Home » Vitamin C : चमकदार आणि ग्लोइंग स्किनसाठी जाणून घ्या सर्वात बेस्ट आणि सोपे उपाय

Vitamin C : चमकदार आणि ग्लोइंग स्किनसाठी जाणून घ्या सर्वात बेस्ट आणि सोपे उपाय

by Team Gajawaja
0 comment
Vitamin-C
Share

Vitamin C : बाजारातील महागड्या सीरमला पर्याय घरचा व्हिटॅमिन C सीरम स्किन ग्लो, डार्क स्पॉट्स कमी करणे आणि एजिंगची लक्षणे दूर करण्यासाठी विटामिन C सीरम खूप लोकप्रिय आहे. परंतु मार्केटमधील सीरम महागडे असल्याने अनेकांना ते नियमित वापरणे शक्य होत नाही. अशा वेळी घरी तयार केलेला विटामिन C सीरम सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. नैसर्गिक पद्धतीने बनवलेला हा सीरम केवळ किफायतशीर नाही तर केमिकल-फ्री असल्यामुळे त्वचेसाठी सुरक्षितही आहे. त्याचा नियमित वापर त्वचेला ताजेपणा, चमक आणि हेल्दी लूक देतो. (Vitamin C)

लिंबाचा सीरम सर्वात सोपा आणि परिणामकारक घरी विटामिन C सीरम बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लिंबाचा रस वापरणे. कसे बनवायचे? एक टेबलस्पून लिंबाचा रस  दोन टेबलस्पून गुलाबपाणी  एक टेबलस्पून ग्लिसरीन हे तिन्ही घटक चांगले मिसळून काचेच्या बाटलीत भरा. कसे वापरायचे? चेहरा धुतल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी काही थेंब चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. हा सीरम पिग्मेंटेशन, अॅक्ने मार्क्स आणि टॅनिंग कमी करण्यासाठी उत्तम काम करतो.

Vitamin-C

Vitamin-C

संत्र्याच्या सालीपासून बनवा ‘पावडर सीरम’ संत्र्याची साल कोरडी करून त्याची पावडर बनवून सीरम तयार करता येतो आणि तो अनेक आठवडे टिकतो.कसे बनवायचे?  संत्र्याच्या साली उन्हात वाळवून बारीक पावडर करा एक टीस्पून पावडर  दोन टेबलस्पून आलोव्हेरा जेल एक टीस्पून व्हिटॅमिन E ऑइलसर्व एकत्र करून पेस्टसारखा सीरम तयार करा. फायदे हा सीरम कोरड्या त्वचेसाठी विशेष फायदेशीर असून, त्वचेला हायड्रेशन आणि नैसर्गिक चमक देतो. तसेच सन डॅमेज कमी करण्यासाठी परिणामकारक आहे. (Vitamin C)

आमलापासून बनवलेला कोलेजन-बूस्टिंग सीरम आमला हे विटामिन C चे सर्वोत्तम स्रोत असल्याने त्यापासून बनवलेला सीरम त्वचेवरील रिंकल्स कमी करण्यासाठी उत्कृष्ट आहे. कसे बनवायचे?  एक टेबलस्पून आवळा पावडर  दोन टेबलस्पून गरम पाणी  एक टेबलस्पून ग्लिसरीन किंवा नारळाचे तेल पावडर पाण्यात मिसळून त्यात ऑइल घाला. कसे काम करतो? हा सीरम कोलेजन बूस्ट करून त्वचा टाईट करण्यास मदत करतो आणि एजिंगची चिन्हे नियंत्रित करतो.

==================

हे देखिल वाचा :

Health : तुम्हाला श्वास घेताना त्रास होतो का? मग असू शकतो ‘हा’ आजार

Beauty Tips : ‘या’ घरगुती उपायांनी तुम्ही पिंपल्सपासून सुटका करून घेऊ शकता

Ear Pain : थंडीच्या दिवसांमध्ये कानदुखी हैराण झालात? मग करा ‘हे’ उपाय

====================

कसे करावे वापर आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? विटामिन C सीरमचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी वापर पद्धत महत्वाची आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ चेहऱ्यावर लागू करावा. सीरमनंतर मॉइश्चरायझर लावल्यास परिणाम अधिक चांगले दिसतात. दिवसा वापरत असल्यास सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे, कारण विटामिन C प्रकाशाच्या संपर्कात संवेदनशील ठरू शकते. कोणतेही सीरम वापरण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट केल्यास अॅलर्जीचा धोका कमी होतो. नियमित वापरल्यास घरी बनवलेला व्हिटॅमिन C सीरम त्वचेवरील डलनेस, पिग्मेंटेशन, डाग, मोठे रोमछिद्र आणि एजिंगची लक्षणे कमी करून त्वचेला चमकदार आणि हेल्दी बनवतो. केमिकलविरहित आणि कमी खर्चात सौंदर्याची काळजी घेण्याचा हा उत्तम मार्ग मानला जातो. (Vitamin C)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.