ज्या लोकांना मधुमेहाची समस्या असते त्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे अत्यंत मुश्किल होते. काय खाल्ले पाहिजे, कधी खाल्ले पाहिजे किंवा किती खाल्ले पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे मधुमेह असलेल्या रुग्णांना लक्ष द्यावे लागते. या व्यतिरिक्त मधुमेह असलेल्यांना डॉक्टर नेहमीच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देतात. तसेच मधुमेहावरील औषध कधी घ्यावीत किंवा ती कधी बंद केली पाहिजे हे सुद्धा डॉक्टरांना विचारले पाहिजे.अन्यथा त्याचे गंभीर परिणाम मधुमेह असलेल्या रुग्णांच्या आरोग्यावर होतो.परंतु दूध हे संतुलित षोषणाच्या दृष्टीने फार महच्वाचे मानले जाते. मात्र मधुमेह असलेल्या रुग्णांची (Diabetes patient) रात्रीच्या वेळेस दूध पिणे हे खरंच सुरक्षित आहे का? तर जाणून घेऊयात याबद्दलच सविस्तर.
दूधात फॅट्स, कॅल्शिअम, प्रोटीन, विटामिन्स आणि खनिज व्यतिरिक्त लॅक्टोस रुपात कार्ब्स असतात. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी चिंतेचे कारण ठरतात. कारण त्यांना रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कार्बोहायइड्रेटच्या सेवनानवर लक्ष ठेवण्याची गरज असते. दूधात असलेले लॅक्टोस शरिरात जाऊन त्याचे साखरेत रुपांतर करतात. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचा स्तर वाढू लागतो.
हे देखील वाचा- केस गळणे, वजन वाढणे हे तर थायरॉइडचे संकेत नाही ना?
मधुमेहाच्या रुग्णांनी (Diabetes patient) रात्रीच्या वेळेस दूध पिणे खरंच सुरक्षित आहे?
दूध हे रक्तातील शर्कराचा स्तर वाढवण्याचे काम करते. कारण लॅक्टोसचे साखरेत रुपांतर होते. त्यामुळेच मधुमेह असलेल्या रुग्णांनी रात्रीच्या वेळेस दूध पिणे शक्यतो टाळावे. मात्र सकाळच्या नाश्तावेळी दूध पिणे उत्तम. कारण त्यावेळी शरिरातील सारखेचा स्तर कमी असतो आणि अशातच तुमच्या शरिराला दिवसभराची कार्ये करण्यासाठी उर्जा हवी असते. दरम्यान, रात्री दूध प्ययाल्याने उत्तम झोप लागते हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु तुम्ही थोडीशी हळद दूधात मिसळून ते पिऊ शकता. हळद हे इंसुलिनचा स्तर वाढवते ज्यामुळे रक्तातील साखरेचा स्तर हा संतुलित राहतो.
दूधामुळे रक्तातील साखरेचा स्तर वाढतो का?
होय, कारण यामध्ये कार्बोहायड्रेडचा स्तर उच्च असतो. एक कप गाईच्या दूधात ७ ग्रॅम फॅट्स, १५२ कॅलरिज, १२ ग्रॅम कार्ब्स तसेच लो फॅट गाईच्या दूधात सुद्धा कार्ब्स हे १२ ग्रॅम असतात. त्यामुळे जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांना स्किम मिल्क पिण्याचा सल्ला दिला जातो.
मधुमेह अससेल्या रुग्णांनी दिवसभरात किती दूध प्यावे?
मधुमेह असलेल्या रुग्णांना दूधाच्या पिण्यावर लक्ष देण्याची गरज असते. कारण त्यामुळे रक्तातील ग्लुकोज वाढवू शकतो. प्रत्येक खाण्याचा प्रभाव हा व्यक्तीवर विविध होतो. खासकरुन दिवसभरात ३ कप दूध पिण्यास काही हरकत नाही. परंतु एक कप दूधानंतर आपली ब्लड शुगरचा स्तर जरुर तपासून पहा.