उत्तराखंडमधील चार धामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे भक्तांसाठी खुले कऱण्यात आले आहेत. भगवान विष्णूचे पवित्र निवासस्थान म्हणून बद्रीनाथ धाम प्रसिद्ध आहे. बद्रीनाथ धामचे दर्शन सुरु झाल्यावर हजारो भाविकांनी येथे गर्दी केली आहे. यावर्षी बद्रीनाथ धाममध्ये येणा-या भाविकांची संख्या दुपट्टीनं वाढणार आहे. कारण यावर्षीचा मुहूर्त हा खास मानला गेला आहे. बारा वर्षातून एकदा येणा-या या मुहूर्तामुळे बद्रीनाथ धाम येथे विशेष मेळा होणार आहे. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ योग अशी त्याची गणाना होते. बद्रीनाथचे मूळ ठिकाण असलेल्या माणा येथे सरस्वती नदीच्या काठावर हा मेळा आयोजित केला जाणार आहे. 12 वर्षांनंतर हा विशेष योग तयार होत असून यावेळी होणारा धार्मिळ मेळा हा पुष्कर कुंभमेळा म्हणून प्रसिद्ध आहे. यासाठी भारतभरातून भाविक येणार आहेत, शिवाय दक्षिण भारतातील शेकडो आचार्य या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. 12 वर्षानंतर बद्रीनाथ धाम येथे होणा-या या कुंभमेळ्याचे आणि दक्षिण भारतातील आचार्यांचे विशेष नाते आहे. (Pushkar Kumbh Mela 2025)
यावर्षी चार धाम यात्रा खास असणार आहे. कारण यावर्षी चारधाम पैकी एक असलेल्या बद्रीनाथ धाम येथे सरस्वती नदीच्या उगमस्थानी पुष्कर कुंभमेळा होणार आहे. याच वर्षी उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळा झाला. यावेळी जगभरातील 66 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले. आता पुन्हा असाच कुंभमेळा होत असून 12 वर्षांनी येणारा हा कुंभमेळा 15 ते 25 मे दरम्यान बद्रीनाथ धाम येथे सरस्वती नदीच्या उगमस्थानी होईल. दर 12 वर्षांनी, जेव्हा गुरु मिथुन राशीत प्रवेश करतो, तेव्हा बद्रीनाथ येथे पुष्कर कुंभमेळा सुरु होतो. हा कुंभमेळा देशातील पहिले गाव माणा येथे आणि उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धामपासून थोड्या अंतरावर होतो. हा कुंभमेळा जिथे होतो त्यबाबत पौराणिक कथा आहे. (Pushkar Kumbh Mela 2025)
त्यानुसार सरस्वती नदी फक्त 1 किमीच्या त्रिज्येत वाहते. याच नदीच्या काठावर बसून वेद व्यासांनी महाभारताची रचना केली. येथे गणेश गुहा आणि व्यास पोथी देखील आहे आणि याच दिव्य ठिकाणी पुष्कर कुंभमेळा भरतो. अध्यात्मिक साधना करणारे हजारो भाविक या कुंभमेळ्याची प्रतीक्षा करीत असतात. याला धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व आहे. देव गुरु 14 मे 2025 रोजी रात्री 11.20 वाजता मिथुन राशीत प्रवेश करतील तेव्हापासून पुष्कर कुंभमेळा सुरु होईल, आणि पुढचे दहा दिवस हा कुंभमेळा सुरु होईल. 25 मे रोजी धार्मिक विधी करुन हा कुंभमेळा संपन्न होणार आहे. (Pushkar Kumbh Mela 2025)
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने पुष्कर कुंभमेळ्याची तयारी सुरू केली आहे. सध्या कुंभमेळ्यामध्ये येणा-या भाविकांची ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात आली आहे. या कुंभमेळ्यात दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वेद व्यासांनी केशव प्रयाग येथे तपश्चर्येदरम्यान महाभारत लिहिले. त्याच वेळी, दक्षिण भारतातील शंकराचार्य, रामानुजाचार्य आणि माधवाचार्य यांसारख्या प्रमुख आचार्यांनी सरस्वती नदीच्या काठावर देवी सरस्वतीकडून ज्ञान प्राप्त केले. त्यामुळेच आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी, पुष्कर कुंभमेळ्यासाठी दक्षिण भारतातील भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. दक्षिण भारतीय आचार्यांच्या परंपरेनुसार, या प्रसंगी पवित्र नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो. (Pushkar Kumbh Mela 2025)
=============
हे देखील वाचा : Cooler : मेटल की प्लास्टिक नक्की कोणते कुलर घेणे आहे फायदेशीर?
=============
12 वर्षांनी येणा-या या पुष्कर कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर समितीसोबतच स्थानिक लोकांनीही या भव्य कार्यक्रमासाठी विशेष तयारी सुरू केली आहे. यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. शिवाय मोठ्या संख्येनं येणा-या भाविकांसाठी येथे पुरेशी निवासस्थाने उभाण्यात येत आहेत. काही स्थानिकांनी आपल्या घरातही भाविकांच्या रहाण्याची सोय केली आहे. यावर्षीची चारधाम यात्रा उत्साहात सुरु झाली आहे. 30 एप्रिल रोजी यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे दरवाजे खुले कऱण्यात आले आहेत. तर बाबा केदारेश्वर धामचे दरवाचे 2 मे रोजी खुले झाले. 4 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे खुले झाले. 2024 मध्ये सुमारे 1435341 यात्रेकरूंनी बद्रीनाथ धामला भेट दिल्याची माहिती आहे. यावर्षी या धामवर कुंभमेळा होत असल्यामुळे भाविकांची ही संख्या दुप्पटीनं वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानं मोठ्या प्रमाणात तयारी सुरु केली आहे.
सई बने