जगभराला स्मार्ट बनवण्यासाठी कंप्युटरने फार महत्त्वाची भुमिका निभावली आहे. कंप्युटर हे एक असे इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे ज्याच्या माध्यमातून युजरचे आयुष्य अगदी सोप्पे झाले आहे. पेन आणि पेपरच्या माध्यमातून तासाभरात होणारे काम हे कंप्युटरच्या माध्यमातून काही मिनिटांत करणे शक्य झाले आहे. एका कमांडवर इनपुटला प्रोसेस करून आउटपुट काढणे ही सोप्पेच झाले आहे. मात्र टेक्नॉलॉजी जशी बदलली जाते तेव्हा तुम्ही आधीपेक्षा अधिक स्मार्ट होता. मात्र त्याचसोबत काही धोके सुद्धा उद्भवतात.त्यापैकीच एक म्हणजे कंप्युटरमध्ये वायरस असणे. (First computer virus)
पण तुम्हाला माहितेय का, अखेर हा कंप्युटर वायरस नक्की कोठून आला असेल? याला कोणी तयार केले असेल? याच प्रश्नांची उत्तरे आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.
पाकिस्तानात सर्वात प्रथम तयार केला गेला वायरस
कंप्युटरमधील प्रथम वायरस तयार करणारे पाकिस्तानील दोन भाऊ होते. ज्यांची नावे बासित फारुख अल्वी आणि अजमद फारुख अल्वी होते. त्यावेळी या दोघांकडे नोकरी नव्हते. त्याच दरम्यान त्या दोघांनी कोडिंग शिकले. त्यामधून उत्तम पैसे ही मिळतहोते. मात्र त्या दोघांकडे कंप्युटर नव्हता.अशातच ते सायबर कॅफेमध्ये जायचे. तेथेच त्यांनी कोडिंग शिकले. त्यांचे हे काम अगदी सुरळीत सुरू होते. म्हणून त्यंनी स्वत:चे कंप्युटर सॉफ्टवेअर विक्री करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एक वायरस बनवला ज्याचे नाव होते, BRAIN.
MS-DOC वर हल्ला करणारा सर्वात प्रथम पहिला वायरस ब्रेन होता. हा वायरस पाकिस्तानातील दोन भावंडांनी तयार केला होता. या दोघांनी १९८६ मध्ये पहिला कंप्युटर वायरस बनवला होता. या वायरसने DOS File Allocation Table (FAT) फाइस सिस्टिम आणि फॉर्मेट केलेल स्टोरेज मीडियाच्या बूट सेक्टरला इन्फेक्टेड केले.
जेव्हा या दोघांनी सॉफ्टवेअरची विक्री केली तेव्हा त्यांना कळले की, काही लोक त्यांच्या सॉफ्टवेअरच्या बेकायदेशीर कॉपी विक्री करत आहे. या समस्येपासून दूर राहण्यासाठी त्यांनी आपली इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीच्या सेफ्टी आणि सॉफ्टवेअर कॉपी बनवणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी Brain Virus तयार केला होता. (First computer virus)
हेही वाचा- 2024 च्या निवडणूकीची AI कडून केली जाणार भविष्यवाणी …?
या दोन भावडांच्या मते, वायरस हा खतरनाक नव्हता. तो केवळ पायरेटेड सॉफ्टवेअर बद्दल एक कॉपीराइट मेसेज दाखवणे आणि फ्लॉपी ड्राव्हचे नाव बदलायचा. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार काही लोकांनी सांगितले या वायरसमुळे त्यांचा डेटा नष्ट झाला होता आणि त्यांचा ड्राइव्ह अगदी धीमा झाला होता. अशाप्रकारे अँन्टीवायरसचा व्यवसाय सुरु झाला. आता ब्रेन कंपनी पाकिस्तानातील सर्वाधिक मोठी इंटरनेट सर्विस प्रोवाइडर आहे.