Azhimala Shiva Temple : समुद्राच्या काठावर वसलेले अनोखे शिवधाम दक्षिण भारतातील केरळ राज्यात तिरुवनंतपुरमपासून सुमारे 20 किमी अंतरावर समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले आझिमाला शिव मंदिर आज देशभरातील भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. हिरव्यागार डोंगररांगांमध्ये आणि निळ्याशार अरबी समुद्राच्या सान्निध्यात उभे असलेले हे मंदिर अप्रतिम निसर्गसौंदर्याने संपन्न आहे. इथे पोहोचताच समुद्राच्या लाटांचा गजर, खारट वारा आणि शांत वातावरण भक्तांच्या मनाला अध्यात्मिक शांततेचा अनुभव देतात. प्रत्येक वर्षी हजारो भक्त आणि पर्यटक मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येथे भेट देतात.(Azhimala Shiva Temple )
60 फूट उंचील विशाल शिवप्रतिमा मंदिराचे मुख्य आकर्षण आझिमाला मंदिराची खरी ओळख म्हणजे भोलेनाथाची 60 फूट उंच विशाल आणि अनोखी शिवप्रतिमा .समुद्राकडे तोंड करून बसलेली ही प्रतिमा दमदार आणि मनोहारी आहे. भगवान शिव जटातून वाहणाऱ्या गंगेने, डोळ्यांत अद्भुत तेज आणि ध्यानमग्न मुद्रा असलेल्या अवस्थेत दर्शन देतात. या अद्भुत मूर्तीचे शिल्पकार श्री. राजू वेंगारा असून त्यांनी अत्यंत बारकाईने शिल्पनिर्मिती केली आहे. समुद्राच्या पाश्वभूमीवर उभी असलेली ही आकृती सूर्यास्ताच्या वेळी अधिकच दिव्य भासते आणि पाहणारा मंत्रमुग्ध होतो. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

Azhimala Shiva Temple
इतिहास आणि श्रद्धेचा मिलाफ स्थानिक परंपरेनुसार शतकांपूर्वी हे मंदिर समुद्रकिनारी असलेल्या एका छोट्या गुहेत निर्माण झाले. आज येथे भक्तांचे अखंड दर्शन चालू असते आणि विशेषत: *सोमवार, महाशिवरात्री, श्रावण महिना आणि प्रदोष व्रत* या दिवसांमध्ये हजारोंच्या संख्येने भक्त येथे दाखल होतात. मंदिरात भगवान शिवासोबत देवी पार्वती आणि इतर देवतांचेही पूजन केले जाते. असे मानले जाते की येथे मनापासून प्रार्थना केली तर वैवाहिक जीवनातील अडचणी आणि आरोग्यसंबंधी त्रास दूर होतात. (Azhimala Shiva Temple )
धार्मिकतेसोबत पर्यटनाचेही आकर्षण आझिमाला केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नाही, तर पर्यटनप्रेमींसाठीही एक सुंदर ठिकाण आहे. मंदिरापासून थोड्या अंतरावर Azhimala Beach आणि Cliff Point पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. येथील शांत वातावरण, स्वच्छ किनारा, डोंगरकडे जाणारे ट्रेक मार्ग आणि सूर्योदय-सूर्यास्ताचे मोहक दृश्य पर्यटकांना वेगळा अनुभव देतात. पिकनिकसाठी आणि फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण उत्तम मानले जाते. (Azhimala Shiva Temple )
=====================
हे देखिल वाचा :
Datta Jayanti : दत्त परिक्रमा म्हणजे काय? काय आहे त्याचे महत्त्व
Gita Jayanti 2025: गीता जयंती कधी आहे? जाणून घ्या श्रीकृष्णांचे 5 जीवन बदलणारे उपदेश
Ekadashi : मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या मोक्षदा एकादशीचे महत्त्व
कसे पोहोचाल आणि काय आहे वेळापत्रक? तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून आझिमाला मंदिर 25–30 मिनिटांच्या अंतरावर आहे. रेल्वेने जाणाऱ्यांसाठी तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशन सर्वात जवळचे आहे. मंदिर रोज उघडे असते आणि दर्शनासाठी सकाळी 5 वाजता ते दुपारी 12 वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी 4 वाजता ते रात्री 8 वाजेपर्यंत वेळ आहे. विशेष उत्सवांच्या दिवशी हा वेळ वाढवला जातो. समुद्राच्या कवेत वसलेले आणि दिव्य तेजाने झळकणारे आझिमाला शिव मंदिर हे अध्यात्म, निसर्ग आणि भव्य शिल्पकलेचे अनोखे मिश्रण आहे. एकदा तरी येथे भेट दिल्यास भक्त मनातून विसरू शकत नाही कारण येथे मिळणारी शांतता आणि ऊर्जा जीवनात नवीन सकारात्मकता निर्माण करते.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
