Home » आर्क्टिक महासागरातील रसायन कशा प्रकारे बदलतेय?

आर्क्टिक महासागरातील रसायन कशा प्रकारे बदलतेय?

by Team Gajawaja
0 comment
Arctic Ocean
Share

वातावरणाच्या बदलामुळे सर्वाधिक परिणाम पृथ्वीवरील ध्रुवांवर पडत आहे. यामध्ये आर्क्टिक महासागर (Arctic Ocean) सर्वाधिक प्रभावित होणारे क्षेत्र मानले जात आहे. याच कारणास्तव वातावरणासंबंधित सर्वाधिक संशोधन सुद्धा आर्क्टिक महासागराबद्दल केले जात आहेत. पृथ्वीच्या दुसऱ्या हिस्स्याच्या तुलनेत हे क्षेत्र अधिक गरम होत आहे. असे दिसून येत आहे की, आर्क्टिक महासागरचे रसायनशास्र सुद्धा वेगाने बदलत आहे. नव्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, बर्फ वेगाने वितळत असल्याने आर्क्टिक महागासाराचे आम्लिकरण वेगाने वाढत आहे.

गेथेनबर्ग युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, जसेजसे आर्क्टिक महासागरातील बर्फ वितळत चालला आहे त्यामुळे पाण्यात अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषला जात आहे. ऐवढेच नव्हे तर संशोधकांनी असा सुद्धा इशारा दिला आहे की, ही घटना महासागरात आम्लिकरणाची प्रक्रिया वेगाने हो आहे. यामुळे फूड चेनवर प्रभाव पडू शकतो. संशोधकांनी अभ्यासात पुढे असे लिहिले की, आर्क्टिक महागासागरात नुकत्याच काही दशकांमध्ये वेगाने गरम आणि समुद्रातील बर्फाचे नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.

Arctic Ocean
Arctic Ocean

आर्क्टिक महासागरासंदर्भातील अभियनानुसार आकडेवारीचा उपयोग करुन अलास्का आणि साइबेरियाच्या उत्तरेला पीएच वॅल्यूमध्ये झालेल्या बदलावांचे विश्लेषण केले आहे. त्यांना असे दिसून आले की, या परिसरात पीएचची वॅल्यू १९९४ पासून वेगाने कमी झाली आहे. संशोधकांनी असे म्हटले की, १९९४ मध्ये आर्क्टिक मधील बर्फाची चादर ही फार विस्तृत आणि जाड होती. मात्र २०१४ मध्ये सायबेरियाहून उत्तर ध्रुवापर्यंत पाण्यात जाऊ शकत होतो. (Arctic Ocean)

हे देखील वाचा- ISRO ने खरी साजरी केली दिवाळी, बाहुबली रॉकेट LVM3 ने पुन्हा रचला इतिहास

तर १९९४ ते २०२० पर्यंत आकडेवारीच्या विश्लेषणावरुन कळते की, पश्चिम आर्क्टिक महासागरात पीएचचा स्तर अन्य महासागरांच्या तुलनेत तीन ते चार पटीने वेगाने कमी झाला आहे. समुद्रातील बर्फ वितळल्याने त्याचा खुल्या पाण्याशी थेट संबंध येतो. ज्यामुळे वायुमंडळीय कार्बन डाइऑक्साइड वेगाने समुद्रात मिसळू लागतात. अशातच समुद्रातील पीएचचा स्तर आणि एरागोनाइटचे प्रमाण कमी होऊ लागते. संशोधकांनी असा अनुमान लावला आहे की, पीएचचा स्तर आणखी कमी होईल आणि खासकरुन असे उत्तर अक्षांमध्ये अधिक होईल. जेथे बर्फ कमी होण्याचे सक्रिय असून भविष्यात आर्क्टिक महासागर अधिक गरम होण्यासह एरागोनाइट कमी होण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतो. महासागरात किती कार्बनडायऑक्साइड मिसळणार की नाही हे पाण्याच्या तापमानावर निर्भर करते. तसेच सर्वाधिक थंड पाण्यात प्रभाव हा अधिक पहायला मिळेल. संशोधकांनी असे ही म्हटले की, समुद्रात बर्फ वितळून जो पाण्यात मिक्स होतोय तो सुद्धा आर्क्टिक महासागराच्या रसायनशास्रला बदलण्यास मदत करत आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.