Home » उलट चालल्याने होतात ‘हे’ फायदे

उलट चालल्याने होतात ‘हे’ फायदे

by Team Gajawaja
0 comment
Health Tips
Share

थंडीची सुरुवात झाली आहे. या ऋतुमध्ये सकाळी फिरणा-यांची संख्या वाढते. आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकजण सकाळी चालण्याच्या व्यायामाला प्राधान्य देतात. आरोग्य चांगले राहावे म्हणून चालण्याचा व्यायाम फायदेशीर असला तरी सरळ चालण्यापेक्षा उलट्या चालण्यानं अधिक फायदा होतो हे संशोधनात सिद्ध झालं आहे.  दररोज काही मिनिटं जरी उलटं चाललं तरी शारीरिक वेदना कमी होतातच शिवाय मानसिक आरोग्यही यामुळे सुधारते असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. उलट चालल्यामुळे पायांवर अधिक जोर येत नाही आणि त्याचा मांसपेशींना अधिक लाभ होतो.  उलट चालल्यामुळे पायाच्या मांसपेशींचा व्यायाम होतो. (Health Tips)यामुळे पायावरील जोर कमी होऊन पायांना अधिक मजबूती येते.

शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामाला अनेकजण प्राधान्य देतात. ज्यांना घरात नित्यनियमानं व्यायाम करता येत नाही, असे अनेकजण रोज चालण्याला प्राधान्य देतात. पण सरळ चालण्यापेक्षा उलटं चालण्यानं शरीराला अधिक फायदा होतो.(Health Tips) अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणीही उलटं चालण्याचा व्यायाम करु शकतात आणि त्यांना त्यांचा फायदा चांगला मिळू शकतो. मुख्य म्हणजे उलटं चालण्यानं शरीराच्या आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यालाही चांगला फायदा होतो.  दररोज 20-30 मिनिटे उलटे चालण्याने किडनी, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाशी संबंधित आजारांमध्ये सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

उलटे चालण्याचा फायदे पहिल्यांदा पायांच्या गुडघ्यांना होतो.  गुडघ्यांमधील वेदना, तणाव आणि सूजसुद्धा यामुळे दूर होते.   पायांच्या मासपेशी मजबूत होऊन गुडघ्यावर येणारा ताण दूर होतो. उलटे चालल्यामुळे पायांमध्ये असणारी एखादी दुखापत अथवा गाठीची समस्या असल्यास तीही दूर होते. रोजचा दहा मिनीटांचा उलटं चालण्याचा व्यायाम नियमीत केल्यास गुडघे दुखीची समस्या आटोक्यात आल्याचे अनेकांनी सांगितले आहे.  उलटे चालण्याने पाठीच्या स्नायूंचा व्यायाम होतो.  त्यामुळे पाठदुखी आणि मानदुखीच्या समस्याही दूर होतात.  तुम्हाला कंबरेचा त्रास असेल अथवा कंबरेच्या खालच्या भागामध्ये दुखत असेल अथवा हाडांमध्ये समस्या असेल तर उलटं चालण्याचा व्यायाम फायदेशीर ठरतो.  महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान जाणवणारी पाठदुखीही या उलटं चालण्याचनं नियंत्रणात रहाते असे तज्ञ सांगतात.  उलटं चालण्यानं आपलं लक्ष केंद्रित होतं. आपण निट चालतो आहोत की नाही यासाठी सतर्कपणा वाढतो.  या सर्वांमुळे मानसिक आरोग्य सुधारते. मनाची चंचलता कमी होते.  उलटे चालत असताना, मेंदूला काम करावे लागते आणि अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. यामुळे मेंदूला भरपूर व्यायाम होतो. रोज उलटे चालल्याने नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आजारांपासूनही सुटका मिळते. ज्यांना वजन वाढिची समस्या जाणवते त्यांच्यासाठीही उलटं चालण्याचा व्यायाम फायदेशीर ठरतो. जेव्हा तुम्ही उलटे चालता तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराच्या पुढच्या आणि मागच्या भागांचा समतोल साधावा लागतो, त्यामुळे तुमचे वजन लवकर कमी होते.(Health Tips)

=========

हे देखील वाचा : भारतात किडनी ट्रांसप्लांटचे काय आहेत नियम?

=========

उलटं चालण्याचा व्यायाम हा आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीला कमी करतो.  त्यामुळेच वाढत्या वजनावर नियंत्रण रहाते. यासोबतच मेटाबॉलिझमलाही चालना मिळते आणि पचनसंस्था चांगली होते.(Health Tips) जी मंडळी चालण्याचा व्यायाम करतात, ती कमीत कमी अर्धातास तरी चालतात.  मात्र अशावेळी वेळेचे नियोजन करत अर्धा वेळ सरळ चाल आणि अर्धा वेळ उलटी चाल अशी विभागणी केल्यास त्याचा शरीराला अधिक भाग होतो. थंडीच्या दिवसात शरीराल उर्जा प्राप्त करुन देण्यासाठी चालण्याचा व्यायाम प्रामुख्यानं केला जातो. यात उलटं चालण्याचा व्यायाम अधिक फायदा देऊन जातो. आपण आपल्या शरीराची अधिक काळजी घेतो. मनाची सतर्कता वाढल्यानं लक्ष केंद्रीत होतं. शिवाय उलटं चालण्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि झोपही चांगली लागते, असा निष्कर्ष आहे. अर्थात उलटं चालण्याचा व्यायाम फायदेशीर असला तरी त्याबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी.  रहदारीच्या रस्त्यावर असा व्यायाम करणे टाळावे तसेच उंच जागी किंवा जिथे सुरक्षा कठडे नाहीत अशा जागी उलटं चालण्याचा व्यायाम करु नये. अन्यथा शरीराला अपाय होण्याचीच जास्त शक्यता आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.