Home » महिला असो वा पुरुष, कोणीही करु शकतं का लिंग परिवर्तन?

महिला असो वा पुरुष, कोणीही करु शकतं का लिंग परिवर्तन?

by Team Gajawaja
0 comment
Gender Change Surgery
Share

एक जुनी म्हण आहे की, प्रेमात सर्वकाही समान असते. इतिहासात असे हजारो किस्से आहेत जेथे आपल्या प्रेमासाठी लोकांनी असे काही केले आहे की, ज्यांनी खुप जणांना प्रोत्साहित केले आहे. अशीच एक घटना राजस्थान मधील आहे. येथील मीरा नावाच्या मुलीने स्वत:चे लिंग परिवर्तन केले आणि आपली विद्यार्थी कल्पना हिच्यासोबत लग्न केले. ही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. यापूर्वी सुद्धा पश्चिम बंगाल मध्ये राहणाऱ्या हिरण्यमय डे याने २०१७ मध्ये सेक्स-रिअसाइनमेंट सर्जरी केली होती. याच्या माध्यमातून लिंग बदल केले होते. तो मुलावरुन मुलगी झाला होता. (Gender Change Surgery)

लिंग बदलणे सोप्पे नव्हे
डॉक्टर असे सांगतात की, ज्या लोकांना जेंडर डायसफोरिया होतो ते अशा अशा प्रकारचे ऑपरेशन करतात. या आजारात मुलगा हा मुलीप्रमाणे आणि मुलगी ही मुलाप्रमाणे जगू पाहते. काही मुलामुलींमध्ये १२-१६ वर्षादरम्यानच जेंडर डायसोफोरियाची लक्षण दिसण्यास सुरुवात होतात. मात्र समाजाच्या भीतीने आपल्या पालकांना याबद्दल सांगण्यास ते घाबरतात.

आज सुद्धा अशी काही मुलमुली आहेत जे या समस्येसह आयुष्य जगतात. ही गोष्ट कोणाला सांगण्याबद्दल घाबरतात. मात्र जे हिंम्मतीने पाउल उचलतात ते आपले लिंग बदलण्यासाठी सर्जरीचा निर्णय घेतात. मात्र लिंग बदलल्यानंतर समाज एका वेगळ्याच दृष्टीने पाहण्यास सुरुवात करतो. त्यांच्याबद्दल विविध प्रश्न सुद्धा उपस्थितीत केले जातात.

Gender Change Surgery
Gender Change Surgery

लिंग बदलण्याची प्रक्रिया जटिट
सेक्स-रिअसाइनमेंट सर्जरी किंवा लिंग बदल सर्जरी करणे हे एक आव्हानात्मक आहे. याचा खर्च सुद्धा लाखोंच्या घरात असतो. ही सर्जरी करण्यापूर्वी मानसिक स्थिती ठीक असणे फार गरजेचे असते. ही सर्जरी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध सुद्धा नाही. काही मेट्रो सिटीतील रुग्णालयात अशा प्रकारची सर्जरी केली जाते.

लिंग बदलण्यासाठी ऑपरेशनचे काही टप्पे असतात. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालते. मुलीमधून मुलगा होण्यासाठी ३२ प्रकारच्या प्रक्रियांमधून जावे लागते. पुरुषामधून महिला होण्यासाठी १८ टप्पे असतात. सर्जरी करण्यापूर्वी डॉक्टर रुग्ण हा मानसिक रुपात तयार आहे की नाही हे सुद्धा पाहतात. यासाठी मनोरोग तज्ञांची मदत घेतली जाते. त्याचसोबत असे ही पाहिले जाते की, शरिरात कोणता गंभीर आजार आहे की नाही.

अशा प्रकारे होते लिंग बदलाची सर्जरी
यामध्ये सर्वात प्रथम डॉक्टर एक मानसिक चाचणी करतात. त्यानंतर उपचारासाठी ते विए हार्मोन थेरेपी सुरु करतात. म्हणजेच ज्या मुलाला मुलीसाप्रमाणे हार्मोन हवे असतात जे इंजेक्शन आणि औषधांच्या माध्यमातून शरिरात पोहचवले जातात. या इंजेक्शनचे जवळजवळ तीन ते चार डोस दिल्यानंतर शरिरात हार्मोनल बदल होण्यास सुरुवात होते. त्यानंतर त्याची प्रोसीजर सुरु होते.(Gender Change Surgery)

यामध्ये पुरुष किंवा महिलेच्या प्रायव्हेट पार्टचा शेप बदलला जातो. महिलेवरुन पुरुष होणार असेल तर प्रथम ब्रेस्ट हटवले जातात आणि पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट डेव्हलप केला जातो. पुरुषामधून महिला बनवणारी व्यक्ती मध्ये त्याच्या शरिरातून घेण्यात आलेल्या मांसामधूनच पार्ट बनवले जातात. यामध्ये ब्रेस्ट आणि प्रायव्हेट पार्टचा समावेश असतो. ब्रेस्टसाठी वेगळ्या पद्धतीने तीन ते चार तासांची सर्जरी करावी लागते. ही सर्जरी चार ते पाच महिन्यानंतरच्या कालावधीनंतरच केली जाते.

हे देखील वाचा- भारतात वर्षभरात १८ टक्क्यांनी वाढलेत टीबीचे रुग्ण, कसा कराल बचाव?

काही डॉक्टरांच्या टीमचा सुद्धा समावेश
लिंग बदलण्याच्या सर्जरीत काही डॉक्टरांचा समावेश असतो. यामध्ये मनोरोग तज्ञ, सर्जन, गायनेकोलॉजिस्ट आणि एक न्यूरो सर्जनचा सुद्धा समावेश असतो. डॉक्टर सांगतात की, ही सर्जरी २१ वर्षापेक्षा अधिक वय असललेल्यांची केली जाते. तर कमी वयात आई-वडिलांची लेखी परवानगी घेतल्यानंतरच ऑपरेशन केले जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.