सध्या डिजिटल ट्रांजेक्शन जरी केले जात असले तरीही काही वेळेस आपल्याला रोख रक्कमेची गरज भासतेच. काही सामान घ्यायचे असेल किंवा रिक्षा मधून प्रवास करायचा असेल तर वेंडर फक्त पैसे मागतात. यामुळे काही लोक अशा समस्येपासून दूर राहण्यासाठी बँकेतून आधीच एक मोठी रक्कम काढून घरात ठेवतात. अशातच घरात किती सोनं ठेवाव याची मर्यादा आहे तर पैशांसंदर्भात ही काही मर्यादा आहे का? तर इनकम टॅक्सच्या मते, तुम्हाला जितका पैसा ठेवायचा आहे तेवढा ठेवू शकता. फक्त कधी तुमच्या घरी एखादी तपास यंत्रणा येते तेव्हा तुम्हाला त्या पैशांसंदर्भातील सोर्स किंवा काही कागदपत्र मात्र जरुर दाखवावी लागतात. (Cash Limit at Home)
पैशांबद्दल हिशोब न दिल्यास कारवाई होऊ शकते
२०१७ मध्ये नोटाबंदी नंतर इनकम टॅक्स विभाग पैशांसंदर्भात अधिक सतर्क झाला आहे. त्यामुळे आयकर विभागाने एक नोटीफिकेशन जाहीर केले होते की, जर एखाद्याकडे अनडिक्स्लोज कॅश मिळाल्यास तर त्याच्यावर १३७ टक्क्यांपर्यंत टॅक्स लागेल. म्हणजेच जर तुमच्याकडे १ लाख रुपये आहेत तर तुम्ही त्याचा सोर्स काय आहे हे सांगू शकला नाहीत तर तुमच्यावर १३७ टक्क्यांनुसार व्याज दंडानुसार कारवाई केली जाईल.
घरात किती पैसे ठेवले पाहिजेत
घरात पैसे ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. पण जर इनकम टॅक्स विभाग तुमच्याकडे याची माहिती मागत असेल तर तुम्ही कॅशचा सोर्स दिला पाहिजे. त्याचसोबत कॅशवरील दिल्या गेलेल्या टॅक्सची सुद्धा माहिती असावी. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा आयटीआर डिक्लेरेशन सुद्धा दाखवावे लागेल. पण तुम्ही असे करण्यास असमर्थ ठरल्यास तर तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकते.
कॅश ट्रांजेक्शन संदर्भात काय आहे नियम?
कॅश ट्रांजेक्शन संदर्भात CBDT चा नियम असे सांगतो की, जर तुम्ही एकावेळी ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिक पैसे काढत किंवा जमा करत असाल तर तुम्हाला PAN कार्ड दाखवावे लागते. त्याचसोबत एका वर्षात तुम्ही २० लाख रुपयांचेच ट्रांजेक्शन करु शकतात. या दरम्यान तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड दाखवावे लागते. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या रडारवर येऊ शकता. त्याचसोबत तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून सुद्धा १ लाख रुपयांहून अधिक ट्रांजेक्शन करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड दाखवावे लागते. (Cash Limit at Home)
हे देखील वाचा- UPI च्या माध्यमातून चुकीच्या आयडीवर पैसे ट्रांन्सफर झाल्यास काय करावे? वाचा अधिक
एखाद्याला रोख रक्कम देताना घ्या काळजी
जर तु्म्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला २ लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम देत असाल तर तुम्ही काही प्रश्नांमध्ये अडकू शकता. प्रयत्न करा की, हे पैसे बँकेच्या माध्यमातूनच देता येतील. एखाद्याकडून २० हजारांपेक्षा अधिक कॅश घेऊ शकत नाही. त्याचसोबत तुम्हाला देणगी द्यायची असेल तर ती २ हजारांहून अधिक देणे टाळा.