितपणे काही लोकांसोबत रेल्वेचे रिजर्वेशन करत असाल तर ते सोप्पे नाही. भारतीय रेल्वेने ग्रुप रिजर्वेशनसाठी काही नियम बनवले आहेत.जर तुम्ही ग्रुप रिजर्वेशन करु इ्च्छिता तर पुढील काही नियमांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. तर जाणून घेऊयात याचबद्दल अधिक. (Group Reservation Rules)

ग्रुप रिजर्वेशनसाठी रेल्वेला द्यावा लागतो अर्ज
आयआरसीटीसीच्या साइटवर ट्रेनमध्ये सीट बुकिंगसाठी अगदी सहज रिजर्वेशन होते. मात्र जर तुमच्यासोबत अन्य काही लोक असतील तर रेल्वे आरक्षणासाठी तुम्हाला रिजर्वेशन काउंटवर जावे लागणार आहे. कारण ऑनलाईन तिकिट बुकिंगवर ही सुविधा मिळणार नाही.

खरंतर रेल्वेने या संबंधित काही नियम तयार केले आङेत. त्यानुसार ग्रुप रिजर्वेशनसाठी तुम्हाला चीफ रिजर्वेशन सुपरवाइजर किंवा कर्मशियल प्रबंधकांना अर्ज द्यावा लागतो. यामध्ये तुम्हाला तुमच्या सामूहिक प्रवासासंदर्भात माहिती द्यावी लागते. त्याचसोबत प्रवासाला जाण्यामागील कारण ही सांगावे लागते.

प्रवासाचे कारण सांगावे लागते
जर तुम्ही विवाहासारख्या कार्यक्रमांसाठी ग्रुप रिजर्वेशन करत असाल तर मॅरेज कार्डची फोटोकापी ही अर्जासह जोडावी लागते. त्याचसोबत शाळेतील विद्यार्थ्यांच्या ग्रुप रिजर्वेशनसाठी स्कूल अथॉरिटीकडून टूर संबंधित माहिती अर्ज पत्र रेल्वेला द्यावे लागते.

प्रवाशांच्या संख्येच्या आधारावर द्यावा लागतो अर्ज
नियमांनुसार, ग्रुप रिजर्वेशन मध्ये प्रवाशांच्या संख्येच्या आधारावर असे ठरवले जाते की, अर्ज हा रेल्वेच्या कोणत्या अधिकाऱ्यांना दिला पाहिजे. जर तुम्ही ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये ५० व्यक्तींचे रिजर्वेशन करु पाहता तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या रेल्वे स्थानकातील चीफ रिजर्वेशन सुपरवाइजर यांना अर्ज द्यावा लागेल.(Group Reservation Rules)

-जर प्रवाशांची संख्या ५० पेक्षा अधिक आणि १०० पर्यंत असेल तर त्यासाठी तुम्हाला सहाय्यक कमर्शियल प्रबंधक किंवा मंडळ वाणिज्य प्रबंधकांना अर्ज द्यावा लागेल. त्याचसोबत शंभर पेक्षा अधिक प्रवासी असतील आणि रिजर्वेशन करायचे असेल तर अर्ज सीनियर डीसीएमला द्यावे लागेल.

-ट्रेनच्या एसी कोचमध्ये ग्रुप रिजर्वेशन करण्यासाठी सीआरएस फक्त १० सीटवर आरक्षणाची परवानगी देऊ शकते. त्यापेक्षा अधिक सीटसाठी तुम्हाला सीनियर अधिकाऱ्यांना अर्ज द्यावे लागेल.

हे देखील वाचा- नव्या वर्षात टॅक्सची बचत करायची असेल तर ‘या’ टीप्स येतील कामी

-ग्रुप रिजर्वेशन मध्ये फॉर्म भरण्याची गरज नसते. अर्जाच्या तीन कॉपींसह प्रवाशांची यादी, नाव आणि वय, ट्रेन क्रमांक आणि प्रवास करण्याची तारीख अशी सुद्धा माहिती सुद्धा द्यावी लागते. दरम्यान, अर्जात ग्रुप लीडरचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक हा प्रामुख्याने द्यावा लागतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.