Home » ChatGPT मध्ये नवे फीचर येणार, कोणत्याही फोटोबद्दल लगेच माहिती मिळणार

ChatGPT मध्ये नवे फीचर येणार, कोणत्याही फोटोबद्दल लगेच माहिती मिळणार

ओपनएआयने चॅटजीपीचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी एक नवे फीचर सादर केले आहे. अशातच चॅटजीपीटी युजर्सला कोणत्याही इमेजची पूर्ण डिटेल्स सांगू शकते.

by Team Gajawaja
0 comment
Share

ChatGPT  New Feature : ओपनएआयने नुकत्याच  आपल्या अॅडवान्स एआय लॅग्वेंज मॉडेल जीपीटी- 4 टर्बोसाठी एका अपडेटची घोषणा केली आहे. एआय मॉडेलला आता पाहण्याची क्षमता मिळणार आहे. याच्या मदतीने चॅटजीपीटीमध्ये मल्टीमीडिया इनपुटचे विश्लेषण करण्याची सुविधा मिळणार आहे. याचा अर्थ असा होतो की, आता चॅटजीपीटी इमेजचे विश्लेषण करून देऊ शकतो.

चॅटजीपीटीचे नवे फीचर
चॅटजीपीटीचे ही क्षमता एपीआयमध्ये डेव्हलपर्ससोबत चॅटजीपीटीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. ओपनएआयच्या डेव्हपर्सने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर आपल्या अधिकृत अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये GPT 4 Vision ची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये अशीही माहिती देण्यात आलीय की, Vision सोबत GPT-4 Turbo आता एपीआयमध्ये उपलब्ध आहे.

या फीचरच्या खास गोष्टी
बंगळुरुतील हेल्थफाय मी देखील आपल्या कस्टमर्सच्या सुविधा लक्षात घेत ट्रॅकिंग मॅक्रोजला सोपे करण्यासाठी व्हिजन क्षमतांना आपल्या अपडेटेड एपीआयचा वापर करत आहे. याच्या मदतीने युजर्सला आपला कॅमेरा जेवणाकडे करावा लागतो आणि नंतर एयआय मॉडेल मॅक्रोज सांगतो की, जेवल्यानंतर तुम्हाला शतपावली करायची गरज आहे की नाही. (ChatGPT  New Feature)

चॅटजीपीसाठी हे फीचर प्लस युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे. जर तुम्हाला चॅटजीपी प्लस सर्विसबद्दल अधिक माहिती नाही का? खरंतर ही एक प्लस पेड सर्विस आहे. याच्या माध्यमातून युजर्सला काही सर्विससाठी शुल्क मोजावे लागतात. चॅटजीपी प्लस सर्विससाठी महिन्याभरासाठी तुम्हाला 20 डॉलर्स द्यावे लागतात.


आणखी वाचा :
जुने घर विक्री करताना किती टॅक्स भरावा लागतो?
विमानात तुमचे मुलं अचानक रडू लागल्यास करा ‘हे’ काम
आता Deepfake बद्दल जाणून घेणे होणार सोपे, Meta करणार हा मोठा बदल

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.