Home » जगातील ‘या’ शहरात वर्षभर साजरा केला जातो ख्रिसमस

जगातील ‘या’ शहरात वर्षभर साजरा केला जातो ख्रिसमस

by Team Gajawaja
0 comment
Christmas Day
Share

जगभरात असे ही एक ठिकाण आहे जेथे वर्षभर ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. अमेरिकेतील त्या शहराला १९ व्या शतकात सांताक्लॉज असे नाव दिले गेले. हे शहर अत्यंत सुंदर आहे. इंडियानाचा पूर्व-उत्तर भाग हा सामान्य जागेसारखाच आहे. मात्र तरीही येथील वातावरण हे दुसऱ्या ठिकांपेक्षा थोडे वेगळे आहे. येथील सीमेत एंन्ट्री करण्यापूर्वी तुम्हाला १० फूट उंचीची सेंटाक्लॉजची मुर्ती तुमचे स्वागत करताना दिसून येते. जसेजसे तुम्ही या ठिकाणी पोहचता तेथे काही माहिती देणारे बोर्ड्स लावण्यात आल्याचे दिसून येईल.(Christmas Day)

इंडियानाच्या सांताक्लॉज सिटीत ३६५ दिवस ख्रिसमस साजरा केला जातो. मेलश्वार ड्राइव यांचे असे म्हणणे आहे की, २७ वर्षांपासून मी येथे राहत आहे. येथे सेलिब्रेशन करणे म्हणजे आमच्या आयुष्याचा एक हिस्साच आहे. १९ व्या शतकात या शहराला सांता असे म्हटले जायचे. १८५६ पासून शहरातील संग्रहालयातील पोस्ट ऑफिसची कागदपत्र दाखवून देतात की, कधी आणि कशा पद्धतीने या शहराचे नाव सांताक्लॉज असे ठेवले गेले. या शहराचे नाव असे का ठेवले याची कथा सुद्धा ऐकण्यासारखी आहे.

Christmas Day
Christmas Day

एकेदिवशी येथील स्थानिक नागरिक ख्रिसमच्या रात्री चारही बाजूला बसून सेलिब्रेशन करण्यात व्यस्त होते. तेव्हा दरवाजे आपोआप उघडू लागले. दरवाज्यांसह घंटा वाजण्याचा आवाज ही येऊ लगाला होता. पाहता पाहता एका मुलीने म्हटले अरे हा तर सांताक्लॉज आहे. तेव्हापासून या शहराचे नाव सांताक्लॉज असे ठेवण्यात आले. दरम्यान, येथील एक प्रचारकाने या शहराचे काल्पनिक नाव विट्टनबक सुद्धा ठेवले होते. शहरातील प्रमुख एल्फ पॅट कोच यांनी असे म्हटले की, याचे नाव विट्टनबर ठेवल्यास तेथे कोणीही फिरण्यासाठी आले नसते. मात्र मुलांच्या कारणास्तव हे शहर अधिक प्रसिद्ध झाले.

तर १९१४ च्या आसपास शहरातून येथे सांताक्लॉजसाठी चिठ्ठी सुद्धा लोक पाठवू लागले होते. ऐवढेच नव्हे तर त्या मुलांना उत्तर देण्याचे काम शहारातील पोस्टमास्टर जेम्स मार्टिन करु लागले होते. आता पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वर्षी अमेरिकेपासून जवळजवळ २० हजारांपेक्षा चिठ्ठ्या यायच्या. काही चिठ्ठ्यांमध्ये पीओ बॉक्स क्रमांक ही असायचा. काहींमध्ये सांताक्लॉज नार्थ पोल असा पत्ता लिहिलेला असायचा. सध्या चिठ्ठ्यांना उत्तर देण्याचे काम ८६ वर्षाच्या चीफ एल्फ पॅट कोच या करतात.(Christmas Day)

हे देखील वाचा- ना शाळेचे वर्ग…ना अभ्यास, आपल्या मनानुसार शिकतात ‘या’ शाळेतील मुलं

शहराच्या चारही बाजूला सांताक्लॉज संदर्भातील फोटो, बोर्ड आणि रेस्टॉरंट्स सुद्धा आहेत. ऐवढेच नव्हे तर सांताक्लॉजच्या नावाने डिशेज सुद्धा मिळतात. येथील सेंट लॉजमध्ये सांता निक रेस्टॉरंट आहे. येथील मेन्यू मध्ये सांताज फिलेट सह काही डिशेज मिळतात. खरंतर वर्षभर येथे पर्यटक येत राहतात, मात्र ख्रिसमसच्या सणावेळी येथे त्यांची फार मोठी गर्दी होते. शहराच्या मध्ये क्रिंगल प्लेस आणि मुख्य शॉपिंग सेंटर आहे. येथे हॉलिडे वर्ल्ड नावाचे एक मोठे थीम पार्क आणि सफारी आहे. क्रिंगल प्लेसच्या बहुतांश दुकानांची थीम ही ख्रिसमसचीच असते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.