Home » Amazon आणि Flipkart वर सेलदरम्यान ८०-८५ टक्क्यांपर्यंत सूट कशी मिळते?

Amazon आणि Flipkart वर सेलदरम्यान ८०-८५ टक्क्यांपर्यंत सूट कशी मिळते?

by Team Gajawaja
0 comment
Amazon-Flipkart Sale offer
Share

ऑनलाईन शॉपिंगसाठी भारतात सर्वाधिक दोन प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट. या दोन्ही भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज मानल्या जातात. या प्लॅटफॉर्मवर सध्या धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल तर फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेलच्या नावे तगडा डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा सेल २३ सप्टेंबर पासूनच सुरु झाला आहे. सेलमध्ये स्मार्टफोन ते कपड्यांपर्यंत आणि होम अप्लांयंसेज, गॅजेटसह अन्य प्रोडक्ट्सवर ही भरपूर डिस्काउंट दिला जात आहे. नेहमीच प्राइम मेंबर्ससाठी हे सेल एक दिवस आधी सुरु होतात. (Amazon-Flipkart Sale offer)

फ्लिपकार्टवरील धमाकेदार ऑफर्स
फ्लिपकार्टबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरिजवर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. टीव्ही आणि एप्लायंसेजवर ही ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटआहे. या व्यतिरिक्त फॅशन, ब्युटी, स्पोर्ट आणि अन्य गोष्टींवर ६०-८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. अशाप्रकारे युजर्ससाठी हा धमाकेदार सेल त्यांना भरपूर खरेदी करण्यास प्रोत्साहित करत आहे.

अॅमेझॉनवर ही ऑफर्स
फ्लिपकार्ट प्रमाणे अॅमेझॉन सुद्धा ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये यंदा २ हजारांहून अधिक नवे प्रोडक्ट्स लॉन्च करण्यात आले आहेत. अॅमेझॉनच्या या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीजवर ७५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनवर सुद्धा ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आणि टीव्ही अॅन्ड अप्लायंसेजवर ७० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तर फॅशन, होम, किचन आणि अन्य गोष्टींवर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

Amazon-Flipkart Sale offer
Amazon-Flipkart Sale offer

पण सेलमध्ये ऐवढा डिस्काउंट का मिळतो?
खरंतर या कंपन्या इंटरमीडियरी अंतर्गत येतात. म्हणजेच ते वेंडर्स आणि ग्राहकांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जातात. या कंपन्या वेंडर्सला आपल्या वेबाइसाइटच्या माध्यमातून सामान विक्री करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळवून देतात आणि त्या बदल्यात विक्रीचे कमीशन घेतात.

अशातच कोणत्याही कंपनीच्या सेलचा उद्देश हा सेल्स वॉल्यूम वाढवणे असतो. त्यामुळे सेल्स वॉल्यूम वाढवण्याचा अर्थ असा होतो की, कस्टमर बेस वाढवणे. अशा प्रकारे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या सुद्धा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारी डिस्काउंट देतात. येथे मुख्य बाब अशी की, सेलमध्ये प्लॅटफॉर्म आणि वेंडर या दोघांची सुद्धा भुमिका असते.(Amazon-Flipkart Sale offer)

या सेल्सच्या दरम्यान वॉल्यूम वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्म्स आपले कमीशन कमी करतात. त्यामुळे त्यांचा जुना स्टॉक क्लियर होतो. अशा स्थितीत एक लिक्विडेटर कंपनीमधून रिटेल प्राइसच्या २०-२३ टक्क्यांवर मोठा स्टॉक खरेदी केला जातो. त्यानंतर तो लहान लहान मार्जिनवर ऑनलाईन विक्रीसाठी ठेवला जातो. त्यानंतर ई-कॉमर्स कंपन्यांच्याद्वारे ग्राहकांपर्यंत खरेदी करण्यासाठी उपलब्ध करुन दिला जातो.

हे देखील वाचा- Business Idea: शासनाच्या मदतीने तुम्ही सुरु करु शकता ‘हा’ व्यवसाय, मिळेल लाखोंचा नफा

अधिक विक्रीचा खेळ
या व्यतिरिक्त एक मुख्य फॉर्म्युला असा सुद्धा आहे की, प्रॉफिट=सेलिंग प्राइस-कॉस्ट किंमतीशी संबंधित आहे. कॉस्ट प्राइसचा अर्थ असा की, प्रोडक्ट किती रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. तर सेलिंग प्राइस म्हणजे तो किती रुपयांना विक्री केला. जर कोणताही प्रोडक्ट अधिक प्रमाणात विक्री केला जात असेल तर त्याची कॉस्ट प्राइस कमी होते. कच्चा माल सुद्धा एकत्रित खरेदी केल्यास कमी पैसे मिळतात.

तर अधिक विक्री असणाऱ्या सेलमध्ये भले मार्जिन कमी असते पण वॉल्यूम वाढवल्याने कमाई ही वाढते. अशातच मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, एसी सारख्या गोष्टी बल्कमध्ये विक्री केली जात असल्याच्या कारणास्तव त्यांच्यावर तगडा डिस्काउंट दिला जातो. या व्यतिरिक्त बल्कमध्ये विक्री केली जात असल्याने कंपनीसह वेंडरचा ही नफा वाढतो. अशातच ही संपूर्ण प्रक्रिया जेव्हा कंपनीकडून वापरली जाते तेव्हा त्याचा थेट परिणाम असा होतो की, किंमती कमी होतात आणि विक्री अधिक वाढते. यामुळेच कंपनी आणि ग्राहकांचा सुद्धा नफा होतो. म्हणूनच हे सेल्स लोकप्रिय असतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.