11 जून 1963 रोजी, जगाने एक जबरदस्त आणि एकदम धाडसी क्षण पाहिला, सरकारच्या अन्यायाविरोधात एका बौद्ध भिक्षूने स्वत:ला जाळून घेतलं होतं आणि जळताना तोंडातून एकही शब्द उच्चारला नव्हता. संपूर्ण शरीरभर लागलेल्या आगीत ते बौद्ध भिक्षू तसेच ध्यानस्थ बसून होते. संपूर्ण शरीरावर आग लागलेली असताना सुद्धा ते इतके शांत कसे राहिले, यावर नंतर अनेक न्यूरोसाइंटिस्ट्सनी Research केला आहे आणि आजही करत आहेत. त्या बौद्ध भिक्षूंनी हे पाऊलं का उचललं होतं ? जळणाऱ्या बौद्ध भिक्षूची संपूर्ण स्टोरी काय आहे? जाणून घेऊ.
1963 च्या काळातील ही गोष्ट आहे. त्या काळात व्हिएतनाममधील ७० टक्के लोक बौद्ध होते, पण असं असून सुद्धा तेथील सरकार बौद्ध धर्मातील लोकांचा छळ करत होतं. तेव्हा व्हिएतनामचे अध्यक्ष एनगो डिन्ह डायम हे होते. त्यांच्याकडून कॅथलिक चर्च आणि ख्रिश्चनांना प्राधान्य दिलं जात होतं. सरकारने बौद्ध ध्वज फडुक वण्यावर सुद्धा बंदी घातली होती. काही दिवसांतच गौतम बुद्ध यांची जयंती होती. त्यामुळे या निर्णयाचा विरोध सर्व बौद्ध भिक्षूनी करण्याच ठरवलं. यावेळी बौद्ध अनुयायांनी शासकीय नियमाचा निषेध करत बौद्ध ध्वज फडुकावत शासकीय प्रसारण केंद्राकडे पायी मोर्चा काढला.
या मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. यामुळे अनेक बौद्ध भिक्षूंच्या मनात निराशा पसरली.
11 जून 1963 ची सकाळ एका बौद्ध पॅगोडामधून सुमारे 350 बौद्ध भिक्षूंचा समूह बाहेर पडला. हा समूह कंबोडियन दूतावासात पोहोचला आणि त्या चौकात ते वर्तुळ आकारात बसले. त्या वर्तुळाच्या मधोमध एक निळी कार थांबली. या कार मधून अत्यंत शांतपणे थिच क्वांग डुक हे भिक्षू उतरले, त्यांच्या सोबत त्यांचे दोन अनुयायी सुद्धा होते. त्यातील एका अनुयायाने रस्त्यावर एक उशी ठेवली ज्यावर थिच क्वांग डुक पद्मासनाच्या मुद्रेत बसले आणि ध्यान करू लागले. पुढे काय होणार आहे याची जमलेले बौद्ध भिक्षू सोडून कुणालाही कल्पना नव्हती. त्यांच्या दुसऱ्या अनुयायाने कारच्या ट्रंकमधून ५ लीटर पेट्रोल काढलं आणि ते थिच क्वांग डुक यांच्या अंगावर ओतलं. तरीही थिच क्वांग डुक शांतपणे ध्यानस्तच होते. यानंतर त्यांच्या अंगावर एक माचिसची गाडी पेटवून फेकण्यात आली. पेट्रोलमुळे त्यांच्या शरीराने पेट घेतला. ते जळत होते तरीही ते ध्यानस्तच होते शांत. सगळीकडे धूर पसरला होता. जमलेल्या भिक्षूनी स्वत:चे हात जोडले. ते सर्व घाबरलेले होते.
थिच क्वांग डुक यांनी व्हिएतनाम सरकार विरुद्ध स्वत:च बलिदान दिलं होतं. बौद्ध लोकांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचल होतं. आत्म दहन करण्यापूर्वी थिच क्वांग डुक यांचं शेवटचे शब्द होते की, “मी माझे डोळे बंद करून बुद्धाकडे जाण्यापूर्वी, एनगो डिन्ह डायम यांना त्यांच्या देशातील लोकांवर दया दाखवण्यास आणि धार्मिक समानता राखण्यास सांगतो.”
या सर्व घटनेचे फोटोज मॅल्कम ब्राउन या पत्रकाराने काढले होते. या फोटोजसाठी त्याला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार सुद्धा मिळाला होता. ते या घटनेबद्दल बोलताना म्हणाले होते की, “ हे अगदी तितकंच वाईट होतं जितकी मी अपेक्षा केली होती. त्यांचा मृत्यू कधी झाला हे मला समजलं नाही, कारण त्यांच्या चेहऱ्यावर, आवाजावर किंवा इतर कोणत्याही गोष्टीवरून ते ओळखता येत नव्हतं. ते वेदनेने एकदाही ओरडले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, तेसुद्धा तोपर्यंत जेव्हा त्यांचा चेहरा जळाल्या मुळे ओळखता सुद्धा येत नव्हता.
================
हे देखील वाचा : Grooming Gang : ग्रुमिंग गॅंगचा काळा चेहरा आणि स्टारमर यांची भूमिका
================
मॅल्कम ब्राउन यांनी काढलेल्या थिच क्वांग डुक यांच्या आत्मदहनाच्या फोटोमुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. डुक इतक्या शांतपणे आणि ध्यानस्त आत्मदहन कसं करू शकले, हे समजून घेण कठीण आहे. पण न्यूरोसाइंटिस्ट्सनी डुक यांच्या या कृतीचा अभ्यास केला. अनेक वर्षांची ध्यानसाधना या मुळे त्यांच्या शरीरात आणि मनात बदल घडले असावेत. अनेक वर्षांच्या ध्यानामुळेच त्यांना फायर मंक होण्याची क्षमता मिळाली. त्यांनी शरीराच्या संवेदनांना स्वत:च्या कंट्रोलमध्ये ठेवलं होतं. त्यांना त्रास झाला असणार, पण त्यांच्या आत्मदहनाच कारण इतकं मोठं होतं. त्यामुळे त्यांच्या इच्छा शक्तिनेही त्यांना साथ दिली. एखादा सामान्य माणसाने हे करण्याचा प्रयत्न केला असता तर तो एका जागी शांत बसुच शकला नसता.
थिच क्वांग डुक यांच्या शरीरावरील आग विझल्यानंतर त्यांचा देह पिवळ्या कपड्यात गुंडाळून जवळच्या पॅगोडामध्ये नेण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दोनदा आगीत होरपळल्यानंतरही त्यांचं हृदय जळालं नाही. लोकांनी त्यांचं हृदय Xa Loi Pagoda येथे एका काचेच्या पेटीत जतन करून ठेवलं आहे. या घटनेची जगभरात चर्चा झाली. या घटनेमुळेच व्हिएतनाम सरकारच्या पतनाला सुरुवात झाली.