महाराणी एलिजाबेथ यांच्या मृत्यूनंतर प्रिंस चार्ल्स हे राजा झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल जगभर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ब्रिटेनमध्ये राजाची हुकूमत चालते आणि संसद सुद्धा आपले काम करते. दोन्ही एकमेकांना समान मानतात. राजाची गादी सांभाळल्यानंतर राष्ट्र प्रमुख किंग चार्ल्स III यांना आता ब्रिटिश सरकारच्या प्रत्येक कामाची माहिती मिळणार आहे. त्याचसोबत ब्रिटेनमधील मोठ्या निर्णयाचा सुद्धा ते हिस्सा असणार आहेत. अशातच प्रश्न उपस्थितीत राहतो की, ब्रिटेन मधील लोक राजेशाही आणि शाही परिवारा किती पसंद करतात. याचबद्दल आपण अधिक आज जाणून घेऊयात.(Britain Royal Family)
ब्रिटेनमधील लोक राजेशाही आणि शाही परिवाराला किती पसंद करतात हे समजून घेण्यासाठी यु-गव (YouGov) यांनी एक सर्वे केला होता. हा सर्वे अशावेळी करण्यात आला जेव्हा महाराणींची प्लॅनिटम जुबली साजरी करण्यात आली होती. या सर्वेमध्ये २२ टक्के लोकांचे असे मानणे होते की, ब्रिटेनमध्ये राष्ट्र प्रमुखाची निवड व्हायला पाहिजे. सध्या शाही परिवाराचे शासकच ब्रिटेनचे राष्ट्र प्रमुख होतात. सर्वेमध्ये आणखी काही खास गोष्टी समोर आल्या.
त्याचसोबत ब्रिटेनच्या लोकांना या शाही परिवारासोबत किती आत्मियता आहे याचा अंदाज सर्वे मधील आकडेवारी सांगते. त्यानुसार आकडेवारी सांगते की, ६२ टक्के लोकांना असे वाटते ब्रिटेनमध्ये राजेशाही कायम रहावी. त्यांना शासक यांनाच राष्ट्राच्या प्रमुख रुपात पहायचे आहे. २०२१ मध्ये झालेल्या इप्सॉस मॉरी सर्वेत सुद्धा काही गोष्टी समोर आल्या आहेत.(Britain Royal Family)
त्या सर्वेत सहभागी झालेल्या प्रत्येक ५ पैकी एका व्यक्तीचे असे मानणे होते की, ब्रिटेन मधून राजेशाही हटवणे योग्य ठरेल. सर्वेतील आकडेवारी भले ब्रिटेनच्या राजेशाहीला पसंदी देतात परंतु राजेशाहीच्या प्रति त्यांची आवड कमी दिसते.
हे देखील वाचा- शाही परिवारात एका युगाचा अंत, महाराणी एलिजाबेथ यांच्याबद्दल काही खास गोष्टी
YouGov ने वर्ष २०१२ मध्ये जो सर्वे केला होता त्यामध्ये ७५ टक्के लोकांनी राजेशाहीचे समर्थन केले होते. मात्र २०२२ मध्ये हाच आकडा कमी होऊन ६२ टक्क्यांवर आला. सर्वे असे सांगतो की, राजेशाहीचे समर्थन बहुतांश वरिष्ठ लोकांनी केले आहे. तर तरुणांकडून कमी समर्थन मिळाले आहे. आता २०२२ मध्ये फक्त ३३ टक्के तरुणांनींच राजेशाहीचे समर्थन केले आहे.
दरम्यान, एलिजाबेथ यांच्या मृत्यूनंतर विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. खरंतर एलिजाबेथ या १९५२ मध्ये महाराणी झाल्या आणि तेव्हा जगभरातील लोकसंख्येचा एक चतुर्थांश हिस्सा हा ब्रिटिश साम्राज्याच्या आत येत होता. त्यांनी ७० वर्ष राजेशाही केली. मात्र जाणकर आजही म्हणतात की, ब्रिटीश साम्राज्याच्या अत्याचाराला लोक कधीच विसरु शकत नाहीत.